मॉस्कोतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची माहिती
दि. २३ मार्च: मूलतत्त्ववादी गटाकडून मॉस्कोतील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा रशियातील अमेरिकी दुतावासाने दिला होता, अशी माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एड्रियन वॉटसन दिली आहे.
अमेरिकेच्या रशियातील दुतावासाने इस्लामी मूलतत्त्ववादी गटांकडून मॉस्कोतील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी हल्ले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रशियात वास्तव्यास असलेल्या अमेरिकी नागरिकांनी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी नागरिकांना केली होती. अमेरिकेच्या ‘ड्युटी टू वॉर्न’ या धोरणांतर्गत रशियाच्या सरकारला ही माहिती देण्यात आली होती, असे वॉटसन यांनी म्हटले आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोच्या उपनगर भागात असलेल्या एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी रात्री हल्ला करून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आत्तापर्यंत सुमारे ६० जणांचा बळी गेला आहे. तर, शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
विनय चाटी