युक्रेनचा मॉस्को कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्यात थेट सहभाग: रशियन गुप्तहेर प्रमुख

0
युक्रेनचा
मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉल, या ठिकाणी 22 मार्चला दहशतवादी हल्ला झाला होता. (संग्रहित छायाचित्र)

युक्रेनचा कॉन्सर्ट हॉलवरील दहशतवादी हल्ल्यात थेट सहभाग होता, असा रशियाने परत एकदा आरोप केला आहे. या हल्ल्यात 140हून अधिक लोक ठार झाले. यावेळी रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे (एफएसबी) संचालक अलेक्झांडर बोर्तनिकोव्ह यांनी हा आरोप केल्याचे तास या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र त्यासाठी बोर्तनिकोव्ह यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. एफएसबी ही पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या केजीबीची मुख्य उत्तराधिकारी संस्था आहे. रशियाने यापूर्वीही असे आरोप केले आहेत. “तपास सुरू आहे, परंतु युक्रेनच्या लष्करी गुप्तहेरांचा या हल्ल्यात थेट सहभाग आहे असे म्हणणे अधिक सुरक्षित आहे”, असे राज्य वृत्तसंस्थेने बोर्तनिकोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

इसिसचा हल्लाः “युक्रेनचा सहभाग”, अमेरिकेचा नकार

मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि अफगाणिस्तानातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे भाडोत्री सैनिक आणि अतिरेकी युक्रेनला हस्तांतरित करण्यास नाटोची लष्करी आघाडी मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, ते तेथे रशियन सैन्याशी लढू शकतील हे कारण असावे. ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवादी गटाने (ज्याला दाएश, इसिस – के, आयएसकेपी. किंवा ‘इसिस’ असेही म्हणतात) मार्चमध्ये झालेल्या कॉन्सर्ट हॉल हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की त्यांच्याकडील गुप्तचर माहितीनुसार हा हल्ला या नेटवर्कची अफगाण शाखा, इस्लामिक स्टेट खोरासनने केला. युक्रेनने या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे वारंवार सांगितले आहे.

तासने बोर्टनिकोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हल्लेखोरांकडून करण्यात आलेल्या कृतींमध्ये समन्वय साधण्यात भूमिका बजावली तर युक्रेनियन लष्करी गुप्तहेरांचा यात थेट सहभाग होता.

चार बंदूकधाऱ्यांनी 22 मार्च 2024 रोजी सामूहिकपणे गोळीबार करत हा हल्ला केला. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी आग लावण्यासाठी अत्यंत दाहक अशा उपकरणांचा वापर केला. रशियन अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी चार जणांना अटक केली आणि त्यांच्यावर आरोप ठेवले. हे चारही ताजिकिस्तानचे रहिवासी असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

इतर देशांकडून मिळाली होती पूर्वसूचना

युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटनेच्या (ओएससीई) विशेष स्थायी परिषदेतील अमेरिकेच्या प्रभारी कॅथरीन ब्रुकर यांनी 11 एप्रिल 2024 रोजी व्हिएन्नामध्ये एक निवेदन दिले. त्यात त्या म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि इतरांनी केलेल्या सार्वजनिक विधानांमध्ये त्यांनी युक्रेन, अमेरिका, ब्रिटन आणि क्रेमलिनच्या राजकीय विचारांशी प्रतिकूल असलेल्या सर्वच घटकांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे.  मात्र 22 तारखेला मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी पूर्णपणे इसिस-Kच जबाबदार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “क्रेमलिन जे काही म्हणते ते आणि आमच्या रशियन सहकाऱ्याने जे काही म्हटले आहे ते लक्षात घेता, अमेरिकेने प्रत्यक्षात हा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी मदत करण्याचाच प्रयत्न केला. क्रेमलिनलाही हे माहीत आहे. 22 मार्चला झालेल्या या हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी, अमेरिकन सरकारने रशियन अधिकाऱ्यांना स्पष्ट, तपशीलवार असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना दिली होती. ही माहिती मॉस्कोतील मोठ्या मेळावे आणि मैफिली यांच्यावर होऊ शकणाऱ्या दहशतवादी धोक्याबाबत होती. 7 मार्च रोजी अमेरिकेने रशियन सुरक्षा सेवांना याबद्दल इशारा दिला होता. याशिवाय, आम्ही 8 मार्च रोजी अमेरिकन नागरिकांना मॉस्कोमधील मोठे मेळावे आणि मैफिली टाळण्यासाठी एक सार्वजनिक सूचना जारी केली होती. आमच्या दूतावासाच्या या सार्वजनिक सल्ल्याने इसिस-के ला 8 मार्च रोजी हल्ला करण्यापासून परावृत्त केले असले तरी, रशियन सरकारला आम्ही दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यामागे मॉस्कोमधील मैफिलींना असलेला दहशतवादी धोका आम्ही अचूकपणे ओळखला होता असेच म्हणता येईल.”

अमिताभ रेवी
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here