मिनेसोटा येथे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडून धडाक्याने सुरू करण्यात आलेल्या प्रचारानंतर आपल्या प्रचाराला पुन्हा गती मिळवण्याचा प्रयत्न ट्रम्प करीत आहेत. मागील आठवड्यातच नवीन डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
या रॅलीमुळे ट्रम्प उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार सिनेटर जे. डी. व्हान्स यांच्यासमवेत मध्यपश्चिम राज्यात उपस्थित राहणार आहेत. मात्र या राज्याने गेल्या 52 वर्षांत रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवलेली नाही. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याआधीच ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून या राज्यात आपले मैत्रीपूर्ण संबंध वाढवत आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत.
बायडेन यांनी शर्यतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करताना मागील रविवारी त्यांच्या जागी हॅरिस यांना आपले समर्थन दिल्याचे जाहीर केले. उपराष्ट्रपती म्हणून काम करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आणि पहिली आशियाई अमेरिकन अशी ओळख असणाऱ्या हॅरिस यांना झपाट्याने डेमोक्रॅटिक पक्षाचा पाठिंबा मिळत गेला. काही मोजक्या जनमत चाचण्यांवरून असे दिसून आले होते की 81 वर्षीय बायडेन हे डिबेटमधील निराशाजनक कामगिरीनंतर पराभूत झाल्याचे मानले जात होते.
सेंट क्लाउड, मिनेसोटा येथे ट्रम्प यांचा प्रचार कार्यक्रम 8 हजार आसनव्यवस्था असलेल्या हॉकीच्या मैदानात झाला. दोन आठवड्यांपूर्वी पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या एका सभेत त्यांच्यावर हल्ला करण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर मोठे आणि खुल्या जागेत होणारे कार्यक्रम टाळण्याची शिफारस अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने केली होती. त्याचेच पालन करत यावेळी एका इनडोअर स्टेडियमची निवड करण्यात आली.
1972 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्यानंतर कोणताही रिपब्लिकन उमेदवार मिनेसोटा जिंकू शकलेला नाही.
कमला हॅरिस यांचा निधी उभारणी कार्यक्रम
कमला हॅरिस या आठवड्यातील त्यांच्या प्रचार मोहिमांचे कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारी एका खाजगी निधी उभारणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मोहिमेबद्दलच्या संकल्पना मांडल्या.
हॅरिस यांच्या प्रचार मोहिम समन्वयकाने सांगितले की, पिट्सफिल्ड, मॅसॅच्युसेट्स येथील निधी उभारणी करणाऱ्या कार्यक्रमात गायक – गीतकार जेम्स टेलर आणि सुमारे 800 उपस्थितांसह 14 लाख डॉलर्सपेक्षा जास्त निधी गोळा केला जाईल.
वकील म्हणून आधी कार्यरत असलेल्या हॅरिस यांनी आपल्या पार्श्वभूमीची तुलना दोषी, गुन्हेगार म्हणून सध्या ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांच्याशी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपली प्रचार मोहीम भविष्याकडे पाहण्याबद्दल आहे, तर ट्रम्प यांची देशाला भूतकाळात नेण्याची इच्छा आहे, असा युक्तिवादही हॅरिस यांनी केला आहे.
हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिकिट मिळणार या आशावादामुळे प्रचार मोहिमेला पुन्हा एकदा ऊर्जा मिळाली आहे. त्याआधी 78 वर्षीय ट्रम्प यांना पराभूत करण्याच्या बायडेनच्या संभाव्यतेबद्दल किंवा ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यात यशस्वी झाले तरी प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल डेमोक्रॅट्सच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. त्याचा परिणाम प्रचार मोहिमेवरही पडला होता.
बायडेन यांच्या माघारीनंतर, हॅरिस यांच्या आतापर्यंतच्या मोहिमेनुसार, 36 तासांत 10 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.
ट्रम्प-व्हान्स
उच्च चलनवाढीला आळा घालण्यात आणि मेक्सिकोच्या दक्षिणेकडील सीमेवर स्थलांतरितांची वाढ रोखण्यात बायडेन प्रशासन अपयशी ठरले आहे या आपल्या मतात ट्रम्प आणि व्हान्स यांनी हॅरिस यांनाही आता गोवले आहे. रिपब्लिकनांनीही हॅरिस या बायडेन यांच्यापेक्षा अधिक उदारमतवादी आणि काहीशा अतिरेकी मताच्या अशाप्रकारचा प्रचार सुरू केला आहे.
त्याआधी शनिवारी सकाळी ट्रम्प यांनी नॅशव्हिलमधील बिटकॉइन 2024 परिषदेला संबोधित केले. 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी क्रिप्टोकरन्सी धारकांना न्यायालयीन लढा देता येऊ शकेल यादृष्टीने रिपब्लिकन प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने क्रिप्टोकरन्सीसाठीच्या नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय ट्रम्प यांनी अलीकडेच या क्षेत्राचे नियमन करण्याच्या डेमोक्रॅट्सच्या प्रयत्नांवर टीका केली.
माजी अध्यक्षांनी असेही संकेत दिले की 2021 मध्ये त्यांनी बिटकॉइनला “घोटाळा” म्हटले असले तरी, अमेरिकन कंपन्यांकडून बिटकोइनचे विस्तारीत काम पाहण्याची त्यांची इच्छा आहे.
टेनेसीचे रिपब्लिकन सेनेटर बिल हॅगर्टी यांनी या आठवड्यात परिषदेत रॉयटर्सला सांगितले की, “रिपब्लिकन पक्षात झालेला हा बदल क्रांतीकारक आहे.”
ट्रम्प यांनी नॅशव्हिलमध्ये निधी उभारणीचे आयोजन केले होते, ज्याच्या तिकिटांचे दर प्रति व्यक्ती 60 हजार ते 8 लाख अमेरिकन डॉलर्स असे होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार देणगीदार डिजिटल चलनाद्वारेही योगदान देऊ शकतात.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)