भारताने, परदेशी बनवटीचे पाचव्या पिढीतील ‘F-35’ हे लढाऊ विमान घेण्याची खरंच गरज आहे का? भारतीय वायुसेनेच्या (IAF) क्षमतेची आणि विकासाची वाढ पुढील 15 वर्षांमध्ये कशी असली पाहिजे? भारत दीर्घकाळासाठी अमेरिकेवर अवलंबून राहू शकतो का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यात गुरुवारी व्हाइट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर, संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात नवा उत्साह आणि नवीन अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘F-35 फायटर्स‘ हा इंडियन एअरफोर्ससाठी योग्य पर्याय आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
IAF च्या आवश्यक गरजा काय आहेत आणि आगामी वर्षांमध्ये त्यांनी कोणती रणनीती अवलंबावी? याबद्दल चर्चा करण्यासाठी, भारतशक्तीने ‘एअर मार्शल रवी कपूर (निवृत्त)’, माजी सी-इन-सी, सेंट्रल एअर कमांड, यांच्याशी संवाद साधला.
एअर मार्शल रवी कपूर यांचे मत थोडक्यात:
“भारतीय वायुसेनेला सध्या क्षमता वाढीची गरज आहे. अगदी कमी वेळात तंत्रज्ञानातील पाचव्या पिढीची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. F-35 फायटर विमान हा एक सुसज्ज पर्याय आहे. आता, हे लढाऊ विमान भारताला क्षमता वाढीसाठी फायदेशीर ठरेल का? तर यावर माझे मत आहे, ‘हो नक्कीच’, 5th जनरेशनच्या या आत्याधुनिक विमानाचा पर्याय स्विकारणे योग्य ठरेल. सध्या आपण ज्या भू-राजनैतिक परिस्थितीत आहोत, त्या दृष्टीने हा निर्णय योग्य ठरेल,” असे कपूर यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
त्यांनी कबूल केले की, “भारतातील अनेकांना नेहमीच ही चिंता लागून राहिलेली असते आहे की, अमेरिका भारतासोबतच्या त्याच्या लष्करी विक्रीवर ऐनवेळी निर्बंध लावणार नाही ना? भारताला लष्करी विमाने ऑपरेट करु देण्यावर निर्बंध लादणार नाहीत ना, आपण याबाबतीत पूर्णत: अमेरिकेवर अवलंबून राहू शकतो का? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो का…इत्यादी”
“त्यामुळे जर भारताने F-35 विमान खरेदीचा निर्णय घेतला तर, आपण खबरदारी म्हणून त्याचा एक ठोस पुरावा तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरुन भविष्यात भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडल्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही, भारताने घेतली पाहिजे, असे कपूर यांनी सूचित केले.”
“F-35 ही IAF साठी एक चांगला पर्याय आहे, परंतु तज्ञांच्या टीमद्वारे त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. भारताला नक्की कोणत्या प्रकारच्या वापरकर्ता करारावर स्वाक्षरी करायची आहे आणि त्यामध्ये देखभाल व दुरुस्तीचे कोणते पैलू सामाविष्ट आहेत? याची नीट पडताळणी व्हायला हवी, जेणेकरुन 2032 पर्यंत जर भारताला हे जेट मिळाले, तर 2035 मध्ये AMCA (Advanced Medium Combat Aircraft) प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी, त्याचे संपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होईल,” असे कपूर यांचे मत आहे.
“मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा F-35 खरेदाची प्रस्ताव स्विकारणार की नाही, याबाबत भारताने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. चर्चेला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भारत सरकार सर्व पर्यायांचा विचार करेल. तथापि, या पलीकडे जाऊन, HAL (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड) ला अडचणीत आणणारी आव्हाने नवीन नाहीत, असे त्यांनी नमूद केले.”
या आठवड्याच्या सुरुवातीला बेंगळुरू येथे झालेल्या, ‘एरो इंडिया शोमध्ये‘ आयएएफ प्रमुख- एसीएम एपी सिंग आणि HAL चे अधिकारी यांच्यात झालेल्या एका खाजगी संभाषणावरील अपरिहार्य वादाचा संदर्भ कपूर यांनी यावेळी दिला. एअर चीफ सिंग यांनी, वितरणाचे वेळापत्रक पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल एचएएलवर उघडपणे टीका केली. त्यांचे हे वक्तव्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हायरल झाले. कथित खाजगी संवादादरम्यान, सिंग यांनी भारतीय वायुसेनेची HAL बद्दलची वाढती निराशा अधोरेखित केली होती. “तुम्हाला आमच्या अडचणी दूर कराव्या लागतील आणि आम्हाला अधिक आत्मविश्वाने साहाय्य करावे लागेल. याक्षणी, मला HAL वर विश्वास नाही आणि असे होता कामा नये,” असे सिंग म्हणाले होते.
जुने संदर्भ निदर्शनास आणून देत, हवाई दल प्रमुखांनी HAL च्या अकार्यक्षमतेबद्दल आणि विलंबाबद्दल समान चिंता व्यक्त केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, यातील मुख्य समस्या म्हणजे उत्पादन सुलभ करण्यासाठी आउटसोर्स केलेले भाग समाकलित करणाऱ्या बोईंग आणि डसॉल्ट सारख्या जागतिक एरोस्पेस दिग्गजांच्या विपरीत, घटकांना आउटसोर्स करण्याची HAL ची इच्छा नाही. एचएएल लढाऊ विमानांच्या निर्मितीच्या सर्व पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी, खाजगी क्षेत्राचा सहभाग मर्यादित करण्यासाठी आणि स्पर्धा कमी करण्यासाठी आग्रही आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर एअर मार्शल कपूर म्हणाले, की “कार्यक्षमता वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे LCA (लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) सारख्या मोठ्या प्रकल्पांची कल्पना असताना, HAL ने जोखीमीचे मूल्यांकन वेळेवर करणे गरजेचे होते. जोखीम मूल्यांकनामधील विलंबास कारणीभूत घटक, वाढलेला खर्च आणि इतर अनेक समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे. अंतिमत: HAL ला त्याच्या कार्यपद्धतीमध्ये अधिक वास्तववादी आणि व्यावहारिक असणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.