अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्व दूत गाझा युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी म्हणून इस्रायलला गेले असल्याची माहिती एका स्त्रोताने रॉयटर्सला दिली आहे.
20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारण्यापूर्वी ट्रम्प यांचे मध्यपूर्व दूत, गाझा येथे युद्धविराम चर्चेत महत्वपूर्ण भूमिका बजावतील असे वृत्त समोर आले आहे.
इस्रायल आणि गाझामधील दहशतवादी गट हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला विराम देण्याच्या उद्देशातून तसेच इस्रायलच्या बंदंकांची मुक्ती करण्याच्या उद्देशातून ही भेट नियोजीत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या महिन्यात आपली भूमिका निलंबित केल्यानंतर कतार हे आखाती राज्य एक प्रमुख मध्यस्थ म्हणून पुन्हा वाटाघाटी सुरु करतील असे संकेतही सूत्राने वर्तविले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हमासचे वार्ताहर लवकरच यासंबंधी अधिक चर्चा करण्यासाठी कतारची राजधानी दोहा येथे परतील.
बायडन यांचे प्रयत्न सुरु
एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अध्यक्ष जो बायडन यांच्या सहाय्यकांना विटकॉफच्या इस्रायली, कतारी आणि इतर मध्य पूर्व अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्कांबद्दल माहिती आहे. तसेच त्यांना समजले आहे की ट्रम्पचे यांचे दूत गाझा कराराचा पाठपुरावा करत आहेत, त्यास समर्थन देत आहेत. विटकॉफऐवजी बिडेन प्रशासनाने गाझामधील युद्धविरामाच्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात यूएसची आघाडी कायम ठेवली आहे. हमासच्या नेत्यांनी रविवारी कैरोमध्ये इजिप्तच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. याच धर्तीवर अध्यक्ष जो बायडन यांच्या टीमने ट्रम्प कॅम्प अद्ययावत ठेवला आहे, परंतु अद्याप दोन्ही बाजूंनी थेट एकत्र काम केलेले नाही, असेही या अधिकऱ्याने रॉयटर्सला सांगितले. बायडन यांच्या सरकारला विटकॉफशी समन्वय साधण्याची गरज वाटत नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी याबाबत स्पष्ट चेतावनी दिली आहे की, ‘20 जानेवारीपूर्वी गाझा पट्टीमध्ये ओलिस ठेवलेल्यां लोकांना सोडले नाही तर याची मोठी किंमत मोजावी लागेल.’
विटकॉफची प्रादेशिक चर्चा
विटकॉफ हा एक प्रख्यात रिअल इस्टेट गुंतवणूकदार आहे असून, ट्रम्प मोहिमेअंतर्गत कतार आणि इतर आखाती राज्यांशी त्याचा व्यावसायिक संबंध आहे. मात्र त्यांना कोणताही राजकीय अनुभव नाही. मात्र अशाप्रकारच्या धोरणांमध्ये त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर 22 नोव्हेंबर रोजी त्यांनी दोहा येथे परराष्ट्र मंत्री म्हणून काम करणाऱ्या शेख मोहम्मद यांची भेट घेतली होती. एकदा ट्रम्प प्रशासनाने पदभार स्वीकारला की ते गाझा आणि प्रदेश स्थिर करण्यासारख्या इतर मुद्द्यांकडे लक्ष देऊ शकतील,” असे सूत्रांनी सांगितले आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे