दीर्घकालीन रेल्वे संपामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरण्याची शक्यता

0
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा दूरचित्रवाणीवरील स्क्रीनग्रॅब. त्यांच्या सरकारला आशा आहे की संघटना आणि रेल्वे कंपन्या यांच्यातील मतभेद लवकरच मिळतील.

गुरुवारपासून पुकारण्यात आलेला रेल्वेचा संप अनेक आठवडे सुरू राहिल्यास कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला यंदा कोट्यवधी डॉलर्सचा फटका बसू शकतो, असा इशारा अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांनी दिला आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढतील.

मात्र हा संप एका आठवड्यापेक्षा कमी काळ राहिल्यास आर्थिक परिणाम कमीतकमी असतील, असे त्यांनी सांगितले.

या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज असल्याचे मान्य करत पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी गुरुवारी क्यूबेकमध्ये पत्रकारांना सांगितले की सध्या ठप्प असलेली देशव्यापी रेल्वे मालवाहतूक कशाप्रकारे हाताळली जाणार आहे याची योजना सरकार लवकरच जाहीर करेल.

कॅनडाच्या दोन सर्वात मोठे मालवाहतूक रेल्वे ऑपरेटर कॅनेडियन नॅशनल रेल्वे आणि कॅनेडियन पॅसिफिक कॅन्सस सिटी यांनी गुरुवारी दोन्ही कंपन्या आणि युनियन यांच्यातील कामगार करार पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर टीमस्टर्स युनियनशी संलग्न कामगारांवर बहिष्कार टाकला.

रेल्वे कंपन्यांचे म्हणण्यानुसार चर्चा फिसकटल्यानंतर अल्पावधीतच संप टाळण्यासाठी त्यांना टाळेबंदी करण्यास भाग पाडले गेले. टाळेबंदीबाबतचा निर्णय टेलिग्राफ या सोशल मीडियावर आधीच जाहीर केल्यामुळे, सीएन आणि सीपीकेसीकडे ग्राहकांना त्यांच्या  मालाची इतर मार्गांनी रवानगी करण्यासाठी, मालवाहतूक टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे आणि धोकादायक वस्तू अडकून पडणार नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी हातात पुरेसा वेळ होता.

“जर तुमच्याकडे एखादा संप सुरू असेल आणि तो प्रदीर्घ काळ लांबला तर तो खरोखरच विनाशकारी ठरू शकतो,” असा इशारा आर्थिक विचारवंत असलेल्या कॉन्फरन्स बोर्ड ऑफ कॅनडाचे मुख्य अर्थतज्ज्ञ पेड्रो अँट्यून्स यांनी दिला आहे.

दोन आठवड्यांच्या रेल्वे संपामुळे यंदा जीडीपीमध्ये 3 अब्ज डॉलर्सची घसरण होईल आणि चार आठवड्यांच्या संपामुळे 2024 मध्ये जीडीपीमध्ये सुमारे 10 अब्ज डॉलर्सची घट होऊ शकेल, असे ते म्हणाले. याशिवाय वर्षभरात 49 हजार नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसरा सर्वात मोठा देश असलेला कॅनडा, रसायने आणि मोटारगाड्यांसारख्या उत्पादित वस्तूंसह धान्य, खते आणि इतर वस्तूंची वाहतूक करण्यासाठी सीएन आणि सीपीकेसीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

कॅनडामध्ये दरवर्षी होणारी एकूण रेल्वे मालवाहतूक 380 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे, जी बहुतांश सीएन आणि सीपीकेसीच्यामार्फत चालते.

बीएमओ कॅपिटल मार्केट्सचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ रॉबर्ट कॅव्हिक यांच्या मते कॅनडाच्या बहुतांश रेल्वे मालवाहतुकीचा एकाच वेळी झालेला अभूतपूर्व संपामुळे “वृद्धिदर नकारात्मक तर महागाई दर सकारात्मक” होण्याची शक्यता आहे.

कॅव्हिक यांच्या अपेक्षेनुसार आर्थिक वाढीमुळे दर आठवड्याला सुमारे 0.1 टक्के गुण कमी होऊ शकतात, “पण संप जितका जास्त काळ चालेल तितका त्याचा प्रभाव वाढू शकतो”, असा इशारा त्यांनी दिला. याचा अर्थ जीडीपीच्या दृष्टीने दर आठवड्याला 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परिणाम होईल.

अर्थशास्त्रज्ञांच्या मते वाढती बेरोजगारी, जी गेल्या महिन्यात 30 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आणि पुढील वर्षी होणाऱ्या तारण नूतनीकरणात खर्च होणारी सुमारे 300 अब्ज कॅनेडियन डॉलर्स (220.78 अब्ज अमेरिकन डॉलर) एवढी रक्कम यामुळे आर्थिक परिस्थिती चांगलीच ताणली जाणार आहे.

या सगळ्यात रेल्वे संप प्रदीर्घ काळ चालला तर देशाला आर्थिक जडत्व येऊ शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.

स्कोटियाबँक येथील भांडवली बाजार अर्थशास्त्राचे प्रमुख डेरेक होल्ट म्हणाले की, एक ते तीन आठवड्यांच्या संपामुळे जीडीपीमध्ये 0.1 ते 0.2 टक्के इतकी मासिक घसरण होऊ शकते, पण संप जर तीन आठवड्यांनंतरही सुरूच राहिला तर प्रत्येक दिवसागणिक त्याचा आर्थिक परिणाम झपाट्याने वाढेल.

डेसजार्डिन येथील कॅनेडियन अर्थशास्त्राचे वरिष्ठ संचालक रँडल बार्टलेट म्हणाले की पूर्वीचे रेल्वे संप सहसा एक आठवडा किंवा 10 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहिलेले नाहीत.

“आताचाही संप जर आधीच्या सारखा अल्पकाळ टिकला तर त्याचा परिणाम कमी असेल,” असे ते म्हणाले, मात्र जर तो काही आठवड्यांनंतरही सुरूच राहिला तर होणारे आर्थिक नुकसान लक्षणीय असेल असेही ते म्हणाले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleIndia, US Sign Landmark Security of Supply Agreement
Next articleरशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढत असताना मोदी कीव दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here