डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थित केलेले खर्चाचे विधेयक गुरुवारी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात मंजूर झाले नाही. नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थन देऊनही रिपब्लिकन सदस्यांच्या तीव्र विरोधामुळे हे विधेयक गुरूवारी संसदेत मंजूर होऊ शकले नाही. यामुळे ऐन ख्रिसमसच्या काळात संभाव्य प्रवास विलंबासह देशभरात मोठ्या प्रमाणात कामकाज विस्कळीत होण्याचा धोका असलेल्या सरकारी शटडाउनला रोखण्यासाठी कॉंग्रेसला स्पष्ट धोरण मिळालेले नाही.
या मतदानामुळे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात असलेला विरोध उघड झाला असून पुढच्या वर्षी व्हाईट हाऊस आणि कॉंग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर त्यांचे नियंत्रण असताना हा विरोध परत एकदा समोर येऊ शकतो.
कमी मते
नवीन वर्षात राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्ज मर्यादा स्थगित करण्याचा आग्रह धरला. 8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी कर कपात करण्यासह महत्त्वपूर्ण कर कपात करण्यास मदत करेल असा त्यांनी युक्तिवाद केला पण यामुळे राष्ट्रीय कर्ज आणखी वाढेल, जे सध्या 36 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
शटडाऊन टाळण्यासाठी सादर केलेल्या विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या 38 रिपब्लिकनपैकी एक असलेले प्रतिनिधी चिप रॉय म्हणाले, “आर्थिक जबाबदारीवर प्रचार करणाऱ्या आणि अमेरिकन लोकांमध्ये जाऊन तुम्हाला वाटते की हे आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे असे म्हणण्याचा उत्साह असलेल्या पक्षामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ आहे.”
संसदेत हे विधेयक कनिष्ठ सभागृहात 174 च्या तुलनेत 235 मतांनी फेटाळले गेले. ट्रम्प समर्थित या विधेयकाचा उद्देश सरकारचा निधी वाढवणे आणि राष्ट्रीय कर्ज मर्यादा निलंबित करण्याचा होता. मात्र वनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश सहकारी एलन मस्क यांचे जोरदार समर्थन असूनही रिपब्लिकन सदस्यांच्या तीव्र विरोधामुळे गुरुवारी GOP नेत्यांनी तयार केलेले विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नाही.
विधेयकाच्या विरोधात मतदान झाल्यामुळे बंद टाळण्याच्या दृष्टीने पुढे काय उपाययोजना करण्यात येतील असे पत्रकारांनी विचारले असता रिपब्लिकन सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
“आम्ही दुसरा तोडगा काढू,” असे ते म्हणाले.
अमेरिकन काँग्रेसने शुक्रवारी रात्रीपर्यंत निधीच्या विधेयकाला मंजूरी दिली नाही तर, देशभरातील सर्व सरकारी सेवांवर त्याचा व्यापक परिणाम होईल.अमेरिकेतील सरकारसमोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा परिणाम म्हणजे फेडरल ऑपरेशन्स ठप्प पडू शकतात. परिणामी, नॅशनल पार्कपासून सीमेवरील अंमलबजावणीपर्यंत जवळपास सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम दिसून येईल. याशिवाय, अंदाजे दोन दशलक्ष फेडरल कर्मचाऱ्यांचे पगार थकतील. परिवहन सुरक्षा प्रशासनाने (TSA) देखील सुट्टीच्या काळात हवाई प्रवास प्रभावित होण्याचा इशारा दिला आहे ज्यामुळे विमानतळांवर नेहमीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागू शकते.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
“काँग्रेसने हास्यास्पद कर्ज मर्यादा 2029 पर्यंत दूर केली पाहिजे किंवा ती वाढवली पाहिजे. त्याशिवाय आपण कधीही करार करू नये,” असे ट्रम्प यांनी विधेयक अयशस्वी झाल्यानंतर ‘ट्रुथ सोशल अवर्स’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले.
गुरुवारीचे अयशस्वी झालेले विधेयक, मस्क आणि ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सना एक व्यर्थ देणगी म्हणून दिलेल्या पूर्वीच्या आवृत्तीसारखेच होते. त्यामुळे मार्चपर्यंत सरकारी निधी वाढवला असता आणि आपत्ती निवारणासाठी 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स उपलब्ध झाले असते आणि कर्ज निलंबित केले असते. रिपब्लिकनांनी मूळ पॅकेजमध्ये समाविष्ट केलेले इतर घटक वगळले, जसे की कायदेकर्त्यांसाठी वेतनवाढ आणि फार्मसी लाभ व्यवस्थापकांसाठी नवीन नियम.
मतदानापूर्वी जॉन्सनने पत्रकारांना सांगितले की पॅकेजमुळे व्यत्यय टाळता येईल, खर्चावर बंधने घातली जातील आणि पुढच्या वर्षी ट्रम्प जेव्हा पदभार घेतील तेव्हा खासदारांना शेकडो अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करणे सोपे होईल.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)