‘दहशतवादाचा सामना’ करण्यात पाकिस्तान भूमिकेचे रुबियोंनी केले कौतुक

0

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची (LeT) शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटवर (TRF)  निर्बंध लादल्यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली, यावेळी दहशतवादविरोधी सहकार्याचे त्यांनी कौतुक केले आणि व्यापार तसेच प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली.

बैठकीनंतर रुबियो यांनी एक्सवर एक विधान शेअर केले ज्यामध्ये “दहशतवादाचा मुकाबला करण्यात आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यात पाकिस्तानच्या भागीदारीबद्दल” त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यासाठी आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री @MIshaqDar50 यांची भेट घेतली. दहशतवादाचा मुकाबला करण्यात आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यात पाकिस्तानच्या भागीदारीबद्दल मी त्यांचे आभार मानले,” असे रुबियो यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

द्विपक्षीय व्यापार

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी आणि जागतिक धोरणात्मक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे घटक म्हणून उदयास आलेल्या महत्त्वाच्या खनिजे तसेच खाणकाम क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांच्या मते, मंत्री रुबियो यांनी “इराणशी संवादात रचनात्मक योगदान देण्याची पाकिस्तानची सतत तयारी आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठीचे त्यांचे समर्पण” याबद्दल कौतुक केले.

अजेंड्यावरील प्रमुख बाबींमध्ये या ऑगस्टमध्ये इस्लामाबादमध्ये होणाऱ्या आगामी अमेरिका-पाकिस्तान दहशतवादविरोधी संवादाचा समावेश होता.

वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद संपूर्ण प्रदेशात समन्वित दहशतवादविरोधी उपक्रम वाढवण्याचा प्रयत्न करत असताना, ISIS-K सारख्या दहशतवादी गटांशी लढण्यासाठी संयुक्त प्रयत्न वाढवण्यावर चर्चा केंद्रित होती.

रुबियो यांनी “परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचे” महत्त्व अधोरेखित केले आणि  दुर्मिळ आणि धोरणात्मक संसाधनांच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर खनिज क्षेत्रात संयुक्त उपक्रमांच्या वाढत्या क्षमतेवर भर दिला.

इशाक दार यांचा अमेरिका दौरा

अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इशाक दार सध्या अमेरिकेच्या आठ दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत, त्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या महिन्याभराच्या फिरत्या अध्यक्षपदाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अनेक सत्रांचे अध्यक्षपद भूषवले आहे.

रुबियो यांनी अमेरिकेच्या सरकारने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT)  प्रॉक्सी असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटला (TRF)  परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) म्हणून घोषित करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच ही उच्चस्तरीय बैठक झाली.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली होती, ज्यामध्ये 25  पर्यटकांसह एक स्थानिक कर्मचारी मृत्युमुखी पडले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDeath Zone, Discipline, and Dreams: A Veteran’s Everest Story
Next articleIndia Joins AI Arms Race with Adani’s Arad – Assault Rifle That Thinks Before It Fires

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here