बांगलादेशी महिला विद्यार्थी आंदोलकांच्या ‘शौर्याचा’ अमेरिकेकडून सन्मान

0

गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या बांगलादेशी महिला विद्यार्थी आंदोलक नेत्यांना, त्यांच्या शौर्याबद्दल आणि निःस्वार्थतेबद्दल मेडेलीन अलब्राइट मानद गट पुरस्कार देऊन, अमेरिकन सरकार सन्मान करणार आहे.

परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प 1 एप्रिल रोजी परराष्ट्र विभागात वार्षिक आंतरराष्ट्रीय साहसी महिला (आयडब्ल्यूओसी) पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणार असून त्या समारंभात बांगलादेशी विद्यार्थी महिला आंदोलक नेत्यांचा सन्मान केला जाईल.

या संदर्भातील तपशील देताना, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, “जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या हिंसक दडपशाहीविरुद्धच्या विद्यार्थी आंदोलनात महिलांचा एक शूर गट प्रमुख चालक होता.”

“धमक्या आणि हिंसाचाराचे सत्र सुरू असूनही त्यांनी सुरक्षा दल आणि पुरुष निदर्शकांमध्ये उभे राहून असाधारण शौर्याचे प्रदर्शन केले,” असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, “जेव्हा पुरुष सहकाऱ्यांना अटक करण्यात आली, तेव्हा या महिलांनी इंटरनेट पूर्णपणे बंद असताना देखील सेन्सॉरशिपच्या प्रयत्नांना न जुमानता संवाद सुरू ठेवण्यासाठी आणि निषेधाचे नेतृत्व करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधून काढले.”

“अनिश्चिततेदरम्यान या महिलांचे शौर्य आणि निःस्वार्थता ही धैर्याची व्याख्या होती,” असे विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रीलंकन पत्रकारही पुरस्काराने सन्मानित

श्रीलंकेतील नागरी संघर्षातील मानवी मृत्यूचे वृत्तांकन करून आणि त्याच्या परिणामांमुळे प्रभावित झालेल्यांचा आवाज बनून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेच्या पत्रकार नमिनी विजेदासा यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, “कालांतराने, त्यांचे लक्ष शोध पत्रकारितेद्वारे भ्रष्टाचार उघड करण्यावर केंद्रित झाले, गंभीरतेने, जबाबदारीने या विषयातील मुद्दे समोर आणले आणि पत्रकारांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा दिली.”

“आपल्या कार्याद्वारे, विजेदासांनी सातत्याने जबाबदारीचे समर्थन केले आहे, जेव्हा लोक सत्तेत असलेल्यांकडून पारदर्शकतेची मागणी करतील तेव्हाच अर्थपूर्ण बदल साध्य करता येईल यावर भर देत, त्यांनी देशाच्या दीर्घकालीन आव्हानांचा सामना करण्याचे आवाहन केले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

“श्रीलंकेतील अनेक पत्रकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भयानक परिणाम करणारे प्रतिबंधात्मक कायदे असूनही, सकारात्मक बदलांच्या त्यांच्या प्रयत्नात त्या अविचल आहेत. त्यांच्या कार्याचा उद्देश केवळ सर्वात शक्तिशाली व्यक्तीला जबाबदार धरणे हा नाही तर आर्थिक समृद्धी तसेच पारदर्शक प्रशासनावरील संवादाला चालना देणे, पत्रकारांच्या नवीन पिढीसाठी मार्ग मोकळा करणे आणि धाडसी, प्रभावी पत्रकारितेचा वारसा सुनिश्चित करणे हा आहे,” असेही निवेदनात म्हटले आहे.

इस्रायली नागरिक अमित सौसाना यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

त्यांचा उल्लेख करताना, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, “अमित सौसाना इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात ओलिस म्हणून तिच्यावर झालेल्या आघाताचे वर्णन करून, तिच्या स्वतःच्या जिवंत उदाहरणाचा वापर करून वाचलेल्यांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी करण्यासाठी आपल्या आवाजाचा वापर करते. हमासचे बंधक राहिलेल्या महिला, पुरुष, मुली आणि मुलांना भेडसावणाऱ्या परिस्थितीबद्दल सौसानाने जागरूकता वाढवली आहे. ॲटर्नी म्हणून तिने सपीर महाविद्यालयातून एलएलबी पदवी घेतली असून 2014 पासून ती इस्रायल बार असोसिएशनची परवानाधारक सदस्य आहे.”

7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यानंतर हमासचे ओलिस म्हणून असलेल्यांची सौसाना वकील आहे.

आयडब्ल्यूओसी पुरस्कार

सेक्रेटरी ऑफ स्टेटचा आयडब्ल्यूओसी पुरस्काराने जगभरातील अशा महिलांना सन्मानित केले जाते ज्यांनी अपवादात्मक धैर्य, सामर्थ्य आणि नेतृत्व प्रदर्शित केले आहे-बहुतेकदा मोठ्या वैयक्तिक जोखमीवर आणि त्यागावर.

2007 पासून, परराष्ट्र विभागाने 90 हून अधिक देशांतील 200 हून अधिक महिलांना आयडब्ल्यूओसी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

परदेशातील अमेरिकी राजनैतिक मोहिमा त्यांच्या संबंधित यजमान देशांमधून एका धाडसी महिलेला नामांकित करतात. अंतिम फेरीतील उमेदवारांची निवड आणि मंजुरी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाते.

“आयडब्ल्यूओसी समारंभानंतर, पुरस्कार विजेते लॉस एंजेलिसमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यागत नेतृत्व कार्यक्रम (आयव्हीएलपी) आणि अतिरिक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील,” असे निवेदनात म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleट्रम्प यांच्या रशियन तेलावर कर लादण्याच्या धमकीमुळे, तेलाच्या किंमती वाढल्या
Next articleHAL Posts Rs 30,400-Crore Revenue Despite Supply Chain Woes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here