युक्रेन आणि जर्मनी करणार ‘लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची’ संयुक्त निर्मिती

0

युक्रेन आणि जर्मनी संयुक्तरित्या, ‘लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची’ औद्योगित निर्मिती करण्याचा विचार करत आहेत, असे जर्मन चान्सेलर फ्रेडरिक मर्झ यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, रशियावर अधिक दबाव टाकणार असल्याचे आश्वासन दिले.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, यांच्या बर्लिन भेटीदरम्यान मर्झ बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, “क्षेपणास्त्राचे उत्पादन दोन्ही देशांमध्ये होणार असून, या क्षेपणास्त्रांवर कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही.”

“आम्हाला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना अधिक सक्षम करायचे आहे, संयुक्त उत्पादन सक्षम करायचे आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे सहकार्य अधिक बळकट करू,” असे त्यांनी झेलेन्स्कींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, “दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांच्या (ड्रोनसह) उत्पादनात सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी उत्पादन केंद्रांची उभारणी आणि विकास यासंबंधीच्या करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत.”

“हे नवीन प्रकल्प आधीपासूनच अस्तित्वात आहेत, आम्हाला ते केवळ आपल्या गरजेनुसार आवश्यक प्रमाणात सुरु व्हायला हवे आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

झेलेन्स्की यांचा जर्मनी दौरा अशावेळी झाला आहे, जेव्हा याच महिन्यात युक्रेन आणि रशियाचे अधिकारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली युद्ध समाप्तीवर चर्चा करण्याबाबत थेट चर्चेसाठी भेटले होते.

तथापि, त्या चर्चांमधून अद्याप कोणतीही युद्धविराम करार अंतिम झाला नाही आणि त्यानंतर रशियाने सलग तीन रात्री  युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. ‘मस्कोने युक्रेनच्या उत्तरेकडील सुमी भागाजवळ सुमारे 50,000 सैनिक तैनात केले आहेत,’ असे झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले.

“या लष्करी हालचाली शांततेची भाषा बोलत नाहीत”, असे मर्झ म्हणाले.

“ही सैन्य तैनाती युक्रेनमध्ये, तसेच युरोप आणि अमेरिकेत युद्धविरामासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा एक प्रकारचा अपमान आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

रशियाने असा आरोप केला आहे की, ‘युक्रेनने गेल्या आठवड्यात पश्चिमी देशांनी पुरवलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून रशियन भूमीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत.’

मर्झ म्हणाले की, “युरोप रशियावर अधिक दबाव टाकत राहील, जेणेकरून युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण वाटाघाटी सुरू होतील – यामध्ये Nord Stream 2 वायुवाहिनी कार्यान्वित होऊ न देणेही समाविष्ट आहे.”

‘रशियाने युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी काही अटी मांडल्या आहेत, ज्यामध्ये पश्चिमी नेत्यांनी नाटोचे विस्तार थांबवण्याची लेखी हमी द्यावी अशी मागणी आहे,’ असे तीन रशियन सूत्रांनी सांगितले.

झेलेन्स्की म्हणाले की, “काही भागीदारांनी युक्रेनला आगामी नाटो शिखर परिषदेत सामील करण्याच्या हेतूने पाठिंबा दर्शवला आहे.”

“जर युक्रेन परिषदेत सहभागी झाला नाही, तर ही झेलेन्स्कींवर नव्हे, तर नाटोवरच पुतिनची विजय असेल,” असेही ते म्हणाले.

अलीकडील काही महिन्यांत, ट्रम्प यांनी युक्रेनला पाठिंबा देण्याबाबत संकोच दर्शवल्याने, अमेरिका पाठोपाठ जर्मनी युक्रेनचा सर्वात मोठा लष्करी आणि आर्थिक समर्थक ठरू शकतो.

या महिन्यात पदभार स्वीकारलेल्या मर्झ यांनी, त्यांच्या समाजवादी पूर्वसुरी ओलाफ शॉल्झ यांच्या तुलनेत युक्रेनला जास्त सक्रिय आणि नेतृत्वात्मक पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

चान्सेलरपद स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी इतर युरोपीय नेत्यांसोबत युक्रेनला भेट दिली आणि युक्रेनच्या रशियन भूभागावर दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र हल्ले करण्याच्या हक्काला त्यांनी पाठिंबा दिला, जे शॉल्झच्या सावध वक्तव्यांपेक्षा वेगळे होते.

तथापि, त्यांचे सरकार आता युक्रेनला कोणती शस्त्रे दिली जात आहेत, याची माहिती सार्वजनिकपणे देणार नसल्याचे सांगत, “रणनीतिक अस्पष्टतेची” भूमिका घेत आहे.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndian Navy Anchors Future On Indigenization, Maritime Security: Navy Chief
Next articleIndia And EU Launch Joint Naval Exercise Amid Rising Maritime Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here