देशांतर्गत निर्मित ‘बार्ज’चे नौदलाकडे हस्तांतर

0
‘अम्युनिशन कम टोर्पेडो कम मिसाईल बार्ज’ (एसीटीसीएम) छायाचित्र: पीआयबी

दि. २९ मार्च: पाणतीर, क्षेपणास्त्र व दारुगोळा जहाजाकडे वाहून नेण्यासाठी उपयुक्त असलेल्या पडावाचे (बार्ज) ‘एलएसएएम १८’ चे गुरुवारी नौदलाकडे हस्तांतर हस्तांतर करण्यात आले. या ‘अम्युनिशन कम टोर्पेडो कम मिसाईल बार्ज’ची  (एसीटीसीएम) निर्मिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग प्रकारातील जहाजबांधणी कंपनी ‘सूर्यदिप्त प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने केली आहे. नौदलाच्या ‘नेव्हल आर्मामेंट डेपो-करंजा’ येथे कमोडोर विक्रम बोरा यांनी त्याचा स्वीकार केला.

‘अम्युनिशन कम टोर्पेडो कम मिसाईल बार्ज’ची  (एसीटीसीएम) निर्मिती व उत्पादन करण्याबाबत ‘सूर्यदिप्त प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ व संरक्षण मंत्रालय यांच्या दरम्यान मार्च २०२१ मध्ये करार झाला होता. त्यानुसार या ‘बार्ज’चे उत्पादन करण्यात आले आहे. या ‘बार्ज’मुळे बंदरावर अथवा खोल पाण्यात बंदराबाहेर उभ्या असलेल्या नौदालाच्या जहाजांवर दारुगोळा, पाणतीर  व क्षेपणास्त्र वाहून नेणे, ती जहाजावर चढवणे व जहाजावरून उतरविणे सोपे जाणार आहे.

भारतीय जहाज बांधणी नियमकांच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियम व अटीनुसार स्वदेशी तंत्रज्ञानाने या ‘बार्ज’ची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या आरेखन टप्प्यावर या ‘बार्ज’ची चाचणी नौदलाच्या विशाखापट्टणम येथील विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळेत घेण्यात आली होती. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे हे बार्ज महत्त्वाचे फलित मानले जात आहे.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


+ posts
Previous articleन्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही
Next article‘आयएमटी ट्रायलेट-२४’ नौदल कवायतीचा समारोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here