कॅलिफोर्नियाच्या गोल्ड कंट्रीतील वणव्यांमध्ये ऐतिहासिक शहराचा काही भाग नष्ट

0
बुधवारी उत्तर कॅलिफोर्नियातील दोन काउंटीजमध्ये वीज पडून लागलेल्या आगीत  हजारो चिनी स्थलांतरितांनी वसलेल्या ऐतिहासिक गोल्ड रश शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीमुळे तेथील काही भाग उद्ध्वस्त झाले आहेत.

कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निशमन संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी झालेल्या विजेच्या वादळामुळे लागलेल्या सुमारे दोन डझन वेगवेगळ्या आगी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे 13 हजार एकरपेक्षा (5 हजार 261 हेक्टर) जास्त भागातील वाळलेले गवत, झुडुपे आणि लाकूड जळून खाक झाले आहे.

कॅलिफोर्नियाच्या गोल्ड कंट्री प्रदेशातील सिएरा नेवाडाच्या पश्चिमेकडील पायथ्याशी असलेले 100 पेक्षा कमी रहिवासी असलेले चायनीज कॅम्प हे दुर्गम गाव असून एका आगीचा या गावाला सर्वाधिक फटका बसला.

एका पत्रकाराने दिलेल्या वृत्तानुसार, 19 व्या शतकाच्या मध्यात हजारो चिनी कामगार पहिल्यांदा स्थायिक झालेल्या गोल्ड रश-युगातील खाण समुदायाचे अवशेष असलेल्या चायनीज कॅम्पमधील आणि त्याच्या आसपासच्या डझनभर घरांना आगीची झळ बसली आहे.

कॅलफायरच्या प्रवक्ते जेम विल्यम्स म्हणाल्या की, आगीमुळे जुन्या स्टेज कोच स्टॉपसह दोन ऐतिहासिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. डोंगरावरील स्मशानभूमी जळून खाक झाली आहे. मात्र 1854 मध्ये स्थापन झालेल्या शेजारील चर्चला कोणतीही झळ पोहोचलेली नाही.

चायनीज कॅम्प स्टोअर आणि टॅव्हर्न या शहराचे पोस्ट ऑफिस आणि पॅगोडा-शैलीतील सार्वजनिक शाळा या तीन इतर महत्त्वाच्या इमारती देखील आगीतून वाचल्या, असे त्यांनी सांगितले.

मालमत्तेचे नुकसान आणि स्थलांतर

ट्युओलुम्ने काउंटी आणि शेजारच्या कॅलावेरस काउंटीमधील संपूर्ण शहर आणि इतर अनेक समुदायांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी 600 हून अधिक कर्मचाऱ्यांचा आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे कॅलाफायरने सांगितले.

मालमत्तेचे नुकसान आणि कितीजणांचे स्थलांतराचे करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही.  परंतु यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही.

कॅलावेरस आणि ट्युओलुम्ने काउंटीमध्ये वाढत्या वीजांच्या कडकडाटात आगीशी लढण्यासाठी आम्ही सर्व उपलब्ध संसाधने – आमच्या संघीय भागीदारांच्या पाठिंब्यासह – वापरत आहोत, असे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.

आगीमुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी किमान दोन स्थलांतर आश्रयस्थाने उघडण्यात आली आहेत, तसेच पशुधन आणि लहान पाळीव प्राण्यांसाठी आश्रयस्थाने उघडण्यात आली आहेत.

वीज तारा, ट्रान्सफॉर्मर आणि वीज खांबांना आगीमुळे पोहोचलेल्या हानीमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

टीसीयू सप्टेंबर लाईटनिंग कॉम्प्लेक्सच्या आगीचा समावेश असलेल्या 22 आगी बुधवारी कॅल्फायरने राज्यभर नोंदवलेल्या सुमारे डझनभर जंगलातील आगीच्या घटनांपैकी सर्वात मोठ्या आहेत. परंतु जानेवारीमध्ये लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीच्या तुलनेत या कमी विध्वंसक होत्या. लॉस एंजेलिसमधील आगीत किमान 31 जण ठार झाले तर सुमारे 16 हजार घरे नष्ट झाली होती.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प यांनी शुल्क आकारणीसाठी, सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन मागितले
Next articleउत्तर कोरियाचा रशियाला पूर्ण पाठिंबा; किम यांचे पुतिन यांना आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here