मलेशियन सरकार बेपत्ता MH 370 विमानाचा शोध पुन्हा घेणार

0
मलेशियन
मलेशियाच्या क्वालालंपूर येथे 3 मार्च 2019 रोजी बेपत्ता झालेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या MH 370 विमानाच्या पाचव्या वार्षिक स्मरण कार्यक्रमात एक माणूस प्रवाशांसाठी एक संदेश फलकावर लिहिताना. (रॉयटर्स/लाई सेंग सिन/फाईल फोटो)

मलेशियन सरकारने मलेशिया एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त फ्लाइट MH370चा  शोध पुन्हा सुरू करण्यास तत्त्वतः सहमती दर्शविली आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर एका दशकानंतर परिवहन मंत्र्यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. या मोहिमेसाठी “कोणताही शोध नाही, तर फी नाही” म्हणजे दुर्घटनाग्रस्त विमानासंदर्भात कोणतीही नवी माहिती या शोधमोहिमेत मिळाली नाही तर सदर कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही.

8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूर ते बीजिंग या मार्गावर 227 प्रवासी आणि 12 कर्मचारी असलेले बोईंग 777 हे MH370 विमान बेपत्ता झाले.

मलेशियन परिवहन मंत्री अँथनी लोके म्हणाले की, 2018 मध्ये संपलेल्या MH370 च्या भग्नावशेषांचा शेवटचा शोध घेणाऱ्या ओशन इन्फिनिटी या शोध संस्थेने दक्षिण हिंद महासागरात नवीन शोध क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

जर अवशेष सापडले तर फर्मला 70 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील असे लोके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“आमची जबाबदारी तसेच कर्तव्य आणि बांधिलकी ही नातेवाईकांसाठी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“आम्हाला आशा आहे की यावेळी तरी दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडतील आणि कुटुंबांना काहीतरी अधिक माहिती पुरवता येईल.”

इतिहास उलगडता येईल

मलेशियन मदतकर्त्यांनी हे विमान जाणूनबुजून मार्गावरून गायब करण्यात आले असावे ही शक्यता नाकारलेली नाही.

आतापर्यंत जे काही अवशेष आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आणि हिंद महासागरातील बेटांवर वाहून आले आहेत ते याच विमानाचे आहेत असे काहीजण मानतात तर  काहींनी याला दुजोरा दिला आहे.

त्याच्या बेपत्ता होण्याच्या गूढतेमुळे  कट रचण्याच्या अनेक सिद्धांतांना चालना मिळाली आहे, ज्यात पायलटने जाणूनबुजून विमान गायब केले अशा आरोपांपासून ते विमान परदेशी सैन्याने पाडले अशा अनेक शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आल्या होत्या.

2018 च्या चौकशीत असा निष्कर्ष काढण्यात आला की विमानाच्या उड्डाण नियंत्रणात ते मार्गावरून इतरत्र वळवण्यासाठी जाणूनबुजून फेरफार करण्यात आला असावा, मात्र त्यासाठी कोण जबाबदार असावे त्यांची ओळख पटली नाही.

भग्नावशेष जरी मिळाले तर त्यातून निश्चित उत्तरे मिळू शकतील असे तपासकर्त्यांनी सांगितले.

विमानाचा शोध

150 हून अधिक जे चिनी प्रवासी या विमानात होते त्यांच्या नातेवाईकांनी मलेशिया एअरलाइन्स, बोईंग, विमान इंजिन निर्माता रोल्स-रॉयस आणि अलियान्झ विमा समूह तसेच इतरांकडून नुकसानभरपाईची मागणी केली.

मलेशियाने 2018 मध्ये दक्षिण हिंद महासागरात शोध घेण्यासाठी ओशन इन्फिनिटीशी हातमिळवणी केली आणि विमान सापडल्यास 7 कोटी डॉलर्सपर्यंत रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यांचे दोनही प्रयत्न अयशस्वी ठरले.

त्यानंतर मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांनी दक्षिण हिंद महासागराच्या 1लाख 20 हजार चौरस किमी (46 हजार 332 चौरस मैल) भागात इनमारसॅट उपग्रह आणि विमान यांच्यातील automatic connections data च्या आधारे  पाण्याच्या पृष्ठभागाखाली देखील शोध घेतला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleभारत अमेरिकेसोबतचे निर्यात संबंध, अधिक बळकट करण्याच्या तयारीत
Next articleRs. 7,629-Crore Contract Signed for 100 More K9 Vajra-T Guns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here