गेल्या आठवड्यातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला आणि दीर्घकाळापासून राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा केली.
धगधगत्या शेकोटीसमोर बैठकीची सुरुवात करताना “स्वागत आहे, परत स्वागत आहे,” अशा शब्दांमध्ये बायडेन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले.
सत्तेचे हस्तांतरण सुरळीत व्हावे आणि “तुम्हाला सामावून घेतले जाईल याची खात्री करण्यासाठी” सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी बायडेन यांनी ट्रम्प यांना दिले. “ते शक्य तितके सुरळीत होईल,” असे ट्रम्प म्हणाले.
बायडेन – ट्रम्प यांचे संबंध
गेली अनेक वर्षे हे दोन्ही नेते एकमेकांवर कायम टीका करत आले आहेत. हवामान बदल असेल किंवा रशियाबरोबरचे संबंध किंवा व्यापारविषयक धोरणे या सगळ्याच बाबतीत त्यांच्या भूमिका खूपच वेगळ्या आहे.
81 वर्षीय बायडेन यांनी ट्रम्प हे लोकशाहीसाठी धोका आहेत अशाप्रकारे टीका केली आहे, तर 78 वर्षीय ट्रम्प यांनी बायडेन हे देशाचा कारभार सांभाळण्यासाठी अक्षम असल्याची टीका केली आहे. 2020 ची निवडणूक बायडेन यांच्याकडून हरल्यानंतर ट्रम्प यांनी आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे खोटे दावे केले होते.
ट्रम्प यांच्या गाड्यांचा ताफा कडक सुरक्षा असलेल्या व्हाईट हाऊस गेटवर आला आणि ज्यांनी 2020 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला त्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणजेच बायडेन यांनी भावी रिपब्लिकन अध्यक्षांचे ओव्हल ऑफिसमध्ये स्वागत केले.
व्हाईट हाऊसच्या वाहनतळाच्या बाहेर, काहीतरी मोठी बातमी मिळेल या अपेक्षेने पत्रकारांची प्रचंड गर्दी जमली होती.
ट्रम्प यांचा विजयी जल्लोष
ट्रम्प यांनी दिवसाच्या सुरुवातीला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये निवडून आलेल्या रिपब्लिकनांसमवेत आपला विजय साजरा केला. 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीचे निकाल येत असताना रिपब्लिकन पक्षाला हाऊसवर आपले नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
“जिंकणे चांगले नाही का? जिंकणे आनंददायी आहे. जिंकणे नेहमीच चांगले असते,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले. “सभागृहाने खूप चांगले काम केले,” असाही त्यांनी उल्लेख केला.
डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन देण्यापूर्वी 2024 च्या निवडणुकीत सुरुवातीला ट्रम्प यांच्याविरुद्ध उभे असलेले बायडेन, ओव्हल ऑफिसमध्ये माजी आणि भावी अध्यक्षांचे स्वागत करतील. मावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षांचे स्वागत करण्याची परंपरा 2020 मध्ये बायडेन जिंकल्यावर रिपब्लिकन असलेल्या ट्रम्प यांनी पाळली नव्हती.
ट्रम्प यांना आमंत्रित करण्याच्या बायडेन यांच्या निर्णयाबद्दल व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरीन जीन-पियरे म्हणाल्या, “त्यांचा नियमांवर विश्वास आहे, त्यांचा आपल्या संस्थेवर विश्वास आहे, शांततापूर्ण पद्धतीने सत्ता हस्तांतरण करण्यावर त्यांचा विश्वास आहे.” मंगळवारी पत्रकारांसाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
व्हाईट हाऊसच्या गेटच्या बाहेर, 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर होणाऱ्या संचलनादरम्यान व्हीआयपी आणि पाहुण्यांना बसण्यासाठी स्टँडचे बांधकाम आधीच सुरू झालेले असल्याने सत्ता हस्तांतरणाची चाहूल आधीच लागली होती.
संक्रमण थंडावले?
बायडेन या बैठकीचा वापर सातत्य दाखवण्यासाठी करू इच्छित असले, तरी संक्रमण अंशतः थंडावले आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या चमूने आगामी अध्यक्षांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे, मात्र अशा करारांवर स्वाक्षरी केलेली नसल्याने कार्यालयीन जागा आणि सरकारी उपकरणे तसेच सरकारी अधिकारी, सुविधा आणि अशीच माहिती मिळू शकेल.
ट्रम्प आणि व्हान्स यांचे संक्रमण वकील बायडेन-हॅरिस प्रशासनाच्या वकिलांशी अध्यक्षीय संक्रमण कायद्याने विचारात घेतलेल्या सर्व करारांबाबत रचनात्मकपणे संवाद साधत आहेत,” असे ट्रम्प संक्रमण प्रवक्ते ब्रायन व्हान्स यांनी सत्तेच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्याचा संदर्भ देत सांगितले.
पार्टनरशिप फॉर पब्लिक सर्व्हिस सेंटर फॉर प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशनचे संचालक व्हॅलेरी स्मिथ बॉयड, ज्या येणाऱ्या प्रशासनाला ना नफा तत्वावर सल्ला देणार आहेत त्यांच्या मते करार हे अधोरेखित करतो की अमेरिकेमध्ये एका वेळी फक्त एकच अध्यक्ष असतो आणि त्याने कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक फायदा विचारात न घेता नैतिक करारांवर स्वाक्षरी करण्याची प्रतिज्ञा त्यात समाविष्ट असते.
“फेडरल एजन्सींशी संवाद साधण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. “सर्व काही त्यावर अवलंबून आहे.”
धोरणांबाबत चर्चा
फेडरल एजन्सींबरोबरच्या बैठकांव्यतिरिक्त, बायडेन आणि ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणासह असंख्य विषयांवर चर्चा केली.
सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ट्रम्प यांना रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हॅरिस यांना पराभूत करून विजयी झालेल्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे कीवसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यातच ट्रम्प यांनी कोणत्या मार्गाने हे स्पष्ट न करता युद्ध लवकर संपवण्याचे वचन दिले आहे.
जीन-पियरे यांनी या बैठकीपूर्वी दोघांमधील चर्चेच्या मुद्द्यांची रूपरेषा सांगण्यास नकार दिला.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)