रशियाने कुर्स्कमधील युक्रेनियन सैन्यावरील हल्ले तीव्र केले

0
रशियाने
प्रादेशिक संरक्षण दलाच्या 110 व्या ब्रिगेडचे सैनिक, रशियन सैन्याच्या दिशेने D-30 हॉवित्झर गोळीबार करत आहेत. सौजन्य: रॉयटर्स

रशियाने तिथल्या ‘कुर्स्क’ प्रदेशातील आपला ताबा कायम ठेवण्यासाठी लढा देत असलेल्या, युक्रेनियन सैन्यावरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहे. सोबतच रशियाने युक्रेनची व्याप्ती असलेल्या पूर्व डोनेस्तक भागातही आपला दबाव वाढवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या सर्वोच्च लष्करी कमांडरने दिली आहे.

Ukrainian सैन्याने त्यांच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे की,  Kursk मधील चकमकींची संख्या गेल्या 24 तासांत 68 इतकी झाली असून, गेल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत हा आकडा प्रतिदीन  40 इतका होता.

या युद्धाला लवकरच तीन वर्ष पूर्ण होणार असून, युक्रेनियन सैन्य आता थकले आहे आणि 1,170 किलोमीटर लांबीच्या वॉर फ्रंटलाइनवर त्यांच्या सेनेचं संख्याबळ कमी पडत आहे.

“सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनिअन शत्रू, कुर्स्क प्रदेशात जोरदार हल्ले करत आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने सक्रियपणे उत्तर कोरियाच्या सैन्याचा वापर केला असून आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत’, अशी माहिती ऑलेक्झांडर सिर्स्की यांनी एका ऑनलाइन भाषणात सरकारी आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिली.

युक्रेनने ऑगस्टमध्ये रशियाच्या कुर्स्क प्रदेशात अचानक घुसखोरी सुरू केली होती. मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी तेथील 40% पेक्षा जास्त भूभाग गमावला आहे.

यावर लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रशियामधील घुसखोरीमुळे युक्रेनियन सैन्यावरील ताण अधिक वाढला आहे.

याविषयी बोलताना सिर्स्की म्हणाले की, ‘पूर्वेकडील डोनेस्तक प्रदेशातही हल्ल्यांचे प्रमाण वाढते आहे. जिथे रशियन सैन्याने यावर्षी त्यांच्या सर्वाधिक वेगाने प्रत्युत्तर दिले आहे.’ सरकारी आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांना सिर्स्की यांनी सांगितले की, ‘रशियन सैन्याने Pokrovsk आणि Kurahove या दोन मोक्याच्या शहरांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.’

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष- डोनाल्ड ट्रम्प हे पुढील महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये परत येण्यापूर्वी, कुर्स्कमधील या लढाईत अधिकच वाढ झाली आहे. त्यामुळे जवळपास तीन वर्ष जुने हे युद्ध संपुष्टात आणण्यासाठी युक्रेनने रशियाशी करार करण्यास तयार राहावे, असे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले आहे.

दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच म्हटले आहे की, रशियातील पुरुष सैन्यात भरती होण्यासाठी स्वेच्छेने मोठ्या संख्येने साइन अप करत आहेत. ही स्थिती युक्रेनच्या युद्धाला मॉस्कोच्या बाजूने पलटायला मदत करु शकते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले की, त्यांना आशा आहे की त्यांच्या सैन्यात नक्कीच वाढ होईल आणि भविष्यात अधिक सक्षम होईल.

‘रशियन सैन्याने याचवर्षी युक्रेनियन सैन्याला, जवळपास २०० वस्त्यांमधून यशस्वीपणे बाहेर काढले आणि आपली आघाडी सिद्ध केली’, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी संरक्षण मंत्रालयातील आपल्या भाषणात सांगितले. पुतिन यांच्या सैन्याने २०२२ पासून सर्वात वेगाने प्रगती केली आहे, असे खुल्या स्रोतांच्या नकाशानुसार दिसून येते.

टीम भारतशक्ती

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleNATO ने युक्रेनला लष्करी मदत मिळवून देण्याची जबाबदारी स्विकारली
Next articleपुढील दशकात नाटोशी लढण्यासाठी तयार रहा – रशियाचे संरक्षणमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here