रशिया नव्हे, तर युक्रेनच संभाव्य शांतता करार टाळत आहे: ट्रम्प यांचा निशाणा

0
शांतता करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, सध्या सुरू असलेले युद्ध रशिया-युक्रेन संपवण्यासाठी होत असलेल्या संभाव्य शांतता कराराच्या प्रगतीमध्ये, रशियापेक्षा युक्रेनच जास्त अडथळे आणत आहे. ही भूमिका वॉशिंग्टनच्या युरोपीय मित्रराष्ट्रांच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. बुधवारी, ओव्हल ऑफिसमध्ये ‘रॉयटर्स’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन “करार करण्यास तयार आहेत, पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची “फारशी तयारी दिसत नाही.”

पुतिन यांच्याविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की ते करार करण्यास तयार आहेत, मात्र युक्रेन करार करण्यास तितकासा तयाक नाही.” जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील वाटाघाटींना अद्याप यश का आले नाही, तेव्हा त्यांनी थेट उत्तर दिले: “झेलेन्स्की यांच्यामुळे.”

वाटाघाटींच्या धोरणावरून तणाव

ट्रम्प यांच्या या टिप्पण्यांमधून, युक्रेनच्या नेत्यांबद्दल नव्याने वाढलेली त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांचे संबंध नेहमीच अस्थिर राहिले आहेत. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात वॉशिंग्टन आणि कीव्ह मधील संबंध स्थिर झाल्यासारखे वाटले होते, मात्र पुतिन यांच्या विधानांना प्रत्यक्ष महत्व देण्याच्या ट्रम्प यांच्या वृत्तीमुळे, युक्रेन आणि अनेक युरोपीय देशांची चिंता वाढली आहे.

अमेरिकन गुप्तचर संस्थांकडून, सातत्याने घेतल्या जाणाऱ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर या टिप्पणी आल्या आहेत. या संस्थांचे असे मत आहे की, पुतिन यांनी संपूर्ण युक्रेन काबीज करण्याची किंवा पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या प्रदेशांवर पुन्हा ताबा मिळवण्याची आपली महत्त्वाकांक्षा सोडलेली नाही. राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक तुलसी गॅबार्ड यांनी, यापूर्वी या मूल्यांकनांवर आक्षेप घेत म्हटले होते की, यामध्ये मॉस्कोच्या हेतूंना अतिरंजित करून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील चर्चा आणि वादग्रस्त प्रस्ताव

अलीकडेच अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चा, भविष्यातील कुठल्याही शांतता करारानंतर युक्रेनसाठीच्या संभाव्य सुरक्षा हमींवर केंद्रित आहेत. अहवालानुसार, वाटाघाटी करणाऱ्यांनी कीव्हला कराराचा भाग म्हणून पूर्व डोनबास प्रदेशावरील ताबा सोडण्याबाबत विचार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ज्येष्ठ सल्लागार जॅरेड कुशनर, हे युक्रेनियन आणि युरोपीय प्रतिनिधींसोबत काम करत असून, अमेरिकेच्या वतीने चर्चेचे नेतृत्व करत आहेत. तथापि, काही युरोपीय मुत्सद्यांनी पुतिन या प्रस्तावातील महत्त्वाचे घटक स्वीकारतील की नाही, यावर शंका व्यक्त केली आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विटकॉफ आणि कुशनर लवकरच मॉस्कोला जाणार असल्याच्या अहवालांची माहिती नसल्याचे, ट्रम्प यांनी रॉयटर्सला सांगितले. पुढच्या आठवड्यात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ते झेलेन्स्की यांना भेटणार का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “जर ते तिथे असतील तर मी त्यांना भेटेन. मी तिथे जाणार आहे,” मात्र त्यांनी याविषयी अधिक तपशील देणे टाळले.

प्रादेशिक अखंडतेवर कीव ठाम

‘तुमच्या मते, झेलेन्स्की वाटाघाटी पुढे नेण्यास का कचरत असावेत,’ या प्रश्नावर अधिक भाष्य करण्यास ट्रम्प यांनी नकार दिला. ते फक्त एवढेच म्हणाले की, “मला वाटते त्यांना तिथपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे.”

झेलेन्स्की यांनी मॉस्कोला कोणताही भूभाग देण्यास वारंवार नकार दिला आहे आणि त्यांनी यावर जोर दिला आहे की, युक्रेनची राज्यघटना आपल्या जमिनीचे समर्पण करण्यास मनाई करते. त्यांची ही ठाम भूमिका बहुतांश युरोपीय सरकारांच्या समर्थनावर टिकून आहे, ज्यांचा असा युक्तिवाद आहे की, रशिया आक्रमण थांबवण्याचा कोणताही खरा हेतू दाखवत नाही.

ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे, शांततेच्या प्रयत्नांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरून, वॉशिंग्टन आणि त्याच्या युरोपीय मित्र-राष्ट्रांमधील मतभेद अधिक गडद होण्याची शक्यता आहे, तसेच युद्धाबाबत अमेरिकेच्या धोरणाच्या दिशेबद्दल कीव्हमध्ये पुन्हा चिंता निर्माण होऊ शकते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिकेच्या कारवाईच्या भीतीमुळे बंद केलेले हवाई क्षेत्र, इराणने पुन्हा खुले केले
Next articleसिग्मा ॲडव्हान्स्ड सिस्टम्सने केले ब्रिटनच्या नास्मिथचे अधिग्रहण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here