श्रीलंका-भारत ‘नौदल सराव 2024’ सोहळ्याला आजपासून प्रारंभ

0
श्रीलंका-
भारत-श्रीलंका सागरी सराव 'SLINEX-24', विझाग येथे 17-20 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

श्रीलंका-भारत ‘नौदल सराव 2024 (SLINEX-24)’ ला आजपासून सुरुवात होणार असून,  17 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत, पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली, विशाखापट्टणम (Vizag) येथे हा द्विपक्षीय नौदल सराव पार पडेल. 2005 मध्ये सुरू झालेला, हा वार्षिक सराव दोन्ही देशांमधील सागरी सहकार्याचा आधारस्तंभ बनला आहे, जो प्रादेशिक सुरक्षा आणि परस्पर सहयोगासाठी दोन्ही राष्ट्रांची वचनबद्धता दर्शवितो.

भारतीय नौदलानुसार, SLINEX-24 हा विशेष सराव दोन टप्प्यांमध्ये होईल:  यामध्ये पहिली असेल ‘हार्बर फेज’ (Harbour Phase) जी 17-18 डिसेंबर रोजी होईल आणि दुसरा टप्पा असेल ‘सी फेज’ (Sea Phase) 19-20 डिसेंबरला पार पडेल. हार्बर टप्प्यादरम्यान, दोन्ही देशांचे नौदल कर्मचारी व्यावसायिक देवाणघेवाण, ऑपरेशनल नियोजन सत्रे आणि सौहार्दपूर्ण परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी सामाजिक संवाद साधतील. तर ‘सी फेज’ मध्ये, India आणि Sri Lanka या दोन्ही देशांतील स्पेशल फोर्सेसचे सराव तसेच तोफखाना कवायती, कम्युनिकेशन प्रोटोकॉल, सीमनशिप सराव, नेव्हिगेशन इव्होल्युशन आणि समन्वित हेलिकॉप्टर ऑपरेशन्स यासह प्रगत संयुक्त ऑपरेशन्स यांचा समावेश असेल.

‘आयएनएस सुमित्रा युद्धनौका’ आणि ‘ईस्टर्न फ्लीटचे नौदल ऑफशोर पेट्रोल व्हेसेल’, त्यांच्या स्पेशल फोर्सेस युनिटच्या तुकडीसह भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करेल. तर श्रीलंका त्यांच्या बाजूने स्पेशल फोर्स टीमसह SLNS सयुरा, ऑफशोअर हे गस्ती जहाज उतरवेल.

मंगळवारी 17 डिसेंबरला ‘हार्बर टप्प्याच्या’ उद्घाटनाने, ‘Naval Exercise 2024’ समारंभाची अधिकृतपणे सुरुवात होईल. त्यानंतर सलग ३ दिवस, दोन्ही देशांची नौदलं अखंडपणे सागरी टप्प्यात संक्रमण आणि प्रदर्शन करताना दिसतील. ज्यादरम्यान ते आंतरकार्यक्षमता, सामरिक समन्वय आणि सर्वोत्तम सरावांची देवाणघेवाण वाढविण्यासाठी डिझाइन केलेले जटिल सराव पूर्ण करतील.

गेल्या काही वर्षांमध्ये, SLINEX ची व्याप्ती अधिक वाढली आहे. दोन्ही नौदलांना त्यांचे ऑपरेशनल समन्वय मजबूत करण्यासाठी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून SLINEX महत्वाची भूमिका बजावत आहे. यंदाच्या वर्षीचे मुख्य उद्दिष्ट, हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी संबंध भविष्याच्या दृष्टीने अधिक दृढ व सुरक्षित करणे आणि सागरी नियमांवर आधारित सुव्यवस्था राखण्यावर व वाढवण्यावर भर देणे हे आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleसैन्य माघारीनंतर एनएसए अजित डोवाल आणि यी यांच्यात होणार पुढील चर्चा
Next articleपाकिस्तानला देण्यात येणारे 50 कोटी डॉलर कर्ज जागतिक बँकेने केले रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here