7 ऑक्टोबरच्या इस्रायल हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या 9 कर्मचाऱ्यांचा सहभाग

0
हल्ल्यात
आयलेट समेरानो (कॅमेऱ्याकडे पाठ ) हिच्या मुलाची योनातानची हत्या करून त्याचा मृतदेह 7 ऑक्टोबर रोजी यूएनआरडब्ल्यूएच्या कार्यकर्त्याने गाझाला नेला. त्याचा निषेध म्हणून ती यूएनआरडब्ल्यूएचे प्रमुख फिलिप लाझारिनी (व्यासपीठावर असलेले) यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना (छायाचित्र सौजन्य यूएन वॉच)

7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हमास हल्ल्यात युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टिनी रिफ्यूजीजच्या (यूएनडब्ल्यूआरए) नऊ कर्मचारी सदस्यांचा सहभाग होता आणि लवकरच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक म्हणाले, “नऊ कर्मचाऱ्यांचा सात ऑक्टोबरच्या हल्ल्यांमध्ये सहभाग असू शकतो असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत,” असे ते म्हणाले. हल्ल्यांमध्ये यूएनआरडब्ल्यूएच्या 19 कर्मचाऱ्यांच्या कथित सहभागाची चौकशी करणाऱ्या यूएन ऑफिस ऑफ इंटर्नल ओव्हरसाइट सर्व्हिसेसच्या (ओआयओएस) निष्कर्षांचा ते संदर्भ देत होते.

हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या यूएनआरडब्ल्यूएच्या 19 कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकाच्या संदर्भात ओआयओएसने चौकशी करून काही निष्कर्ष काढले,” असे ते म्हणाले. “एका प्रकरणात, कर्मचारी सदस्याचा सहभाग होता यासाठी ओआयओएसला कोणताही पुरावा मिळाला नाही. तर इतर नऊ प्रकरणांमध्ये ओआयओएसला मिळालेले पुरावे कर्मचारी सदस्यांच्या सहभागाचे समर्थन करण्यासाठी अपुरे होते”, असे ते म्हणाले.

तपासात ज्या नऊ व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे, ते सर्व पुरुष असावेत, असे हकने सांगितले. या कर्मचाऱ्यांचा सहभाग नेमका कशाप्रकारचा होता याबद्दलचा तपशील त्यांनी दिला नाही, परंतु ते म्हणालेः “आमच्यासाठी, हल्ल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग हा पॅलेस्टिनी लोकांच्या वतीने आम्ही करत असलेल्या कामाचा प्रचंड मोठा विश्वासघात आहे.”

7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात 12 युएनआरडब्ल्यूएच्या कर्मचाऱ्यांनी देखील भाग घेतल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने याचा तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सुमारे 1 हजार 200 लोक मारले गेले आणि तर 250 लोकांना ओलिस म्हणून गाझाला नेण्यात आले.

450 हून अधिक यूएनआरडब्ल्यूए कर्मचारी गाझा दहशतवादी गटांमध्ये लष्करी कार्यकर्ते म्हणून काम करत होते असे सांगून इस्रायलने मार्चमध्ये आपल्या आरोपांमध्ये वाढ केली. यूएनआरडब्ल्यूए आपल्या कार्यक्षेत्रात 32 हजार लोकांना रोजगार देते, त्यापैकी 13 हजार गाझामध्ये आहेत.

दुसरीकडे यूएनआरडब्ल्यूएने इस्रायली नजरकैदेतून गाझामध्ये सोडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांवर इस्रायली अधिकाऱ्यांनी एजन्सीचे हमासशी संबंध आहेत आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आहे असे खोटेच सांगण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचे सांगत या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here