यावेळी आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की स्वावलंबन प्रदर्शनाच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये भारतीय नौदलाने मांडलेल्या स्प्रिंट आव्हानांतर्गत भारतीय उद्योगांकडून 2 हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यातील 155 प्रस्तावांची लक्ष्यित आव्हानांसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे 171 करार करता आले. तसेच, स्वावलंबन उपक्रम आयडीईएक्स अंतर्गत 213 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सशी जोडला गेला आहे. परिणामी 2 हजार कोटी रुपयांच्या 19 प्रकल्पांसाठी ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसीटी तयार करण्यात आली असून 784 कोटी रुपयांचे करार याआधीच पूर्ण झाले आहेत.
Raksha Mantri shri @rajnathsingh today launched ADITI 3.0 & DISC 13 for indigenous innovation during Naval Innovation and Indigenisation Organisation (NIIO) seminar ‘Swavlamban’ at Bharat Mandapam, New Delhi . Indian Navy received 2,000+ proposals from Indian industries.… pic.twitter.com/GTT3q1Zfx3
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) October 29, 2024
नवकल्पनांसाठी सरकारचा भक्कम पाठिंबा अधोरेखित करत, सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करू शकतील अशी उत्पादने विकसित करण्यासाठी त्यांनी नवप्रवर्तकांना आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन दिले. डिजिटल व्यवहारांचे यश आणि जनधन-आधार-मोबाईल (जेएएम) ट्रिनिटीवर प्रकाश टाकताना, या उपक्रमांमुळे सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशी वाढली आहे यावर त्यांनी भर दिला.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत, संरक्षणमंत्र्यांनी सर्व भागधारकांना एकत्र आणून सर्वसमावेशक प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या सहयोगी प्रयत्नांमुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या संयुक्त योगदानाला चालना मिळाली आहे असे त्यांनी अधोरेखित केले.यामुळे देशभरात वैज्ञानिक, तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण क्रांतीला चालना मिळाली आहे. नवोन्मेषाच्या वाढीचे श्रेय देशभरातील युवांच्या स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येला दिले. ही संख्या एक लाखांपेक्षा जास्त असून पैकी 100 तरी युनिकॉर्न्स असल्याचे त्यांनी नमूद केले. “संरक्षण उत्पादनात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या युवावर्गाच्या लक्षात आले आहे की नवोन्मेषाद्वारे देशाला आत्मनिर्भर बनवता येऊ शकते.”
या प्रसंगी बोलताना, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी देशाचे सागरी क्षेत्रातील हितसंबंध जोपासण्याप्रती नौदलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यासाठी 2047 पर्यंत संपूर्ण आत्मनिर्भर दल बनण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण नवोन्मेष संघटना (डीआयओ) आणि नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटना (एनआयआयओ) यांच्यातील सहकार्यावर त्यांनी भर दिला.
टीम भारतशक्ती