जर्मनीत चाकू हल्ल्यात 3 ठार तर अनेक जखमी

0
जर्मनीतील सोलिंगन येथील फ्रॉनहॉफ मार्केट स्क्वेअर येथील घटनास्थळी पोलिस आणि आपत्कालीन सेवा. शहराचा 650 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आयोजित उत्सवादरम्यान एका व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात किमान 3 लोक ठार झाले तर  इतर अनेक जण जखमी झाले. (रॉयटर्सच्या एका व्हिडिओचा स्क्रीनग्रॅब

पश्चिम जर्मनीतील सोलिंजेन शहरात सुरू असणाऱ्या एका उत्सवात शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने अचानकपणे चाकूने वार केल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे बिल्ड या वृत्तपत्राने म्हटले आहे.

बिल्डने सांगितले की ही घटना रात्री 9.45 च्या सुमारास (1945 जी. एम. टी.) घडली आणि त्यात किमान तीन लोक ठार झाले असून अनेक लोक जखमी झाले.

बिल्डने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, ‘अरबांसारखा दिसणारा माणूस’ लोकांना भोसकू लागला. सध्या तो फरार असून आम्ही दहशतवादाची शक्यता नाकारत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलिंगन टॅगब्लॅट या स्थानिक वृत्तपत्राच्या वेबसाइटवर दिलेल्या बातमीनुसार शहराला 650 वर्षे पूर्ण झाल्याच्या सन्मानार्थ आयोजित एका उत्सवात हा हल्ला झाला.

स्थानिक बातम्यांनुसार शहरातील फ्रॉनहॉफ या बाजारपेठेत ज्यावेळी चाकू हल्ला झाला, तिथे लाइव्ह बॅण्डचा कार्यक्रम सुरू होता.

सोलिंगन हे जर्मनीतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून नेदरलँड्सच्या सीमेवर असलेल्या नॉर्थ राईन-वेस्टफेलिया राज्यात आहे.

जर्मनीमध्ये चाकूने वार करणे आणि गोळीबार या घटना तुलनेने दुर्मिळ आहेत.

जूनमध्ये जर्मनीतील मॅनहाइम शहरात उजव्या विचारसरणीच्या निदर्शनांवर झालेल्या हल्ल्यात एका 29 वर्षीय पोलिसाचा चाकूने भोसकल्यामुळे मृत्यू झाला. त्याआधी 2021 मध्ये एका रेल्वेवर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाले होते.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleRajnath-Austin Talks Focus On Defence Industrial Collaboration And Indo-Pacific
Next articleRajnath Singh Invites US Industry To Collaborate, Discusses Security Issues With NSA Sullivan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here