‘एअरो इंडिया 2025’ : मित्र राष्ट्रांना सहकार्य करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन

0
एअरो
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत राजदूतांच्या बैठकीला संबोधित करताना

एअरो इंडियामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रांना एकत्रितपणे आपली बलस्थाने आणि क्षमतांचे आकलन करण्याची तसेच धोरणात्मक आणि सामरिक गरजा पूर्ण करण्याची संधी प्राप्त होते. यासाठी समविचारी राष्ट्रांनी सहकार्य करावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते.

“एअरोस्पेस लष्करी वर्चस्वाच्या नवीन सीमेचे प्रतिनिधित्व करते आणि धोरणात्मक निवारणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करते,” असे ते यावेळी म्हणाले. गोलमेज परिषदेसाठी 100 हून अधिक मित्र राष्ट्रांना आमंत्रित करण्यात आले होते, जे या क्षेत्रातील जागतिक भागीदारीला चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. सध्याच्या जागतिक सुरक्षा वातावरणाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकताना सिंह यांनी उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होऊ घातलेला एअरो इंडिया हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे जो जगातील आघाडीच्या एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांमधील अव्वल प्रदर्शकांना आकर्षित करतो. संरक्षण क्षेत्राच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांवर सहयोग करण्यासाठी 2025 चे हे प्रदर्शन राष्ट्रांना एक अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे यावर सिंह यांनी भर दिला.


एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक गंतव्यस्थान म्हणून उदयाला आला आहे. एअरो इंडिया 2025 देश, उद्योग क्षेत्रातील नेते आणि उद्योजकांना भागीदारी शोधण्यासाठी आणि संरक्षण तंत्रज्ञान आणि औद्योगिक उपक्रमांमध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग उघडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल,” असे ते म्हणाले.

सिंह यांनी पुढे नमूद केले की हा कार्यक्रम भागीदारीला चालना देण्यासाठी एक धोरणात्मक मंच प्रदान करेल जो सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास मार्ग तयार करताना भविष्यातील आव्हानांचा सामना करू शकेल. आशियातील सर्वात मोठ्या संरक्षण औद्योगिक परिसंस्थांपैकी एक असलेल्या भारताच्या संरक्षण औद्योगिक परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारची बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली.

याशिवाय भारताच्या संरक्षण उत्पादन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी यावेळी अधोरेखित केला तो म्हणजे भारतीय हवाई दलासाठी सी-295 वाहतूक विमान उत्पादन सुविधा स्थापन करणे. हा टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्यातील सहयोगी उपक्रम आहे.

एअरो इंडिया हे आशिया खंडातील असे एक सर्वात मोठे हवाईप्रदर्शन आहे, ज्यामध्ये अनेक राष्ट्र सीमांच्या पलीकडे जाऊन दृढ बंध तयार करतात.  व्यवसायाच्या वाढत्या संधी, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, संयुक्त विकास आणि विविध उद्योगांमधील सह-उत्पादन यासाठी धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याचे व्यासपीठ म्हणून हे प्रदर्शन एक उपयुक्त व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत एरोस्पेस आणि संरक्षणासाठी जागतिक केंद्र म्हणून स्वतःचे स्थान कायम ठेवत असताना, एरो इंडिया 2025 हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देणारा एक आधारस्तंभ असल्याचे मानले जाते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleRajnath Singh Invites Friendly Nations To Collaboration Ahead Of Aero India 2025
Next articleMyanmar Junta Airstrike In Rakhine Kills Over 40, UN says

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here