U.S. लवकरच Ukraine साठी ‘नवे लष्करी सहाय्यता पॅकेज’ जाहीर करणार

0
U
20 डिसेंबर 2024 रोजी, रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, कीव येथील स्थानिक नागरिक स्थलांतरित होत आहेत. सौज्यन: रॉयटर्स

U.S. मधील ‘बाइडन सरकार’ त्यांच्या सुरक्षा सहाय्यता उपक्रमांतर्गत (USAI), युक्रेनसाठी लवकरच नव्या लष्करी सहाय्यता पॅकेजची घोषणा करणार आहे. ज्यामध्ये युक्रेनसाठी नवीन शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी विशेष राखीव रक्कम देण्यात येईल, अशी माहिती संबंधित स्त्रोतांनी दिली आहे.

याव्यतिरिक्त या पॅकेजमध्ये, हवाई संरक्षण इंटरसेप्टर्स आणि तोफखान्यासाठीचा अतिरिक्त निधी समाविष्ट असल्याचे, स्रोतांकडून समजते. परंतु पॅकेजमध्ये आणखी नेमके काय काय असेल याची तपशीलवार घोषणा अद्याप झालेली नसून, लवकरच ती केली जाईल. स्रोतांच्या माहितीनुसार, या सहायत्ता निधी पॅकेजची किंमत सुमारे, 1.2 अब्ज डॉलर्स इतकी असू शकते.

USAI अंतर्गत पुरवण्यात येणारी ही लष्करी उपकरणे अमेरिकन शस्त्रगारातून घेण्याऐवजी, संरक्षण उद्योग किंवा भागीदारांकडून खरेदी केली जातात. त्यामुळे ती प्रत्यक्षात युद्धभूमीवर येण्यासाठी काही महिने किंवा वर्षे लागू शकतात.

USAI ने जारी केलेले हे पॅकेज, म्हणजे अमेरिकेने युक्रेनला थेट लष्करी सहाय्य पुरवण्यासाठी उचललेले शेवटचे पाऊल असू शकते. कारण येत्या 20 जानेवारीला अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी परत सत्तेवर येण्याची तयारी सुरू केली आहे. ट्रम्प यांनी याआधी सार्वजनिकपणे लष्करी सहाय्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत, सोबतच कार्यालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 24 तासांच्या आत युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे वचनही ट्रम्प यांनी दिले आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरु केल्यापासून, अमेरिकेने युक्रेनच्या मदतीसाठी $ 175 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे, ज्यात सुमारे $61.4 अब्ज डॉलर्स इतके ‘सुरक्षा’ सहाय्य समाविष्ट आहे. यापैकी जवळपास निम्मी सुरक्षा मदत ही USAI च्या उपक्रमांतर्गत देण्यात आली आहे तर उर्वरित सहाय्य अध्यक्षीय ड्रॉडाउन प्राधिकरणाद्वारे लष्करी साठ्यांमधून देण्याकडे कल असणार आहे.

राष्ट्रपतींच्या ड्रॉडाउन अधिकाराच्या अंतर्गत, ५.६ अब्ज डॉलर्स रक्कम शिल्लक आहे.

दरम्यान, स्टेट डिपार्टमेंट आणि पेंटागॉनने US च्या या घोषणेवर भाष्य करण्यास नकार दिला असून, ‘सुरक्षा सहाय्य पॅकेज अधिकृतपणे उघड होण्यापूर्वी त्यावर चर्चा करणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘USAI कार्यक्रम’ हा अमेरिकेच्या संरक्षण कंत्राटदारांसाठी वरदान ठरला आहे, जे नवीन उत्पादित शस्त्रास्त्रांसाठी ऑर्डर बुक करण्यात आणि नवीन महसूल प्रवाह स्थापित करण्यात सक्षम आहेत.

याचे एक उदाहरण म्हणजे, ‘L3Harris Technologies VAMPIRE प्रणाली.’ वाहन-अज्ञेय मॉड्युलर पॅलेटाइज्ड ISR रॉकेट इक्विपमेंट काउंटर-ड्रोन प्रणालीला ऑगस्ट 2022 मध्ये, त्यांची पहिली USAI-अनुदानित ऑर्डर प्राप्त झाली होती.

L3Harris ने १२ महिन्यांच्या आत त्याच्या पहिल्या चार युनिट्स वितरित केली. कंपनीला या प्रणालीमध्ये वाढती रुची दिसून आली आहे आणि त्यानंतर USAI कार्यक्रमाद्वारे अनेक ऑर्डर्स दिल्या गेल्या आहेत.

‘बायडन प्रशासन’ अंतिम USAI पॅकेजच्या तपशीलांचे अनावरण करण्याची तयारी करत असताना, समर्पित USAI निधी व्यतिरिक्त युनायटेड स्टेट्स आपल्या सहयोगींना अन्य कोणकोणत्या प्रकारे मदत पुरवेल हा प्रश्न कायम आहे.

ट्रम्पने त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान, वारंवार अमेरिकेच्या युक्रेन संघर्षातल्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणी युरोपीय सहयोगींनी आर्थिक भार अधिक उचलावा, असेही त्यांनी वेळोवेळी सुचवले आहे. काही रिपब्लिकन सदस्य, जे पुढील महिन्यापासून प्रतिनिधी सभा आणि सेनेटर नियंत्रित करणार आहेत, ते युक्रेनला दिल्या जाणाऱ्या सहाय्याबद्दल मवाळ भूमिका घेतली आहे.

युक्रेनला सहाय्य करण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ नाही. मात्र अमेरिकेने युक्रेन समर्थनासाठी लागू केलेल्या या नवीन धोरणामुळे, ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत यूएस सहाय्याच्या भविष्याबद्दल वॉशिंग्टनमधील युक्रेनच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.

टीम भारतशक्ती

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleमॅग्डेबर्ग हल्ल्यात 7 भारतीय जखमी, हल्ल्याचा भारताकडून निषेध
Next articleIndia–China Détente At LAC: How India Must Prepare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here