‘दस्तलिक-२०२४’: संयुक्त लष्करी सरावाचा कळसाध्याय
दि. २६ एप्रिल: भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान परस्पर संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘दस्तलिक- २०२४’ या द्विपक्षीय लष्करी सरावाची शुक्रवारी सांगता झाली. तेर्मेझ येथील सरावस्थळावर या सरावाचा समारोप करण्यात आला.
भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान २०१९ मध्ये या वार्षिक द्विपक्षीय लष्करी सरावाला सुरुवात झाली होती. या सरावाचे पहिले सत्र भारतात झाले होते. यंदा उझ्बेकीस्तानातील तेर्मेझ येथे या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. भारताकडून या सरावात जाट रेजिमेंटचे ४५ जवान व भारतीय हवाईदलाचे १५ कर्मचारी सहभागी झाले होते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही या सरावादरम्यान उझबेकिस्तानला भेट दिली होती.
शुक्रवारी या सरावाचा महत्त्वाचा दिवस होता. या सरावात दोन्ही लष्कराची कार्यक्षमता, परस्पर समन्वय आदींचा सराव करण्यात आला. या वेळी उभय देशांच्या लष्करी तुकड्यांनी दहशवाद विरोधी युद्धाचाही सराव केला.
विनय चाटी