टेस्ला कंपनीने आपल्या शोरूम्ससाठी, नवी दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांची निवड केली असून, भारतात इलेक्ट्रिक कार विकण्याच्या त्यांच्या बहुप्रतिक्षित योजनांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकेल आहे, असे सूत्रांनी सांगितले. कंपनीने या आठवड्यात, भारतातील शोरुम्ससाठी ‘स्टोअर व्यवस्थापक’ आणि ‘कस्टमर रिलेशनशीप मॅनेजर्स’ या पदांसाठी, 13
mid-level नोकरीच्या जाहिराती देखील पोस्ट केल्या आहेत.
अमेरिकन कार निर्माता- टेस्ला, गेल्या वर्षाच्या शेवटीपासून भारतात शो-रूमसाठी जागा शोधत आहे. ज्याद्वारे ते जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या- ऑटो मार्केटमध्ये आपली विक्री सुरू करू शकतील. 2022 मध्ये टेल्साच्या मार्केटमधील प्रवेशावर रोख लावण्यात आला होता, त्यानंतरचे त्यांचे हे एक महत्वाचे पाऊल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात, अमेरिकेत टेस्लाचे सीईओ- Elon Musk यांची भेट घेतली आणि स्पेस, मोबिलिटी आणि तंत्रज्ञानासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
Aerocity आणि BKC ला प्राधान्य
टेस्लाने नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील- Aerocity परिसरात, शोरूमसाठी भाडेतत्त्वावर जागा निवडली आहे, अशी माहिती चर्चेशी संबंधित दोन व्यक्तींनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.
एरोसिटी परिसरात हॉटेल्स, रिटेल आउटलेट आणि जागतिक कॉर्पोरेशनची अनेक कार्यालये आहेत.
तर मुंबईत, टेस्लाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील, BKC- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बिझनेस आणि रिटेल हबमधील जागा निवडली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली आणि मुंबई दोन्ही शोरूम्स सुमारे 5,000 स्क्वेअर फूट (464.52 स्क्वेअर मीटर) क्षेत्रफळात सामावलेली असतील, असेही सूत्रांनी सांगितले.
दोन्ही आऊटलेट्स उघडण्याच्या तारखा अद्याप ठरलेल्या नसल्या, तरी टेस्ला “इम्पोर्टेड EVs भारतात विकण्याची योजना आखत आहे आणि त्याअंतर्गत हा व्यवहार पूर्ण होत आहे,” असे पहिल्या व्यक्तीने सांगितले.
दरम्यान, टेस्लाने यावरील टिप्पणीच्या विनंतीला अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही.
टेस्लाद्वारे भारतात नोकरीच्या जाहिराती प्रदर्शित
टेस्लाने, भारतातील शोरुम्ससाठी ‘स्टोअर व्यवस्थापक’ आणि ‘कस्टमर रिलेशनशीप मॅनेजर्स’ अशा, 13 mid-level नोकरीच्या जाहिराती पोस्ट केल्या आहेत.
एलोन मस्क यांनी भारतामध्ये, इलेक्ट्रिक व्हेइकल्सवर सुमारे १००% उच्च आयात शुल्क लागू करण्यावर बरीच टीका केली आहे. टेस्लाने वारंवार हे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे, परंतु स्थानिक ऑटोमेकर्सने याला विरोध केला आहे कारण त्यांना वाटते की, टेस्लाचा भारतातील प्रवेश त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या योजनांना बाधा आणू शकेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी गेल्या आठवड्यात भारताच्या कारवरील उच्च शुल्कावर टीका केली होती, मात्र मोदींसोबतच्या बैठकीनंतर व्यापार करारावर लवकरात लवकर काम सुरु करण्यावर आणि टॅरिफ्सवर असलेली तणावाची स्थिती सोडवण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)