फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअपसाठी आवश्यक असणाऱ्या मेटा तंत्रज्ञानाला, मोठ्या तांत्रिक समस्येचा फटका बसला ज्यामुळे जगभरातील हजारो वापरकर्ते डिजिटल वापरापासून वंचित राहिले.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या समस्येला सुरुवात झाली. सेवेतील अडथळ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या डाऊनडिटेक्टर या संकेतस्थळानुसार, 12 हजार अमेरिकन वापरकर्त्यांनी यासंदर्भात आपला निषेध नोंदवला. भारतात 20हजारहून अधिक, ब्रिटनमध्ये 46हजार तर ब्राझीलमध्ये 42हजार वापरकर्त्यांनी त्यांची निराशा व्यक्त केल्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये सोशल मीडियाबाबत परिस्थिती प्रतिकूल होती.
आउटेजची बातमी पसरताच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचा राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी एक्स, (पूर्वीचे ट्विटर) माध्यमाचा उपयोग केला.तिथे व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रियांनी काही काळ मनोरंजन केले. एका वापरकर्त्याने थट्टा करत लिहिले आहे, “प्रत्येकजण भूकंपाप्रमाणे ट्विटर एक्सकडे धावत आहे जेव्हा #WhatsApp बंद पडते!” “#WhatsApp डाऊन असल्यास लोक ट्विटर एक्सकडे धाव घेतात”, अशी प्रतिक्रिया आणखी एकाने दिली आहे.
मेटाचे ॲप बंद होण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात (मार्च महिन्यात) फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सची सेवा खंडीत झाली होती. मेटा कंपनीचे फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्राम हे ॲप्स जेव्हा जेव्हा बंद होतात, तेव्हा युजर्ससमोर वेळ कसा घालवायचा असा यक्षप्रश्न उपस्थित होतो.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून कोणताही प्रतिसाद नसताना व्हॉटसॲपने वापरकर्त्यांना समस्या येत असल्याची कबूली देत एक निवेदन जारी केले आणि “शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी गोष्टी 100 टक्के रुळावर परत आणण्यावर” काम करण्याचे आश्वासन दिले.
We know some people are experiencing issues right now, we’re working on getting things back to 100% for everyone as quickly as possible
— WhatsApp (@WhatsApp) April 3, 2024
मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार कपात केल्यानंतर मेटामध्ये मंदी आली आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात झुकेरबर्गने म्हटले होते की, कंपनी “आपल्या टीमचा आकार सुमारे 13 टक्क्यांनी कमी करत आहे आणि आमच्या 11हजारहून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना जाऊ देत आहे”. त्यांनी असा विश्वास देखील व्यक्त केला की मेटा “या मंदीतून पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि अधिक लवचिकपणे बाहेर येईल”.
तोपर्यंत, वापरकर्त्यांना त्यांचे दैनंदिन विचार, व्हायरल मीम्स आणि काळजीपूर्वक तयार केलेले रिल्स आणि फोटो शेअर करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागतील-कदाचित समोरासमोर संवाद साधण्याच्या प्राचीन कलेकडे परत जाणे किंवा त्याहूनही अधिक अविश्वसनीय म्हणजे पुस्तकांकडे वळणे.
रामानंद सेनगुप्ता