चीन कोणत्याही एका देशासाठी ज्यावेळी धोकादायक बनतो तेव्हा तो जगासाठीदेखील धोकादायक असतो असे तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते म्हणाले की. म्हणूनच संरक्षणात्मक स्वावलंबन आणि परदेशी शस्त्रास्त्रांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी तैवान कठोर निर्णय घेत राहील.
प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी तैवान कठोर परिश्रम घेण्यासाठी तयार असल्याचे तैवानचे अध्यक्ष लाई यांनी तैपेई येथे झालेल्या एका परिषदेत सांगितले. या परिषदेचा उद्देश चीन विरुद्ध लोकशाही देशांच्या धोरणांमध्ये समन्वय साधणे हा आहे.
लोकशाही पद्धतीने शासन करणाऱ्या तैवानला आपला प्रदेश मानणारा चीन, तैवानच्या तीव्र आक्षेपांना न जुमानता, तैपेईवर बीजिंगचा सार्वभौमत्वाचा दावा स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यासाठी अनेक वर्षांपासून नियमित लष्करी सराव करत आला आहे.
कोणत्याही एका देशासाठी असणारा चीनचा धोका हा जगासाठी धोका आहे यावर मी जोर देऊ इच्छितो,” असे लाई यांनी तैपेई येथे इंटर-पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना (आयपीएसी) परिषदेत सांगितले. चीनवर टीका करणाऱ्या शेकडो राजकारण्यांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी संबंधित असणारा हा गट आहे.
आमच्या लोकशाही भागीदारांना हुकूमशाहीच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी,लोकशाहीचे संरक्षण छत्र कायम ठेवण्यासाठी तैवान सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही लाई म्हणाले.
किमान पाच देशांतील आठ खासदारांना तैवानला भेट देण्यापूर्वी चिनी अधिकाऱ्यांकडून ईमेल आणि फोन कॉल आल्याची नोंद आढळून आल्याचे आयपीएसीने एका निवेदनात म्हटले आहे.
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा संदर्भ देत पीआरसीच्या वार्षिक शिखर परिषदेत हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांचा आयपीएसी तीव्र शब्दांमध्ये निषेध करते,” असेही या निवेदनात म्हटले आहे. “लोकशाही पद्धतीने निवडून आलेले खासदार विविध कारणांनी तैवानला भेट देण्यास आणि त्यांचे समर्थन करण्यास मुक्त आहेत. निवडून आलेले खासदार म्हणून त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांचा हा सामान्य वापर आहे.”
बोलिव्हिया, कोलंबिया, स्लोव्हाकिया, उत्तर मॅसेडोनिया, बोस्निया आणि हर्झेगोव्हिना, याशिवाय एक अनाम आशियाई देश, यांमधील राजकारणी म्हणतात की तैवानला भेट देण्याआधी मजकूर, कॉल आणि तातडीच्या संदेशांचा आपल्यावर भडीमार झाला होता. तैवान भेट टाळावी यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आले होते.
इंटरपार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना हा प्लॅटफॉर्म 35 देशांतील खासदारांना एकत्र आणते जे लोकशाहीवर पीपल्स रिपब्लिक कब्जा मिळवण्याचा प्रयत्नाबाबत चिंतित आहेत.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)