संयुक्त राष्ट्रातील भारतीयाची रफाहमध्ये हत्या, सरचिटणीसांनी व्यक्त केले दु:ख

0
संयुक्त
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 10 मे 2024 रोजी केनियाच्या नैरोबी येथील गिगिरी येथील संयुक्त राष्ट्रांच्या संकुलात पत्रकार परिषदेला संबोधित केले. (रॉयटर्स/थॉमस मुकोया)

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी “संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचारी सदस्याचा मृत्यू आणि रफाहमध्ये आणखी एक जखमी झाल्याची बातमी ऐकून आपण अत्यंत दुःखी झालो आहोत” असे एका निवेदनाद्वारे सांगितले आहे. महासचिवांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी यूएनएसजीच्या वतीने हे निवेदन जारी केले.

निवेदनात म्हटले आहे की संयुक्त राष्ट्रांच्या बचाव आणि सुरक्षा विभागाच्या (डीएसएस) एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. “आज सकाळी ते रफाह येथील युरोपियन इस्पितळात जात असताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनाला धडक बसली आणि हा अपघात घडला.”

यूएनएसजीच्या वतीने बोलताना हक यांनी या घटनेची “संपूर्ण चौकशी” करण्याची मागणी केली. युद्धविराम झाला पाहिजे आणि सर्व ओलिसांची सुटका झाली पाहिजे या संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

ही हत्या संयुक्त राष्ट्रांची “पहिली आंतरराष्ट्रीय जीवितहानी होती असे सांगत हक यांनी या घटनेला दुजोरा दिला. संयुक्त राष्ट्राचा मृत कर्मचारी भारतीय नागरिक असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

“आम्ही संबंधित सरकारांना आणि संबंधित कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यामुळे मी आताच कोणतीही नावे किंवा त्यांचे राष्ट्रीयत्व याबद्दलची माहिती उघड करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मृत्यू पावलेली व्यक्ती भारतीय नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय मदत कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे संतापाची लाट उसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. इस्रायलने एप्रिलमध्ये वर्ल्ड सेंट्रल किचन या ना-नफा संस्थेच्या सात सदस्यांची हत्या केल्याने त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला होता. अल-रशीद रस्त्यावर या सात जणांचा मृत्यू झाला. यूएन ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्सने (ओसीएचए) सांगितले की अल-रशीद रस्त्यावर “मानवतावादी मदत” पोहोचवण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, इस्रायलकडून “मदत कर्मचाऱ्यांची नकळत हत्या झाली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पण “युद्धात असे घडते” अशीही टिपण्णी केली.

इस्त्रायली-व्याप्त वेस्ट बँकमधील हेब्रॉनच्या पश्चिमेकडील तारकुमिया चेकपॉईंटवर अन्न पॅकेजेस रस्त्यावर फेकून गाझाकडे जाणारे मदत ट्रक देखील इस्रायली आंदोलकांनी रोखले आहेत.

अश्विन अहमद

 


Spread the love
Previous articleWhy Is Pakistan-Occupied Kashmir On The Boil?
Next articleरशियाच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here