Ukraine: खार्कीव शहरावरील रशियाच्या हल्ल्यात 3 ठार, 17 जण जखमी

0

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, “खार्कीव शहरातील निवासी भागावर, रशियाने रात्रीच्या वेळेस केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. याशिवाय या हल्ल्यात 17 जण जखमी झाले आहेत. ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिका युक्रेनवर लवकरात लवकर शांतता करारासाठी दबाव टाकत आहे, जेणेकरून मॉस्कोने सुरू केलेले युद्ध थांबवता येईल.

युक्रेनमधील खार्कीव या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरावर, सोमवारी सकाळी झालेल्या ड्रोन हल्ल्यात 2 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला,” असे खार्कीव प्रांताचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह, यांनी टेलिग्रामद्वारे सांगितले. या हल्ल्याच्या एक दिवस आधीच शहरावर बॅलेस्टिक क्षेपणस्त्राचा हल्ला झाला होता.

सिनेहुबोव्ह यांच्या मते, “जखमींची संख्या वाढत जाण्याची शक्यता आहे.”

खार्कीवचे महापौर इहोर तेरेखोव्ह, यांनीही टेलिग्राद्वारे सांगितले की, “दोन्ही हल्ल्यांत 2 जण ठार आणि 17 जखमी झाले आहेत. यामध्ये 6 ते 17 वयोगटातील 6 मुले आहेत.”

“बचावकार्यात ढिगाऱ्याखालून एका महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली असून, ती जिवंत आहे,” असेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

खार्कीव शहर: नियमीत टार्गेट

खार्कीव शहर, जे रशियन सीमेजवळील ईशान्य युक्रेनमध्ये आहे, ते फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने पूर्ण युद्ध सुरू केल्यापासून, सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करत आहे.

याआधी झालेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात, सुमारे 1,000 हून अधिक खिडक्या फुटल्याची माहिती, गव्हर्नर सिनेहुबोव्ह यांनी दिली. तात्काळ काही रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागल्याचेही, त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

साक्षीदारांच्या मते, ‘वैद्यकीय कर्मचारी रस्त्यावर उतरून जखमींवर उपचार करत होते आणि बचाव पथके निवासी इमारतींच्या नुकसानीची पाहणी करत होती.’

‘दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात समी प्रांतातील 2 लोक जखमी झाले, तसेच याशिवाय किमान 12 घरांचे आणि एका शैक्षणिक संस्थेचे नुकसान झाले,’ असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

“शत्रू, समी प्रांतातील नागरी पायाभूत सुविधांवर जाणूनबुजून रात्रीच्या वेळी हल्ला करत आहे,” असे ओलेह सिनेहुबोव्ह यांनी टेलिग्रामद्वारे सांगितले.

या घटनेवर मॉस्कोने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन्ही बाजू, आजवरच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना लक्ष्य केल्याचे नाकारतात, मात्र हजारो सामान्य लोकांना जीव गमवावा लागला आहे आणि त्यातील बहुसंख्य मृत युक्रेनियन नागरिक आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जे शुक्रवारी अलास्का येथे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन युद्ध संपवण्यासंदर्भात चर्चा करत होते, त्यांनी युक्रेनला मॉस्कोसोबत करार करण्याचा सल्ला दिला आहे. “रशिया एक खूप मोठी शक्ती आहे पण ते (युक्रेन) नाहीत,” असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleरशियाने सार्वभौमत्वाचा आदर करावा- हंगेरीच्या पीटर मग्यार यांचे आवाहन
Next articleअमेरिका-पाक व्यापार करार आणि अनाकलनीय ट्रम्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here