चीनच्या TP Link या प्रसिद्ध WiFi routers वर, अमेरिका घालू शकते बंदी

0
TP Link
चिनी फर्म TP-Link ने बनवलेले वाय-फाय राउटर अमेरिकेत संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

चीनच्या TP Link या प्रसिद्ध वायफाय राउटर्सवर, अमेरिकेकडून बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टनमध्ये सध्या TP Link या WiFi राउटर बनवणाऱ्या कंपनीची चौकशी सुरु आहे. सायबर हल्ल्यांमध्ये त्यांचे वाय-फाय राउटर वापरले गेल्याच्या आरोपामुळे, अमेरिकेतील त्यांची ऑपरेशन्स कायम त्यांची यू.एस.मधील ऑपरेशन्स कायमची बंद केली जाऊ शकतात.

संभाव्य राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, अमेरिकेचे अधिकारी ही  बंदी घालण्याचा विचार करत आहेत. TP Link कंपनीचे ‘होम इंटरनेट राउटर’ (Home Internet Router) हे सायबर हल्ल्यांशी जोडलेले असल्याची धक्कादायक माहिती, वॉल स्ट्रीट जर्नलने बुधवारी उघड केली. या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवालाही त्यांनी यावेळी दिला.

रॉयटर्सने पाहिलेल्या एका पत्रात असा उल्लेख आहे की, ऑगस्ट 2024 मध्ये दोन अमेरिकन कायदेमंडळ सदस्यांनी, बायडन यांच्या सरकारला  चिनी राऊटर कंपनी TP Link आणि काही संबंधितांचा तपास करण्याची विनंती केली होती. कारण त्यांना चिंता होती की, या कंपन्यांचे वाय-फाय राऊटर अमेरिकेवर होत असलेल्या सायबर हल्ल्यांसाठी वापरले जाऊ शकतात.

वॉल स्ट्रीटच्या अहवालात म्हटल्यानुसार, सध्या अमेरिकेच्या वाणिज्य, संरक्षण आणि न्याय विभागांनी TP Link कंपनीमध्ये स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत टीपी-लिंक राउटरच्या विक्रीवर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कॉमर्स विभागाच्या एका कार्यालयाने कंपनीला याबाबत निवेदनही दिले आहे.

संरक्षण विभागाने या वर्षाच्या सुरुवातीलाच चीन-निर्मित या राउटर्सची चौकशी सुरू केली होती, असे वॉल स्ट्रीट जनरलने या प्रकरणाशी परिचित लोकांचा हवाला देत अवहालात म्हटले आहे.

दरम्यान हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, सॅन जोस स्थित होम नेटवर्किंग कंपनी आणि टीपी-लिंकचे प्रतिस्पर्धी असलेल्या नेटगियरचे शेअर्स बुधवारी 12% पेक्षा जास्त वाढले.

गेल्यावर्षी, यू.एस. सायबरसुरक्षा आणि इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सीने सांगितले होते की, ‘TP-Link राऊटरमध्ये एक त्रुटी आहे, ज्यामुळे या राऊटरचा रिमोट कोडद्वारे गैरवापर केला जाऊ शकतो. TP-Link द्वारा बनवलेले हे वाय-फाय राऊटर लाखो अमेरिकन घरांमध्ये वापरले जात असल्यामुळे आमची चिंता अधिकच वाढली आहे.’

घरगुती वापरासोबतच, लहान लहान व्यवसायांमधअये देखील या राउटर्स, यूएस मार्केटमध्ये 65% वाटा असण्याचा अंदाज आहे. TP Link चे निकटवर्तीय प्रतिस्पर्धी- नेटगियर आणि F5 हे आहेत.

या संपूर्ण प्रकरणाबाबत टिप्पणी करण्याच्या रॉयटर्सच्या विनंतीला, अमेरिकेच्या वाणिज्य, न्याय तसेच संरक्षण विभागाने आणि टीपी-लिंक कंपनीने त्वरित प्रतिसाद दिला नाही.

बीजिंग चिनी राऊटर आणि इतर उपकरणांचा वापर करून अमेरिकन सरकार आणि व्यवसायांवर सायबर हल्ले करू शकते, या वाढत्या चिंतेमुळे ही भूमिका घेतलेली असू शकते.

अमेरिका, त्याचे मित्र देश आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी यांनी गेल्यावर्षी, चिनी सरकारशी संबंधित एक हॅकिंग मोहीम उघड केली होती, ज्याला “व्होल्ट टायफून” (Volt Typhoon) असे नाव देण्यात आले होते. खासगी मालकीच्या राऊटरवर नियंत्रण मिळवून, हल्लेखोरांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर होणाऱ्या पुढील हल्ल्यांना लपवण्याचा प्रयत्न केला होता.

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleअमेरिकेने क्षेपणास्त्र कार्यक्रमावरुन, पाकिस्तानला फटकारले
Next articleकर विवाद, तरी अदानी वीज करार पुन्हा होणार-बांगलादेशला आशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here