व्हिएतनाममध्ये Kajiki वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी

0

व्हिएतनाममध्ये Kajiki वादळामुळे किमान 3 जणांचा मृत्यू झाला असून, इतर 10 जण जखमी झाल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. टायफूनमुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन होऊ शकते, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

सोमवारी, Kajiki टायफूनने व्हिएतनामच्या उत्तर-मध्य किनारपट्टीवर मुसळधार पावसासह धडक दिली. झाडे कोसळली, घरात पाणी शिरले, तर वाऱ्याचा वेग 166 किमी प्रतितास पासून कमी होऊन 118-133 किमी प्रतितास झाला, अशी माहिती देशाच्या हवामान खात्याने दिली आहे.

हजारो घरांचे नुकसान

सरकारच्या निवेदनानुसार, वादळामुळे जवळपास 7,000 घरांचे नुकसान झाले, 28,800 हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आणि 18,000 झाडे उन्मळून पडली. तसेच 331 वीज खांब कोसळल्यामुळे थान होआ, न्गे अन, हा तिन्ह, थाय गुयेन आणि फु थो प्रांतांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला.

राज्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये हनोई शहरातील रस्ते मंगळवारी सकाळी पावसामुळे जलमय झाल्याचे दिसून आले.

प्रचंड हानीनंतर वादळ क्षमले

राज्य प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हातिन्ह प्रांतात वीजपुरवठा खंडित झाला, घरांचे छप्पर उडाले आणि मत्स्यशेती उद्ध्वस्त झाल्या. व्हिएतनामने याआधीच विमानतळ बंद, शाळा बंद केल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर केले होते, कारण हे वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ मानले जात होते.

सोमवारी दुपारी, उत्तर-मध्य किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर, काजिकी आता कमकुवत होऊन उष्ण कटिबंधीय खालच्या दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले असून, मंगळवारी सकाळी ते लाओसच्या दिशेने सरकले असल्याचे, राष्ट्रीय हवामान संस्थेने सांगितले.

फ्लॅश फ्लडचा इशारा

हवामान विभागाने इशारा दिला आहे की, उत्तरेकडील व्हिएतनाममध्ये पुढील काही तासांत 6 तासांत 150 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो, ज्यामुळे फ्लॅश फ्लड आणि भूस्खलन होण्याची शक्यता आहे. सरकारने याआधी काजिकीला “अत्यंत धोकादायक आणि वेगाने हालचाल करणारे वादळ” म्हणून वर्णन केले होते.

व्हिएतनाममध्ये धडक देण्यापूर्वी, रविवारी- काजिकी वादळाने चीनच्या हायनान बेटाच्या दक्षिण किनाऱ्यालाही झळा दिल्या, जिथे सान्या शहरातील व्यावसायिक उपक्रम आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article50 टक्के टॅरिफची उद्यापासून अंमलबजावणी, अमेरिकेची भारताला नोटीस
Next articlePM Modi’s Japan Visit To Cement Strategic Defence Ties, Focus On QUAD And Indo-Pacific Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here