ऑस्ट्रेलियात दहशतवादाशी संबंधित पाचपैकी एका खटल्यात तरुणांचा सहभाग असल्याचे त्यांच्या गुप्तहेर प्रमुखांनी शुक्रवारी सांगितले.
‘Five Eyes’ मधील सहभागी गुप्तचर भागीदारांनी (Australia, Canada, New Zealand, UK, USA) तरुण पिढीच्या कट्टरतावादाबद्दल इशारा दिला आहे.
अल्पवयीन मुलांचे वर्तन हा पोलिस तपासाचा मुद्दा बनण्यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये या मुलांच्या मानसिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवांबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक होते, असे Five Eyes च्या एका संशोधन पत्रिकेत म्हटले आहे.
एएसआयओची जी दहशतवादविरोधी प्रकरणे प्राधान्यक्रमाने तपासासाठी घेतली जातात त्यापैकी सुमारे 20 टक्के प्रकरणांमध्ये तरुणांचा समावेश आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियातील प्रत्येक दहशतवादी हल्ला, अडथळे निर्माण करणाऱ्या घटना आणि संशयित दहशतवादी कृत्यांमध्ये, कथित गुन्हेगार एक तरुण व्यक्ती होती,” असे ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजेंस ऑर्गनायझेशनचे (एएसआयओ) महासंचालक माईक बर्गेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
“पालक म्हणून विचार करता ही संख्या धक्कादायक आहे. तर एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या दृष्टीने ही संख्या गंभीर आहे,” असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी (एएफपी) 2020 पासून दहशतवादी घटनांच्या तपासात 17 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 35 किशोरवयीन मुलांची चौकशी केली आहे, ज्यात एका 12 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता, असे एएफपीचे आयुक्त रीस केर्शॉ यांनी सांगितले.
त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांवर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला होता, असेही ते म्हणाले.
अहवालात वर्णन केलेल्या एका ऑस्ट्रेलियन प्रकरणात, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये गुंतलेल्या एका 16 वर्षीय मुलाने हिंसेसाठी वापरले जाणारे अतिरेकी साहित्याची देवाणघेवाण केली होती. याशिवाय कॉकेशियन नसलेल्या लोकांवर हल्ले करण्याचे आवाहन केले होते आणि इतरांना ‘पांढऱ्या वंशाचे संरक्षण व्हावे’ म्हणून आगामी वंशयुद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
या किशोरवयीन मुलाचे वास्तविक जगाशी फार कमी संबंध होते आणि socializing offline मध्ये त्याने अत्यंत कमी वेळ घालवला असल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.
त्या मुलाला अटक करण्यात आली आणि 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील आणखी एका प्रकरणात, कट्टर राष्ट्रवादी आणि वर्णद्वेषी दृष्टिकोन असलेल्या एका 14 वर्षीय मुलाने हिंसक हल्ल्याची योजना आखण्यासाठी स्नॅपचॅट खात्याचा वापर केला आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसक अतिरेकी कारवायांचा सामना करण्याचे कार्यक्रम हाती घेतले.
आम्ही अनेक संबंधित तपासांमध्ये समान अतिरेकी प्रचाराचे व्हिडिओ पाहत आलो आहोत आणि यातून हेच लक्षात येते की ऑनलाइन म्हणजे डिस्कॉर्ड, टेलिग्राम आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सवर याच्या लिंक्स अस्तित्वात आहेत,” असे केर्शॉ म्हणाले.
ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी पुढील वर्षापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी याच महिन्यात एक कायदा मंजूर केला आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)