देशभरात ‘इमर्जन्सी लँडिंग’ सुविधा उभारण्याचा हवाईदलाचा प्रयत्न

0
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील महामार्गावर हवाईदलाकडून लढाऊ विमान व हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. छायाचित्र: वृत्तसंस्था

दि.  ०५ एप्रिल: विविध राज्य सरकारे व सरकारी संस्थांच्या समन्वयातून देशभरामध्य ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ उभारण्याचा हवाईदलाचा प्रयत्न असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात देण्यात आली आहे. हवाईदलाने नुकतीच अनंतनाग येथील महामार्गावर ‘इमर्जन्सी लँडिंग’ व ‘नाईट लँडिंग’ची प्रात्यक्षिके केली होती.

युद्धकाळात आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी व पेचप्रसंग हाताळण्याची क्षमता पारखून पाहण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील महामार्गावर हवाईदलाकडून लढाऊ विमान व हेलिकॉप्टर उतरविण्यात होते. ही चाचणी ‘नाइट लँडिंग’ स्वरुपाची होती. अनंतनाग येथील बिजबेहारा येथे सुमार ११९ कोटी रुपये खर्चून ही ‘इमर्जन्सी लँडिंग’ची सुविधा उभारण्यात आली आहे. हे व्यवस्था हवाईदलाच्या सामरिक क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या चाचणीत सुखोई विमान, चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर यांच्यासह हवाईदलाच्या विविध प्रकारच्या विमाने व हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला होता.

हवाईदलाच्या देशभरातील विविध मुख्यालायांच्या क्षेत्रात संबंधित राज्य सरकारशी समन्वयातून या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ सुरू करण्याचा विचार हवाईदलाकडून सुरू आहे. या ‘लँडिंग फॅसिलिटी’वर हवाईदलाची विमाने व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी राज्य सरकारशी संबंधित विविध संस्थांशी नियोजनाच्या स्तरापासून उत्तम समन्वय असण्याचे गरजेचे असते. या समन्वयातूनच हवाईदलाला देशभरातील अशा सुविधा वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे ‘होल ऑफ द नेशन ऍप्रोच’च्या माध्यमातून देशभरात ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’चे जाळे उभारण्याबाबत हवाईदल विचार करत आहे.

‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ व्यवस्था हवाईदलाच्या सामरिक क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. युद्धकाळात हवाईदलाकडून हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमा, इतर आणीबाणीचे प्रसंग, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत पुरविणे, दुर्घटनास्थळी अडकलेल्यांची सुटका करणे आदी बाबींसाठीही या सुविधेचा उपयोग होणार आहे. या भागातील आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here