पूर्व किनारपट्टीवर नौदलाचा युद्धसराव

0
भारतीय नौदलच्यावतीने ‘पूर्वी लहर’ या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. छायाचित्र: पीआयबी
भारतीय नौदलच्यावतीने ‘पूर्वी लहर’ या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. छायाचित्र: पीआयबी

‘पूर्वी लहर’: नौदलाच्या सज्जतेचे मूल्यमापन करण्याचा उद्देश

 

दि. २२ एप्रिल: सागरी आव्हानांना तोंड देण्याची नौदलाची क्षमता तपासून पाहण्यासाठी व नौदलाच्या युद्धसज्जतेचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलच्यावतीने ‘पूर्वी लहर’ या युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या पूर्व किनारपट्टीवर हा युद्धसराव करण्यात आला. या सरावाचे नेतृत्त्व नौदलच्या पूर्व विभाग प्रमुखांनि केले.

‘पूर्वी लहर’ या युद्धसरावात जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दले सहभागी झाली होती. विविध टप्प्यांमध्ये या सरावाचे आयोजन झाले. युद्धकौशल्य, डावपेच, वास्तविक युद्धासारख्या स्थितीत लढाईचा सराव आणि शस्त्रास्त्रांच्या टप्प्यात विविध प्रकारच्या मारकक्षमतेचे प्रदर्शन आदी बाबींचा यामध्ये समावेश होता. यामधून निर्धारित लक्ष्यापर्यंत दारुगोळा पोहोचवण्याची भारतीय नौदलाची क्षमता सिद्ध झाली. विविध ठिकाणांहून विमानांचे परिचालन करून या संपूर्ण भागातील कारवाईदरम्यान सातत्यपूर्ण सागरी दक्षता प्रदर्शित करण्यात आली. पूर्व नौदल कमांडच्या सर्व प्रकारच्या युद्धसामग्रीच्या सहभागासह या सरावात अंदमान निकोबार कमांड, तटरक्षक दल आणि भारतीय हवाई दलाचा देखील सहभाग होता, ज्यामधून या संरक्षण दलांमधील उच्च दर्जाची आंतर परिचालन क्षमता दिसून आली.

या सरावामुळे वास्तविक परिस्थितीची हाताळणी करण्याचे धडे सहभागी दलांना मिळाले, ज्यामुळे या भागातील सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रभावी पद्धतीने प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता वृद्धिंगत झाली.‘पूर्वी लहर’ या युद्धसरावाच्या यशस्वी समारोपामधून सागरी क्षेत्रातील वाढत्या सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय नौदलाचा दृढनिर्धार अधोरेखित झाला.

विनय चाटी


Spread the love
Previous articleIndian Navy Conducts Exercise ‘Poorvi Leher’ Along East Coast To Test Maritime Security Preparedness
Next articleसंरक्षणदलप्रमुख फ्रान्सच्या भेटीवर रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here