![Trump on Mumbai Attacks हल्ल्यातील](https://bharatshakti.in/wp-content/uploads/2025/02/Trump-on-Mumbai-Attacks.jpg)
अमेरिकेने, 2008 च्या मुंबई हल्ल्यातील संशयिताच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली असल्याचे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हाईट हाऊस येथील संयुक्त पत्रकार परिषदेत, ट्रम्प यांनी या निर्णयाची पुष्टी केली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील हॉटेल्स, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरवर तीन दिवस सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यात, 166 लोक मारले गेले. भारताचे म्हणणे आहे की, पाकिस्तानस्थित इस्लामी गट लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्यांचे आयोजन केले होते, मात्र पाकिस्तान सरकारने यातील आपल्या सहभागाला नाकारले आहे.
पत्रकारपरिषदेत बोलतेवेळी ट्रम्प म्हणाले की, ”माझ्या प्रशासनाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कटकारस्थानातील दुष्ट लोकांच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे, याचा मला आनंद आहे. भारतात परतल्यावर त्याचा योग्य तो न्यायनिवाडा होईल अशी मी खात्री बाळगतो.”
संशयित आरोपी- तहव्वूर राणा
ट्रम्प यांनी यावेळी बोलताना, मुंबई हल्ल्यातील संशयित आरोपी तहव्वूर राणा चे नावही जाहीर केले, ज्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी मिळाली आहे. दोन्ही बाजूच्या संयुक्त निवेदनानुसार, तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा शिकागोतील एक व्यापारी आणि कॅनडाचा नागरिक आहे.
संयुक्त भारत-यू.एस. निवेदनात भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानला भारतावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये गुंतलेल्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यास आणि आपल्या भूभागाचा उपयोग दहशतवादासाठी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाकिस्तान सरकारने अतिरेकी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे.
गेल्या महिन्याच्या अखेरीस, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाच्या प्रत्यार्पणाविरुद्ध पुनर्विचाराची याचिका फेटाळली होती.
लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल राणाला यापूर्वी अमेरिकेच्या फेडरल जेलमध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती.
शिख फुटीरतावादी स्कॅनर
ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत अमेरिकेतील शीख फुटीरतावाद्यांबद्दलही विचारण्यात आले, ज्यांना भारत सुरक्षेतील धोका मानतो. कारण शीख फुटीरतावादी खलिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र मातृभूमीला भारतातून वेगळे करण्याची मागणी करतात.
ट्रम्प यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही, परंतु भारत आणि अमेरिका यांनी अशाप्रकारच्या समस्यांवर एकत्र काम केले असल्याचे ते म्हणाले.
2023 पासून, भारताने अमेरिका आणि कॅनडामधील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य केल्याने, यूएस-भारत संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत, वॉशिंग्टनने एक माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर, यू.एस.चे प्लॅन्स अयशस्वी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ‘आम्ही अमेरिकेने लावलेल्या आरोपांची चौकशी करत आहोत,’ अशी प्रतिक्रीया भारताने दिली आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)