तिन्ही दलांचे कमांडर्स समुद्रातील रात्रीच्या संयुक्त मोहिमांचे साक्षीदार

0
दलांचे
विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर तिन्ही दलांचे लष्करी कमांडर्स

भारताच्या तिन्ही दलांचे कमांडर्स देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर रात्रीच्या वेळी चालवल्या जाणाऱ्या मोठ्या संयुक्त मोहिमांचे निरीक्षण करण्यासाठी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर जमले होते. ही भेट तीन सशस्त्र दलांमधील एकत्रीकरण वाढवण्याच्या दिशेने  टाकण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. ट्रोपेक्स-25 या सरावात नौदल, लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) समन्वित क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले. या व्यापक कवायतीमध्ये उभयचर लँडिंगसारख्या संयुक्त मोहिमांचा समावेश होता, ज्यात नियुक्त केलेल्या किनारपट्टीच्या क्षेत्रांवर सैन्य आणि उपकरणे तैनात करणे समाविष्ट होते.

30 जानेवारीच्या रात्री, एकात्मिक संरक्षणदल प्रमुख लेफ्टनंट जनरल जॉन्सन पी. मॅथ्यू, लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम, नौदलाचे उप-प्रमुख व्हाईस ॲडमिरल के. स्वामीनाथन, भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एस. पी. धारकर आणि लष्कर महासंचालक इन्फंट्री लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी जहाजावर उपस्थित होते.

भारतीय हवाई दलाचे व्हाईस चीफ एअर मार्शल धारकर यांनी नौदलाच्या मिग-29के लढाऊ विमानातून उड्डाण केले तेव्हा तो एक विलक्षण क्षण होता. आयएनएस विक्रांतच्या डेकवरून उड्डाण करत, विमानाने रात्री समुद्रावर उड्डाण केले, जे हवाई दल आणि नौदल यांच्यातील घनिष्ठ सहकार्याचे प्रतीक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रोपेक्स-25 च्या संयुक्त सरावाचे निरीक्षण केले, ज्याची रचना आंतरसेवा समन्वयाची चाचणी घेणे आणि वाढ होणे यासाठी करण्यात आली आहे. या सरावामध्ये नकली हवाई हल्ले, पाणबुडीविरोधी युद्ध कवायती आणि उभयचर मोहिमांचा समावेश होता, ज्यात येणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी संयुक्त सज्जतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन केले गेले.

याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, कमांडर्सनी उभयचर युद्ध सराव ॲम्फेक्सचा देखील आढावा घेतला, ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर उतरणे आणि तिन्ही सेवांचा समावेश असलेल्या इतर जटिल युद्धाशी संबंधित डावपेचांवर लक्ष केंद्रित केले गेले. या विमानवाहू जहाजाच्या युद्ध कक्षात बंद दरवाज्याआड झालेल्या ब्रीफिंगने ऑपरेशनल डावपेचांचे मूल्यांकन करण्याची आणि भविष्यातील सहकार्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.

या भेटीने तिन्ही सेवादलांमधील अखंड समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः ज्यावेळी  भारत थिएटर कमांडची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रगती करत आहे त्यावेळी अशी संकल्पना विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये तिन्ही सैन्यदलांच्या युद्धकालीन प्रयत्नांना एकाच कमांडमध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने आहे.

समुद्रात रात्र घालवल्यामुळे, अधिकाऱ्यांना नौदलाच्या मोहिमांबद्दल आणि बहुक्षेत्रीय युद्धाच्या आव्हानांबद्दल प्रत्यक्ष अंतर्दृष्टी मिळाली. ट्रोपेक्स-25 आणि ॲम्फेक्ससारख्या सरावांमुळे सशस्त्र दलांची सज्जता सिद्ध होते आणि भारताच्या सागरी तसेच प्रादेशिक हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे उदाहरण मिळते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleExpectations From Defence Budget 2025-26
Next articleCoast Guard Won’t Allow Seas to Become Playgrounds for Illicit Activities: DG

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here