फेंटानिल: अमेरिकेने केले काही भारतीय अधिकाऱ्यांचे, कुटुंबियांचे व्हिसा रद्द

0

भारतातील अमेरिकन दूतावासाने जागतिक फेंटानिल तस्करीबद्दल अनेक भारतीय व्यावसायिक अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांचे व्हिसा रद्द करण्याची किंवा नाकारण्याची घोषणा केली आहे.

 

 

या व्यक्ती फेंटानिलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पूर्वसूचक रसायनांच्या तस्करीत सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हे एक कृत्रिम ओपिओइड आहे जे हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त शक्तिशाली आहे आणि युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी हजारो मृत्यूंसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.

इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्टच्या कलम 221(i), 212(a)(2)(C), आणि 214(b) चा हवाला देऊन, अमेरिकन अधिकाऱ्यांनी उल्लंघनांची गंभीरता अधोरेखित केली.

या कारवाईचा बडगा केवळ अधिकाऱ्यांवरच नाही तर जवळच्या कुटुंबातील सदस्यांवर देखील उगारण्यात आला आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या भूमीत त्यांचा प्रवेश प्रभावीपणे काळ्या यादीत टाकला गेला आहे. “अमेरिकेत बेकायदेशीरपणे ड्रग्जचे उत्पादन आणि तस्करी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कुटुंबांसह परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे चार्ज डी’अफेअर्स जॉर्गन अँड्र्यूज म्हणाले.

‘भारत सरकारचे आभारी आहोत’

“आम्ही भारत सरकारमधील आमच्या समकक्षांचे त्यांच्या जवळच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत,” असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे. ही कारवाई भारताचा आरोप म्हणून नव्हे तर एका सामान्य धोक्याचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्न म्हणून करण्यात आली आहे.

अमेरिकन तपासकर्त्यांनी चिनी उत्पादकांकडून भारतीय कंपन्यांद्वारे प्रिकर्सर रसायनांच्या हालचालीचा मागोवा घेतला आहे, जी शेवटी मेक्सिकन ड्रग कार्टेलच्या हाती लागली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, रॉक्सटर केमिकल्स या भारतीय कंपनीवर अमेरिकेला फेंटॅनिल प्रिकर्सर पुरवण्यात कथित भूमिकेबद्दल आरोप ठेवण्यात आले होते. रॉक्सटर केमिकल्सचे वरिष्ठ कार्यकारी भावेश लाठिया यांना जानेवारीमध्ये न्यू यॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती, ज्यामुळे अमेरिका-भारत व्यापार आणि राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली होती.

ट्रम्प प्रशासनाने उगमस्थानावर सिंथेटिक ओपिओइड तस्करी रोखण्यासाठी तीव्र प्रयत्नांच्या अंतर्गत व्हिसा रद्द करण्याचा हा नवीनतम निर्णय व्यापक धोरणाचा भाग असल्याचे दिसून येते. व्हाईट हाऊसने त्यांच्या अंमली पदार्थविरोधी धोरणाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून सीमा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय अंमलबजावणी आणि स्रोत देशांवरील दबाव यांना प्राधान्य दिले आहे.

चीन कनेक्शन

भारतीय नागरिकांना नवीन व्हिसा नाकारण्यात आला असला तरी, अमेरिकन अधिकाऱ्यांनी फेंटानिल प्रिकर्सर उत्पादनाचे जागतिक केंद्र असलेल्या चीनवर लक्ष केंद्रित करण्याची काळजी घेतली. अलीकडील एफबीआयच्या अहवालानुसार, चीनने अंमली पदार्थांवर देशांतर्गत कडक नियंत्रणे लागू केली आहेत परंतु परदेशी राष्ट्रांना, विशेषतः युनायटेड स्टेट्सला अस्थिर करण्यासाठी प्रिकर्सर रसायनांच्या निर्यातीला परवानगी इतकेच नाही तर अगदी प्रोत्साहनही देत ​असल्याचा आरोप आहे.

एफबीआय संचालक काश पटेल यांच्या विधानांचा समावेश असलेल्या या अहवालात चिनी कम्युनिस्ट पक्षावर (सीसीपी)  भारतासह तिसऱ्या देशांमध्ये फेंटानिल प्रिकर्सरची तस्करी करण्यासाठी जाणूनबुजून मोहीम राबवल्याचा आरोप आहे.

“हे केवळ सार्वजनिक आरोग्य संकट नाही तर हा एक भू-राजकीय हल्ला आहे,” असे पटेल म्हणाले, चीनशी संबंधित अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी भारताने अमेरिकेशी हातमिळवणी करावी असे आवाहन केले.

फेंटानिल, ज्याला त्याच्या उत्पत्तीमुळे अनेकदा “चायना व्हाइट” असे टोपणनाव दिले जाते, ते आधुनिक काळातील रासायनिक युद्धाचे प्रतीक बनले आहे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी असे सुचवले आहे की बीजिंग अमेरिकन समाजाला आतून कमकुवत करण्यासाठी या अंमली पदार्थांचा वापर शस्त्र म्हणून करत आहे.

हुमा सिद्दीकी  

+ posts
Previous articleउत्तर आफ्रिका भारताच्या रडारवर: संरक्षणमंत्री लवकरच मोरोक्को दौऱ्यावर
Next articleभारतातील दुसरे वसाहतीकरण: ‘The AI Raj’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here