रशिया आणि युक्रेन कैद्यांचे आतापर्यंत 58 वेळा हस्तांतरण, यूएईची शिष्टाई

0
रशिया आणि

रशिया आणि युक्रेनने शुक्रवारी नव्या युद्धकैद्यांचे हस्तांतरण केले. संयुक्त अरब अमिरातीने मध्यस्थ म्हणून काम केलेल्या या करारानुसार प्रत्येक बाजूने 95 कैद्यांची सुटका करण्यात आली.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टेलीग्राम मेसेजिंग ॲपवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की परत आलेल्या रशियन सेवेतील सैनिकांची बेलारूसमध्ये वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असणाऱ्या या युद्धात बेलारूस हा रशियाचा सर्वात जवळचा मित्र आहे.
झेलेन्स्की यांच्या टेलिग्राम खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात काही पुरुष निळ्या आणि पिवळ्या युक्रेनियन ध्वजात गुंडाळलेले आहेत, अंधार पडल्यावर ते बसमधून उतरले आणि प्रियजनांना त्यांनी मिठी मारली.
‘सर्वांची सुटका’
रशियन सैन्याने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सैनिक हसत बसमध्ये चढताना दिसत आहेत.
“प्रत्येक वेळी युक्रेनने आपल्या लोकांना रशियन बंदिवासातून सोडवले आहे, तेव्हा असे वाटते की आम्ही त्या दिवसाच्या जवळ जातो जेव्हा रशियन बंदिवासात असलेल्या सर्वांची सुटका होईल,” असे झेलेन्स्की यांनी लिहिले आहे.
मुक्त झालेल्या कैद्यांनी विविध आघाड्यांवर काम केले होते, ज्यात काहींनी 2022 मध्ये जवळजवळ तीन महिने मारिओपोल बंदर शहराचा बचाव केल्याचे अध्यक्ष म्हणाले.
युक्रेनियन बातम्यांच्या अहवालात म्हटले आहे की सुटका झालेल्यांमध्ये युक्रेनियन पत्रकार आणि अधिकार वकील मॅक्सिम बुटकेविच यांचा समावेश आहे, ज्यांना रशियन सैन्यावर गोळीबार केल्याबद्दल रशियन न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
युद्धकैद्यांच्या हस्तांतरण प्रकरणात समन्वय साधणाऱ्या संस्थेने सांगितले की, परत आलेल्यांपैकी ४८ जणांना रशियन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
घासाघीस करणारा सौदा
युक्रेनियन संसदेचे मानवाधिकार आयुक्त दिमिट्रो लुबिनेट्स म्हणाले की, युद्धाला सुरुवात झाल्यापासून नुकतीच झालेल्या हस्तांतरणाची ही 58वी वेळ होती आणि आतापर्यंत एकूण  3 हजार 767 कैदी  घरी परतले आहेत.
युद्धकैद्यांच्या हिताची काळजी घेतो असे म्हणणाऱ्या एका खाजगी रशियन गटाने परत आलेल्यांची यादी प्रकाशित केली. ते म्हणाले की त्यापैकी बहुतेक कुर्स्क प्रदेशात पकडले गेले होते, जिथे युक्रेनियन सैन्याने ऑगस्टमध्ये घुसखोरी केली होती.
आपल्या टिप्पण्यांमध्ये, झेलेन्स्की यांनी पुन्हा त्या कामगिरीमधील सैनिकांचा उल्लेख केला जे “एक्स्चेंज फंड पुन्हा भरतात”. याचा अर्थ रशियन कैद्यांना पकडणे म्हणजे देवाणघेवाणीमध्ये होणाऱ्या सौद्यात त्यांना सोंगट्या म्हणून वापरणे.
यूएईची मध्यस्थी
रशियाच्या सैन्याने ताब्यात घेतलेले काही प्रदेश युक्रेनला परत केले आहे असे म्हटले असले तरी युक्रेनचे सैन्य कुर्स्कमध्येच राहिले आहे
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की राज्य माध्यमांद्वारे देण्यात आलेल्या वृत्तानुसार, युद्धातील मध्यस्थीची आखाती राज्याची ही नववी वेळ आहे. त्यात “यूएई आणि दोन्ही देशांमधील सहकारी आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतिबिंब” असे या देवाणघेवाणीचे वर्णन केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार ज्ञात कैद्यांची या आधीची अदलाबदल- ज्यामध्ये प्रत्येक बाजूने 103 कैद्यांचा समावेश होता- सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleDefence Innovations Take Centre Stage In Army’s High-Tech Exercise Near Jhansi
Next articleMalabar 2024 Wraps Up: A Milestone in Quad Naval Collaboration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here