भारतीय लष्करात वरिष्ठ पातळीवर झाले मोठे बदल

0
भारतीय
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांनी काल लष्कराचे उपप्रमुख म्हणून नवी दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयात सूत्रे स्वीकारली. लष्कराचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधी ते लखनौ येथील सेंट्रल कमांडचे कमांडिंग इन चीफ या पदावर कार्यरत होते. या पदावर गेले 16 महिने त्यांनी सेवा बजावली. रविवारी त्यांना पदोन्नती मिळाली. व्हाईस चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यामुळे रिक्त झालेल्या उपप्रमुख पदावर लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांची निवड झाली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतातील मिलिटरी अकादमी या संस्थांमधून सुब्रमणी यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डिसेंबर 1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये सेवेसाठी रुजू झालेले लेफ्टनंट जनरल सुब्रमणी ब्रिटनचे  जॉइंट सर्विस कमांड स्टाफ कॉलेज आणि नवी दिल्लीचे नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स पदवी मिळवली आहे आणि मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीजमध्ये एम फिल केले आहे.

जनरल द्विवेदी यांनी रविवारी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, लष्करातील पाच प्रमुख पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. लष्कराच्या सातपैकी चार कमांडमध्ये आता नवीन कमांडर नियुक्त झाले असून 1 जुलै रोजी या सगळ्यांनी नवीन पोस्टिंगची जबाबदारी स्वीकारली. लष्करप्रमुख आणि उप-प्रमुख यांच्यानंतर हे आठजण सर्वात वरिष्ठ लष्करी कमांडर असतात.

लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांच्या जागी सेंट्रल कमांडचे नेतृत्व स्वीकारले. त्यांची ही नवी भूमिका  धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाची आहे. ते इतर क्षेत्रांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील वास्तविक नियंत्रण रेषेसाठी जबाबदार असतील. ते उधमपूर येथील उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. लेफ्टनंट जनरल सेनगुप्ता यांनी पूर्वी लेह येथील 14 कॉर्प्सचे नेतृत्व केले होते, जिथे पूर्व लडाख आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे (एलएसी) व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.<

पुण्यात मुख्यालय असलेल्या लष्कराच्या दक्षिण कमांडमध्येही  नवीन कमांडरची नियुक्ती झाली. जयपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण-पश्चिम कमांडचे सध्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची दक्षिण कमांडमध्ये बदली करण्यात आली. भारतीय लष्कराने एक्स पोस्टद्वारे सांगितले की, आज एका समारंभात सेठ यांनी दक्षिण कमांडचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी उपस्थित आपल्या सहकाऱ्यांना क्रियात्मक सज्जतेवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि देशसेवेसाठी अत्यंत उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले.

लेफ्टनंट जनरल मंजिंदर सिंग हे दक्षिण-पश्चिमचे नवे कमांडर बनले आहेत. जयपूरमधील प्रेरणा स्थळ येथे श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी काल सप्तशक्ती कमांडचे नेतृत्व स्वीकारले. नैऋत्य कमांड ही भारतीय लष्कराची सातवी आणि सर्वात तरुण कमांड आहे. त्यामुळेच त्याला “सप्तशक्ती कमांड” असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सीमेवरील दक्षिण पंजाब आणि उत्तर राजस्थानवर देखरेख ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल. याआधी सिंग यांनी शिमला येथे मुख्यालय असलेल्या आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) नेतृत्व केले.

चंडीमंदिर येथे मुख्यालय असलेल्या लष्कराच्या पश्चिम कमांडचे सध्याचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांची शिमला येथील एआरटीआरएसी या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यांनीही काल लष्कराच्या प्रशिक्षण कमांडचे नेतृत्व स्वीकारले.

चार नियुक्त्यांव्यतिरिक्त सोमवारी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेः

लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांच्याकडून लेह स्थित 14 व्या कॉर्प्स किंवा “फायर अँड फ्युरी कॉर्प्स” ची कमान स्वीकारली. हा लष्कराचा उधमपूर स्थित उत्तर कमांडचा भाग आहे. चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी कारगिल-लेह भागात 14 व्या तुकडीची लष्करी तैनाती करण्यात आली आहे. ते सियाचीन ग्लेशियरचेही रक्षण करतात.

लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांच्याकडून खर्गा कॉर्प्सची कमान स्वीकारली. अंबालास्थित लष्कराच्या पश्चिम कमांडच्या नेतृत्वाखालील,  दुसऱ्या तुकडीला खर्गा स्ट्राइक कॉर्प्स म्हणून ओळखले जाते.

डॉ. रवी शंकर


Spread the love
Previous articleTop Brass Changes: Indian Army Welcomes New Vice Chief, 4 Commanders
Next articleFortifying Fleet: Significance of Nilgiri Class Frigates in Indian Naval Defence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here