“एका गुप्तचर चिनी तंत्रज्ञान कंपनीने, अलीकडेच काढून टाकलेल्या अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी कंपन्यांचे नेटवर्क वापरले आहे,” असे नोकरीच्या जाहिराती आणि फसव्या प्रयत्नांचा पर्दाफाश करणाऱ्या एका संशोधकाचे म्हणणे आहे.
वॉशिंग्टन-आधारित थिंक टँक फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रॅसीजचे उदयोन्मुख धोक्यांवरील वरिष्ठ विश्लेषक मॅक्स लेसर म्हणाले की, नोकरी भरतीच्या जाहिराती देणाऱ्या काही चिनी कंपन्या “माजी सरकारी अधिकारी आणि AI संशोधकांना लक्ष्य करणाऱ्या बनावट सल्लागार आणि हेडहंटिंग फर्म्सच्या व्यापक नेटवर्कचा” भाग आहेत, ज्यांना डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांनी काढून टाकले होते.
मोजकीच माहिती उपलब्ध
रॉयटर्सचा अहवाल आणि लेसरच्या संशोधनानुसार, नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या चार कन्सल्टन्सी आणि रिक्रूटमेंट कंपन्यांबद्दल सार्वजनिकरित्या फारशी माहिती उपलब्ध नाही, ज्या काही प्रकरणांमध्ये ओव्हरलॅपिंग वेबसाइट शेअर करत होत्या, त्याच सर्व्हरवर होस्ट केल्या गेल्या होत्या किंवा इतर डिजिटल लिंक्स होत्या.
रॉयटर्सच्या रिपोर्टिंगदरम्यान, ज्या इंटरनेट सेवा कंपनीची वेबसाइट अनुपलब्ध झाली होती, त्या स्मियाओ इंटेलिजेंससह चार कंपन्यांच्या वेबसाइट एकाच IP Address ने होस्ट केल्या आहेत. रॉयटर्स, स्मियाओ इंटेलिजेंस आणि चार कंपन्यांमधील संबंधांचे स्वरूप निश्चित करू शकले नाहीत.
या चार कंपन्यांचा शोध घेण्याच्या वृत्तसंस्थेच्या प्रयत्नांना आणि स्मियाओ इंटेलिजेंसला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले, ज्यात अनुत्तरित फोन कॉल, आता काम न करणारे फोन नंबर, बनावट पत्ते, अनुत्तरित ईमेल आणि लिंक्डइनवरून हटवलेल्या जॉब लिस्टिंगचा समावेश आहे.
‘सुस्थापित’ तंत्रज्ञान
लेसर, ज्यांनी हे Chinese Spy नेटवर्क उघडकीस आणले आणि आपले संशोधन प्रकाशित होण्यापूर्वी Reuters सोबत शेअर केले, त्यांच्यानुसार ही मोहीम ‘स्तुस्थापित’ तंत्रज्ञानांचे अनुसरण करते, जे आधीच्या चीनी गुप्तचर ऑपरेशन्सद्वारे वापरले गेले आहेत आणि जे या क्रियाकलापाला महत्त्वपूर्ण बनवते.
“हे नेटवर्क अलीकडील मोठ्या प्रमाणात नोकरी गेल्यामुळे प्रभावित झालेल्या, माजी फेडरल कर्मचार्यांच्या आर्थिक असुरक्षिततेचा फायदा घेत आहे,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला.
या कंपन्या चीनी सरकारशी जोडल्या गेल्या आहेत की कोणत्याही माजी संघीय कर्मचाऱ्यांना भरती करण्यात आली आहे, हे रॉयटर्स ठरवू शकले नाही.
संशोधनाबद्दल विचारले असता, तीन गुप्तचर विश्लेषकांनी Reuters ला सांगितले की, “हे नेटवर्क विदेशी संबंधित संस्थांद्वारे कशाप्रकारे गुप्तचर माहिती गोळा करण्याचे एक आदर्श उदाहरण आहे, जे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ ने काढून टाकलेल्या किंवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपासून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
विश्लेषकांनी सांगितले की, “एकदा नेटवर्कद्वारे नियुक्त झाल्यानंतर, संघीय कर्मचाऱ्यांना सरकारी कामकाजाबद्दल वाढत्या प्रमाणात संवेदनशील माहिती सामायिक करण्यास सांगितले जाऊ शकते किंवा इच्छुक अथवा अनैच्छिक सहभागासाठी त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते तसेच अशा अतिरिक्त लोकांची शिफारस करण्यास सांगितले जाऊ शकते.”
वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासाच्या प्रवक्त्याने Reuters ला एक ईमेलद्वारे सांगितले की, ‘चीनला या मोहिमेत सामील असलेल्या कोणत्याही संस्थेविषयी कोणतीच माहिती नाही आणि बीजिंग कायमच डेटा गोपनीयता आणि सुरक्षेला प्राधान्य देते.’
चीनी हेरगिरी
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “चीनी सरकार सतत गुप्तचर कार्यवाही आणि दबावतंत्र वापरून अमेरिकेच्या ‘मुक्त आणि खुल्या प्रणाली’चे शोषण करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी, सक्रिय तसेच माजी सरकारी कर्मचाऱ्यांनी हा धोका ओळखावा आणि सरकारी माहितीचे संरक्षण करण्याचे महत्त्व समजून घ्यावे.”
CNN ने 28 फेब्रुवारी रोजी याविषयी अहवाल दिला की, “अमेरिकन गुप्तचर संस्थांना असा विश्वास आहे की, रशिया आणि चीन निराश अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आहेत, जे दोन्ही देश गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. नेटवर्कमधील कंपन्या, ज्या Craigslist, LinkedIn आणि इतर नोकरी साइट्सवर नोकरी जाहीराती पोस्ट करत होत्या, ते अशी ऑपरेशन्स चालू असल्याचे ठोस पुरावे असू शकतात,” असे लेसर म्हणाले.
रॉयटर्सने या महिन्याच्या सुरुवातीला अहवाल दिला की,उच्च सुरक्षा मंजुरी असलेल्या काही अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना मानक एक्झिट ब्रीफिंग देण्यात आले नव्हते, ज्यामध्ये काही प्रमाणात परदेशी विरोधकांनी संपर्क साधल्यास काय करावे हे समाविष्ट होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(Reuters च्या इनपुट्ससह)