दक्षिण कोरियाची AI-केंद्रित आर्थिक वाढीला चालना देण्याची योजना

0
AI
25 ऑगस्ट 2025 रोजी, वॉशिंग्टन, डी.सी. येथील द विलार्ड हॉटेलमध्ये, दक्षिण कोरिया-अमेरिका व्यवसाय गोलमेज परिषदेत, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग बोलत आहेत. सौजन्य: रॉयटर्स/अ‍ॅनाबेले गॉर्डन (फाइल फोटो)

दक्षिण कोरियाचे सरकार, येत्या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय खर्चात, गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी वाढ करणार आहे. हे पाऊल, नवे राष्ट्राध्यक्ष ली जे म्यूंग यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI- artificial intelligence) अधिक गुंतवणूक करण्याच्या धोरणाचे प्रतीक आहे.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक खर्च योजनेनुसार, वित्त मंत्रालयाने 2026 साठी एकूण 728.0 ट्रिलियन वॉन ($524.44 बिलियन) इतका सरकारी खर्च निश्चित केला आहे. हा खर्च 2025 च्या तुलनेत, 8.1% ने अधिक आहे. यावर्षीच्या 2.5% वाढीपेक्षा ही वाढ जास्त असून, 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. (या वर्षाच्या दोन पूरक अर्थसंकल्पांचा यात समावेश नाही).

4 जून रोजी पदभार स्विकारलेल्या राष्ट्राध्यक्ष म्यूंग यांनी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी विस्तारवादी वित्तीय धोरणाचे (expansionary fiscal policy) वचन दिले आहे. यापूर्वीची तीन वर्षे, त्यांचे पुराणमतवादी पूर्वसुरी यून सुक योल यांनी वित्तीय स्थिरतेला प्राधान्य दिले होते.

गेल्या आठवड्यात, अमेरिकेच्या वाढलेल्या शुल्कामुळे आणि दीर्घकालीन लोकसंख्या धक्क्यामुळे वाढीच्या अंदाजांमध्ये घट झाल्याने, सरकारने आर्थिक धोरणांची योजना जाहीर केली. यामध्ये AI गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

अर्थमंत्री कू यून-चोल म्हणाले की, “पुनर्प्राप्तीच्या ठिणगीला वाढवण्यासाठी वित्तीय धोरणाने ‘पंपला प्राइम’ करणे आवश्यक आहे.”

दुसऱ्या तिमाहीत, तंत्रज्ञानाच्या मजबूत निर्यातीमुळे आणि ग्राहक खर्चातील वाढीमुळे दक्षिण कोरियाची वाढ एका वर्षातील सर्वात जलद गतीने झाली, परंतु या महिन्यात अमेरिकेने लागू केलेल्या वाढीव शुल्कामुळे देशाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी, देशाच्या मध्यवर्ती बँकेने सलग दुसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवले, परंतु अमेरिकेच्या शुल्कामुळे वाढीवर होणाऱ्या परिणामाचा सामना करण्यासाठी आणखी शिथिलता आणण्याचे संकेत दिले.

मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये दक्षिण कोरियाची वित्तीय तूट (fiscal deficit) एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 4.0% पर्यंत वाढेल, जी 2025 मधील 2.8% पेक्षा जास्त आहे. कारण कर महसूल फक्त 3.5% नी वाढून 674.2 ट्रिलियन वॉन होण्याची शक्यता आहे. कर्ज आणि GDP चे गुणोत्तर (debt-to-GDP ratio) 48.1% वरून 51.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

विविध क्षेत्रांतील खर्चात वाढ

पुढील वर्षासाठी, सरकारने खर्चातील वाढ वार्षिक सरासरी 5.5% नी मर्यादित ठेवण्याची योजना आखली आहे, जी 2025-2029 पर्यंत लागू असेल. 2019 पर्यंत कर्ज ते GDP गुणोत्तर 58.0% पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.

दक्षिण कोरियाचा सामाजिक कल्याणावरचा खर्च- 2026 मध्ये, 8.2% नी वाढून 269.1 ट्रिलियन वॉन होईल. देशाचा घटता जन्मदर (जो जगात सर्वात कमी आहे) वाढवण्यासाठी सरकार अधिक योजना सुरू करणार आहे.

संशोधनावरील खर्च- विक्रमी 19.3% नी वाढून AI गुंतवणुकीसाठी 35.3 ट्रिलियन वॉन होईल. शुल्क-प्रभावित निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी औद्योगिक धोरणांवरील खर्च- 14.7% नी वाढून 32.3 ट्रिलियन वॉन होईल. तसेच, जागतिक स्तरावर भरभराटीस आलेल्या सांस्कृतिक उद्योगाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील खर्च- 8.8% नी वाढून 9.6 ट्रिलियन वॉन होईल.

संरक्षण खर्च वाढवण्याच्या अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे तो 8.2% नी वाढून 66.3 ट्रिलियन वॉन (GDP च्या सुमारे 2.4%) होईल.

2026 मध्ये, सरकार 232 ट्रिलियन वॉन ची सरकारी रोखे (treasury bonds) जारी करेल. रोख्यांमधील निव्वळ वाढ 115.7 ट्रिलियन वॉन अपेक्षित आहे आणि वित्तीय तुटीची पूर्तता करण्यासाठी 110 ट्रिलियन वॉन ची योजना आहे.

डॉलर-आधारित आणि वॉन-आधारित परकीय चलन स्थिरीकरण रोख्यांची (foreign exchange stabilisation bonds) कमाल मर्यादा अनुक्रमे $1.4 बिलियन आणि 13.7 ट्रिलियन वॉन निश्चित करण्यात आली आहे.

हा अर्थसंकल्प मंजूर होण्यासाठी नॅशनल असेंब्लीकडे सादर केला जाईल, जिथे सध्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आहे.

(1 डॉलर = 1,388.1500 वॉन)

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत आणि अमेरिकेने प्रमुख संरक्षण भागीदारीला दिली गती
Next articleTheatre Commands: Towards A Unique Indian Model Inspired By Global Best Practices

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here