पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ढाका भेटीवर, पण 1971 चे भूत अजूनही मानगुटीवरच

0
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांना बांगलादेशला भेट देण्यास 13 वर्षे लागली. मात्र चर्चा सुरू झाल्यावर अवघ्या13 मिनिटांतच 1971चे भूत चर्चेच्या खोलीत शिरले.

ढाकाच्या “ऐतिहासिक” दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी नेत्याने आनंदाने जाहीर केले की दोन्ही देशांमधील सर्व “निराकरण न झालेले मुद्दे” दोनदा सोडवण्यात आले आहेत.

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद हुसेन, पोकर फेस, यांनी या दाव्याला प्रत्युत्तर दिले: “मी अजिबात सहमत नाही.”

प्रतीकात्मकतेने भरलेला हा दौरा बांगलादेशातील राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर आहे. गेल्या वर्षी शेख हसीनाच्या हकालपट्टीनंतर, अंतरिम नेते मुहम्मद युनूस यांनी “सर्वांशी मैत्री” परराष्ट्र धोरण अवलंबले आहे, ज्यामुळे ढाकाचा भारताकडे असलेला मोठ्या प्रमाणात असलेला कल कमी झाला असून पाकिस्तानच्या दिशेने राजनैतिक झुकाव वाढला आहे.

दार यांच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशने व्यापार सुविधा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीपासून ते शैक्षणिक भागीदारी, परराष्ट्र सेवा अकादमी सहकार्य आणि अधिकाऱ्यांसाठी व्हिसा रद्द करणे अशा सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याचा 86.5 कोटी डॉलर्सचा असलेला द्विपक्षीय व्यापार वार्षिक 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याला प्राधान्य आहे, जे तीन पटीहून अधिक वाढ दर्शविणारे लक्ष्य आहे.

इस्लामाबाद संभाव्य उलथापालथीवर जोर देण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानी वस्त्रोद्योग, फार्मास्युटिकल्स आणि सिमेंटला आधीच बांगलादेशात खरेदीदार मिळतात, तर ढाकाचे तयार कपडे आणि ताग उत्पादनांसाठी पाकिस्तानमध्ये स्पर्धात्मक वातावरण असते. थेट नौवहन मार्ग आणि सुलभ सीमाशुल्क मंजुरीवर चर्चा करून बँकिंग मार्गांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे.

तणाव निवळणे हे केवळ अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नाही. पाकिस्तानने शांतपणे बांगलादेशसोबत लष्करी आणि गुप्तचर यंत्रणाशी संबंधित हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. ढाकासाठी, हे दुवे त्याच्या ‘फोर्सेस गोल 2030’ लष्करी आधुनिकीकरण योजनेला पूरक आहेत, ज्याचा उद्देश त्याच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलात लक्षणीय सुधारणा करणे हा आहे. लष्करी-ते-लष्करी संपर्कांमध्ये प्रशिक्षण आणि संरक्षण सहकार्याबाबतच्या बैठकांचा समावेश आहे, जे अनेक दशकांच्या अंतरानंतर दोन्ही बाजू सुरक्षा समन्वय शोधण्यास तयार असल्याचे संकेत देतात.

तरीही, या दिलजमाई आणि चर्चांमागे मोठा इतिहास आहे.

बांगलादेशने 1971 पासून वारंवार आपल्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेतः मुक्ती युद्धादरम्यान झालेल्या सामूहिक हत्या आणि अत्याचारांबद्दल इस्लामाबादने औपचारिक माफी मागणे; पाकिस्तानचे विभाजन झाल्यापासून गोठवलेल्या 4.52 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मालमत्तेबाबत तोडगा काढणे; आणि युद्ध गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारणे.

इस्लामाबादमधील एकापाठोपाठ एक येणाऱ्या सरकारांनी या मागण्यांवर टाळाटाळ केली आहे, काळजीपूर्वक “खेद व्यक्त करणे” हा प्रकार करून झाला आहे, परंतु बांगलादेशला कायम अपेक्षित अशी स्पष्ट शब्दांमधील माफी मागितलेली नाही. आर्थिक वादही अद्याप सुटलेला नाही, पाकिस्तानने गोठवलेली खाती सोडावीत आणि थकबाकीदार दावे भरावेत असा आग्रह बांगलादेश धरत  आहे.

पंतप्रधान युनूस यांच्या अंतरिम प्रशासनासाठी, 1971 च्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे हा पर्याय नाही. मागे हटण्याच्या कोणत्याही सल्ल्यामुळे देशांतर्गत निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागेल, विशेषतः फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बांगलादेशला परवडणारे नाही. नरसंहाराचा मुद्दा बांगलादेशी समाजात भावनिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून कोणताही नेता त्यावर तडजोड म्हणून पाहण्यास तयार नाही.

दार यांची भेट ढाकाच्या बदलत्या प्रादेशिक गणिताबद्दल जे संकेत देते त्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली, बांगलादेशने भारताशी जवळचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध राखले, 18 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार आणि दहशतवादविरोधी तसेच सीमा सुरक्षेसंदर्भात मोठ्या प्रमाणात सहकार्य केले होते.

मात्र आता ते संबंध बिघडले आहेत. हसीना  पदच्युत झाल्यानंतर भारतात निर्वासित म्हणून आल्याने ढाक्यात अशी धारणा निर्माण झाली आहे की नवी दिल्लीचज त्यांच्याशी दृढ नातेसंबंध आहे. बांगलादेशच्या 2024 च्या पुरात भारताने डंबूर धरणातून अघोषितपणे पाणी सोडणे यासारख्या विशिष्ट घटनांमुळे असंतोष वाढला आहे, ज्यामुळे नुकसान आणखी वाढले. या घटनेने वाढत्या “इंडिया आउट” चळवळीला चालना दिली, ज्यामुळे युनूस यांना बांगलादेशच्या बाह्य भागीदारीत विविधता आणण्यासाठी आणखी एक कारण मिळाले.

भारत बांगलादेश यांच्या नात्यातील ही दुरावस्था पाकिस्तानसाठी एक संधी दर्शवते. व्यापार वाढवण्याव्यतिरिक्त, इस्लामाबाद बांगलादेशात सुरक्षाविषयक भूमिका साकारण्याची आणि भारतासमोर समतोल साधणारा देश म्हणून स्वतःला सादर करण्याची संधी पाहतो. ढाकासाठी, पाकिस्तानशी संबंध जोडल्याने फायदा मिळतो – नवी दिल्लीला आठवण करून दिली जाते की बांगलादेश कोणत्याही एका भागीदाराच्या अधीन नाही.

भूतकाळातील कटुतेच्या पलीकडे जाण्याची आणि पाकिस्तान-बांगलादेश संबंधांमध्ये “एक नवीन अध्याय लिहिण्याची” संधी म्हणून दार यांनी सार्वजनिकरित्या आपल्या भेटीला “पुनरुज्जीवित” केले आहे. पण जरी नवीन करारांवर शिक्कामोर्तब झाले असले तरी जुन्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत.

ही विषमता तीव्र आहे. पाकिस्तानचा व्यापार 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. बांगलादेश सुमारे 4.52 अब्ज डॉलर्सच्या गोठवलेल्या मालमत्तेबद्दल बोलतो. पाकिस्तान सांस्कृतिक देवाणघेवाणीवर प्रकाश टाकण्यास प्राधान्य देतो. बांगलादेशचा आग्रह आहे की माफी मागणे अद्याप बाकी आहे. सध्या, केवळ राजनैतिक गती जिवंत ठेवायची असेल तर दोन्ही बाजूंना हे विरोधाभास एकत्र राहू देण्यात समाधान वाटत आहे.

दार यांच्या भेटीमागील हेतूं प्रतीकवाद निर्विवाद आहे. हे एका दशकापेक्षा जास्त काळापासून गोठलेल्या संबंधांमध्ये पाकिस्तानचा पुन्हा प्रवेश दर्शवते आणि युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशची त्याच्या परदेशी संबंधांची पुनर्रचना करण्याची तयारी दर्शवते. पण प्रतीकवाद सत्य नष्ट करत नाही.

जोपर्यंत इस्लामाबाद 1971च्या अपूर्ण मुद्द्यांचा सामना करून उपाययोजना करत नाही, तोपर्यंत ढाकामधील प्रत्येक बैठकीत गर्दी असली तरी टेबलावर मंत्री आणि त्यांच्या मानगुटीवर 1971 ची भूतं असतील.

रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleकालापानीवरून भारत-नेपाळमध्ये व्यापार तणाव, मुख्य प्रकल्पही अनिश्चिततेत
Next articleफिजीचे पंतप्रधान राबुका यांचा दौरा, भारताचे पॅसिफिक लक्ष्य अधोरेखित करतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here