बंदी असूनही, तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत ट्रम्प गंभीर

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘अमेरिकेच्या संविधानाने बंदी घातली असली, तरी ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत गंभीर आहेत,’ असे जाहीर केले. मात्र याबबत घाईघाईत विचार करणार नसल्याचेही ते म्हणाले.

20 जानेवारीला व्हाईट हाऊसमध्ये, दुसऱ्यांदा अप्रत्यक्ष कार्यकाळासाठी पदभार स्विकारणाऱ्या ट्रम्प यांनी, एनबीसी न्यूजला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत, ‘ते राष्ट्रपतीपदाच्या तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्न करणार’ असल्याचे संकेत दिले.

“No, I’m not joking. I’m not joking,” असे ट्रम्प मुलाखतीदरम्यान ठामपणे म्हणाले, मात्र सोबतच त्यांनी याबाबत घाईघाईत कोणताही विचार करणार नसल्याचेही सांगितले.

“तुम्हाला कल्पना आहे की, असा निर्णय घेणे सोपे नाही, त्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत,” असेही ते यावेळी म्हणाले, परंतु या प्रक्रियांबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

भविष्यातील मोठी आव्हाने

अमेरिकेच्या संविधानातील 22व्या दुरुस्तीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे सलग किंवा न थांबता दोन ते चार वर्षांच्या टर्मपर्यंतच मर्यादित आहेत.

याबाबतची घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या प्रस्तावासाठी, काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश मत आणि 50 अमेरिकन राज्यांपैकी तीन-चतुर्थांश राज्यांच्या कायदेमंडळांनी मान्यता आवश्यक आहे.

ट्रम्प यांच्या काही सहयोगींनी 2028 नंतर, त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये कायम ठेवण्याची कल्पना मांडली आहे आणि राष्ट्रपतींनीही अनेक प्रसंगी त्यांच्या राजकीय विरोधकांना यावरुन टोमणे मारले आहेत.

ट्रम्प, त्यांच्या शपथविधीच्यावेळी 78 वर्षांचे सर्वात वयस्कर अमेरिकन अध्यक्ष होते, त्यामुळे जर नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर त्यांनी आणखी चार वर्षांचा पदभार स्विकारला तर ते 82 वर्षांचे होतील.

ट्रम्प 1951 च्या दुरुस्तीला आव्हान देणार का?

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी, 1796 मध्ये दोन कार्यकाळांच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा सुरु केली, ज्यात स्वंयघोषित मर्यादेचा समावेश होता, जी 140 पेक्षा जास्त वर्षे बहुतेक अमेरिकी राष्ट्रपतींनी पाळली, 1940 मध्ये फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्यापर्यंत ही प्रथा पाळली गेली.

रूझवेल्ट, जो डेमोक्रॅट होते आणि ज्यांनी ग्रेट डिप्रेशन आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतली, त्यांनी तेव्हा प्रसंगानुरुप या परंपरेला तोडत, तिसऱ्या टर्ममध्येही राष्ट्राध्यक्ष म्हणून आपली सेवा कार्यरत ठेवली. 1945 मध्ये चौथ्या कार्यकाळाच्या काही महिन्यांनंतर त्यांचे निधन झाले. यामुळे 1951 मध्ये कार्यकाळाच्या मर्यादेत दुरुस्ती केली गेली.

ट्रम्प यांचे दीर्घकालीन सल्लागार स्टीव्ह बॅनन, यांनी 19 मार्च रोजी न्यूजनेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “त्यांना विश्वास आहे की, ट्रम्प 2028 मध्ये पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहतील. ट्रम्प आणि त्यांच्यासोबतचे आणि इतर लोक त्याच उद्देशाने काम करत आहेत.” “यामध्ये कार्यकाळाच्या मर्यादेसंबंधीत परिभाषेची तपासणी केली जात असून, आम्ही देखील यावर काम करत आहोत,” असे बॅनन यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleUpgrading India’s Artillery: Faster, Stronger, Smarter
Next articleट्रम्प यांची रशियन तेलावर कर लावण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here