अमेरिकेने मंगळवारी युक्रेन आणि रशियासोबत Black Sea मधील आणि ऊर्जा लक्ष्यांवरील हल्ले थांबवण्यासाठी संघर्षविराम करार केले, याचवेळी वॉशिंग्टनने मॉस्कोवरील काही निर्बंध शिथिल करण्यासाठी समर्थन देण्याचे आश्वासन दिले.
युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी आणि मॉस्कोशी जलद संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर दोन्ही युद्धग्रस्त बाजूंनी केलेले हे करार पहिले औपचारिक वचन आहेत, ज्यामुळे कीव आणि युरोपीय देशांना धक्का देणार आहे.
काळ्या समुद्रातील करार
अमेरिकेने रशियासोबत केलेला ‘संघर्षविराम करार’, युक्रेनसोबत केलेल्या करारापेक्षा एक पाऊल पुढे आहे, ज्यामध्ये वॉशिंग्टनने रशियन कृषी आणि खतांच्या निर्यातीवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याच्या प्रयत्नांना मदत करण्याचे वचन दिले आहे, जी मागणी रशिया दीर्घकाळापासून करत आहे.
क्रेमलिनने सांगितले की, ‘काळ्या समुद्रातील करार प्रभावी होणार नाहीत, जोपर्यंत काही रशियन बँकांमधील आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील दुवे पुन्हा स्थापित होणार नाहीत’
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, हे दावे खोटे असल्याचे म्हणत सांगितले की, “करारांना अंमलात आणण्यासाठी निर्बंध सवलतीची आवश्यकता नाही.”
“दुर्दैवाने, आजही, अगदी आजच- वाटाघाटीच्या चर्चा सुरू असताना देखील, रशियन लोकांनी कशाप्रकारे आधीच त्यांच्या मर्जीने याची हाताळणी सुरु केली आहे, हे आपण पाहतोय’ असे झेलेन्स्की यांनी त्यांच्या रात्रीच्या व्हिडिओ बाईटद्वारे सांगितले. “रशिया करारांना वळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्यक्षात आमच्या मध्यस्थांना आणि संपूर्ण जगाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही झेलेन्स्की म्हणाले.
‘स्पष्ट हमी’ आवश्यक
कीव आणि मॉस्को दोघांनी, करार अमलात आणण्यासाठी वॉशिंग्टनवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे ते एकमेकांवर विश्वास ठेवत नसल्याची शंका व्यक्त केली.
“याबाबत आम्हाला स्पष्ट हमी लागेल,” असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह म्हणाले. त्यांनी सांगितले की, “फक्त कीवसोबतच्या करारांचा दुःखद अनुभव लक्षात घेतल्यास, ही ‘हमी’ केवळ वॉशिंग्टनने झेलेन्स्की आणि त्यांच्या टीमला एक गोष्ट करण्याचा आणि दुसरी नाही असा आदेश दिल्यामुळेच असू शकतात.”
झेलेन्स्की यांनी सांगितले की, “संघर्षविरामाचे करार त्वरित प्रभावी होणार आहेत, आणि जर रशियाने त्यांचे उल्लंघन केले, तर तो ट्रम्पकडे मॉस्कोवर अतिरिक्त निर्बंध लादण्याची आणि युक्रेनसाठी अधिक शस्त्रास्त्र पुरवण्याची विनंती करेल.”
“आम्हाला रशियन लोकांवर विश्वास नाही, पण तरीही आम्ही रचनात्मक राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात ट्रम्प आणि दोन्ही अध्यक्ष, झेलेन्स्की आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या वेगवेगळ्या फोन कॉलनंतर सौदी अरेबियामध्ये झालेल्या समांतर चर्चेनंतर हे करार झाले.
30 दिवसांची संघर्षविराम योजना
पुतिन यांनी, ट्रम्प यांच्या 30 दिवसांच्या पूर्ण संघर्षविराम घोषित करण्याच्या प्रस्तावाचा विरोध केला, ज्याला युक्रेनने यापूर्वी समर्थन दिले होते.
“संघर्षविरामाच्या बाबतीत आम्ही वेगाने प्रगती करत आहोत, मात्र यामध्ये आम्हाला तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो आहे,” असे ” ट्रम्प यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
“तुम्हाला कदाचित कळेलच की, खूप द्वेष आहे आणि त्यामुळे लोकांना एकत्र येऊन, मध्यस्थी करून, मध्यस्थी करून आपण ते थांबवू शकतो का ते पाहता येते आणि मला वाटते की ते काम करेल,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले.
ट्रम्प यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ, यांनी गेल्या काही दिवसांत रशियाबद्दलचे आपली भूमिका सौम्य केली आहे, ज्यामुळे रशियाचे नेते स्टीव्ह विटकॉफ यांनी “पुतिन यांना वाईट माणूस मानत नाहीत” असे म्हटले आहे, ज्यामुळे रशियन नेत्याला धोकादायक शत्रू मानणाऱ्या युरोपियन अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तेम उमेरोव्ह यांनी सांगितले की, “रशियन लष्करी जहाजांची काळ्या समुद्राच्या पूर्वेकडील भागाबाहेर होणारी कोणतीही हलचाल, ही युक्रेनसाठी उल्लंघन आणि धोका मानली जाईल आणि त्या परिस्थितीत युक्रेनला स्वत:च्या बचावाचा पूर्ण हक्क असेल.”
ऊर्जा संघर्षविराम
रशियाने युद्धादरम्यान युक्रेनच्या वीज ग्रीडवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आणि त्यावर असे स्पष्टीकरण दिले की,
“नागरी ऊर्जा पायाभूत सुविधा युक्रेनच्या लढाऊ क्षमतेला मदत करत असल्यामुळे म्हणून त्यांना लक्ष्य केले गेले.”
अलीकडील काळात, युक्रेन रशियाच्या तेल आणि गॅस स्टेशन्सवर लांब पल्ल्याचे हल्ले करत आहे, जे रशियाच्या सैनिकांसाठी इंधन आणि युद्ध प्रयत्नांना निधी पुरवतात, असे युक्रेनचे म्हणणे आहे.
क्रेमलिनने म्हटले आहे की, 18 मार्च रोजी पुतिन यांनी ट्रम्पसोबत याबाबत पहिल्यांदा चर्चा केली आणि तेव्हापासून ऊर्जा साठ्यांवरील हल्ल्यांमध्ये 30 दिवसांचा युद्धविराम लागू करण्यात आला. दुसरीकडे, युक्रेनने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ते औपचारिक करारानंतरच युद्धविरामाचा स्विकार करतील.
समुद्रातील संघर्षविरामाचा करार, युद्धाच्या सुरुवातीच्या काळातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतो, जेव्हा रशियाने युक्रेनवर एक प्रत्यक्ष समुद्री घेराव लादला होता. युक्रेन जगातील सर्वात मोठा धान्य निर्यातक देश असल्याने या हल्ल्यानंतर जागतिक अन्नसंकट आणखी तीव्र झाले होते.
सागरी युद्ध
अलीकडील काळात, रशियाने युक्रेनवरील अनेक यशस्वी हल्ल्यांनंतर काळ्या समुद्राच्या पूर्व भागातून आपले नौदल सैन्य मागे घेतल्यापासून, सागरी युद्धांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे.
यामुळे युक्रेनला आपले बंदर पुन्हा उघडण्यास आणि युद्धाच्या आधीच्या पातळीवर निर्यात पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे. याआधी UNच्या मध्यस्थीने केलेल्या काळ्या समुद्रातील शिपिंग कराराचे पतन झाले असले, तरीही त्याच्या बंदरांना नियमित हवाई हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. “कराराद्वारे अशाप्रकारच्या हल्ल्यांना प्रतिबंधित केले पाहिजे,” असे झेलेन्स्की यांनी सांगितले.
मॉस्कोने सांगितले की, “या करारामध्ये निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता असेल, ज्यात रशियाच्या कृषी निर्यात बँकेच्या आणि SWIFT आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टममधील दुवे पुन्हा सुरू करणे या गोष्टी समाविष्ट आहे. यासाठी आणि अन्य निर्णयांसाठी, युरोपीय देशांची सहमती घेण्याची आवश्यकता भासू शकते.
ट्रम्प मॉस्को आणि कीववर, युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी दबाव आणत आहेत. गेल्यावर्षी अध्यक्ष पदासाठी उभे असताना ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे वचन दिले होते.
युक्रेन आणि त्याच्या युरोपीय सहयोगींना भीती आहे की, ट्रम्प पुतिनसोबत घाईघाईत एक असा करार करू शकतात, जो त्यांच्या सुरक्षा आणि रशियाच्या मागण्यांसमोर झुकू शकतो, ज्यामध्ये युक्रेनला त्याच्या NATO शी संल्गन ध्येयांचा त्याग करण्यासाठी आणि मॉस्कोने जपलेल्या जमिनी सोडण्याची मागणी केली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)