“Govt is creating ‘Adaptive Defence’ in India to deal with emerging challenges” said Raksha Mantri Shri @rajnathsingh while addressing the inaugural Delhi Defence Dialogue in New Delhi today. He called for adopting a collaborative approach to deal with contemporary problems.… pic.twitter.com/IN3JJTyYOh
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) November 12, 2024
उदयोन्मुख तंत्रज्ञान, बदलत्या युती आणि पारंपरिक संरक्षण संकल्पनांना नवीन आकार देण्याच्या नवीन परिचालन सिद्धांतांच्या परिवर्तनात्मक प्रभावाकडे संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. संकरीत आणि ग्रे झोनमधील युद्धामुळे पारंपरिक संघर्षाच्या रेषा अस्पष्ट होत असल्याने, बदलत्या धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सातत्यपूर्ण अनुकूलन हा भारताचा सर्वोत्तम दृष्टीकोन असल्याचे त्यांनी नमूद केले.
पारंपरिक सीमा धोक्यांपासून ते सायबर हल्ले, दहशतवाद आणि संकरीत युद्धापर्यंत भारताच्या व्यापक सुरक्षा आव्हानांवर प्रकाश टाकताना सिंह यांनी बदलत्या भू-राजकीय आणि तांत्रिक वातावरणात अनुकूल संरक्षण धोरणाच्या गरजेबद्दल सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. या धोरणांना पाठिंबा देण्यास सक्षम असलेली एक मजबूत, स्वावलंबी संरक्षण परिसंस्था तयार करण्यासाठी अलीकडे राबवण्यात येणाऱ्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी जोर दिला.
सध्याच्या डिजिटलीकरण आणि माहितीच्या अति प्रमाणात होत असलेल्या माऱ्याच्या युगात, संपूर्ण जग अभूतपूर्व प्रमाणात मानसिक लढ्याला तोंड देत आहे याकडे संरक्षणमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की,राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध होणाऱ्या माहितीविषयक युद्धाच्या धोक्याशी लढण्यासाठी ‘ॲडाप्टिव्ह डिफेन्स’ धोरणे अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार आहे.
उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) आणि सायबरस्पेसमध्ये भारताला अग्रेसर बनवण्यासाठी सिंह यांनी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. भारताच्या अफाट क्षमतेची दखल घेत, संरक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक क्षमता प्राप्त करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
शेवटी, संरक्षणमंत्र्यांनी ड्रोन आणि झुंड तंत्रज्ञान हे युद्धातील परिवर्तनकारी घटक असल्याचे अधोरेखित केले. “हे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी अनेक उपक्रम सुरू असून भारताचे जगातील ड्रोन केंद्र बनण्याचे उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे केवळ भारतीय अर्थव्यवस्थेलाच चालना मिळेल असं नाही तर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांमध्येही महत्त्वपूर्ण योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टीम भारतशक्ती