डीआरडीओची निर्मिती: केरळमधील इदुक्की येथे उभारले चाचणी व मूल्यमापन केंद्र
दि. १८ एप्रिल: ‘स्पेस’ अर्थात ध्वनिक वैशिष्ट्ये आणि मूल्यमापनासाठीच्या अत्याधुनिक पाण्याखाली वापरता येऊ शकणाऱ्या चाचणी केंद्राचे उद्घाटन संरक्षण विभागचे संधोधन व विकास सचिव व संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ.समीर व्ही कामत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. केरळमधील इदुक्कीमध्ये कुलमावू येथील ‘अंडरवॉटर ॲकॉस्टिक संशोधन सुविधे’त आयोजित कार्यक्रमात हे उद्घाटन करण्यात आले. जहाजे, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टरसह नौदलाच्या विविध मंचांसाठीचे प्रमुख चाचणी आणि मूल्यमापन केंद्र म्हणून ‘डीआरडीओ’च्या नौदल भौतिक आणि सागरशास्त्रीय प्रयोगशाळेने उभारलेल्या ‘स्पेस’ या मंचाची रचना करण्यात आली आहे. या ‘स्पेस’ मंचाने नौदल तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
‘स्पेस’ हा मंच मुख्यतः संपूर्ण सोनार यंत्रणेच्या मूल्यमापनासाठी वापरला जाणार असून, त्यामुळे संवेदके आणि ‘ट्रान्सड्यूसर्स’ सारख्या वैज्ञानिक बाबींचा जलद वापर आणि सुलभ पुनर्प्राप्ती शक्य होणार आहे. ही प्रणाली आधुनिक शास्त्रीय साधनांचा वापर करून हवा, पृष्ठभाग, पाण्यातील, तसेच जलसाठ्यांच्या तळांचे मापदंड यांच्या विषयी सर्वेक्षण, नमुने घेणे आणि माहितीचे संकलन अर्ण्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. या मंचामुळे अत्याधुनिक, सुसज्ज शास्त्रीय प्रयोगशाळांमध्ये माहितीच्या प्रक्रियेची, तसेच नमुन्यांचे विश्लेषण होण्याची गरज पूर्ण होणार. त्यामुळे पाणबुडीरोधक, युद्धविषयक संशोधन क्षमतेचे नवे युग सुरु होणार आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी