नवी दिल्ली येथे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत इनो-योद्धा 2024 या नवकल्पना आणि नवोन्मेषाला चालना देणाऱ्या स्पर्धा तसेच चर्चासत्राचे भारतीय लष्कराकडून गुरुवारी आयोजन करण्यात आले होतो. भारतीय लष्कराद्वारे आयोजित केला जाणारा हा वार्षिक कार्यक्रम विद्यमान क्षमता पोकळी कमी करणे, परिचालन, लॉजिस्टिक्स, प्रशिक्षण क्षमता वाढवणे आणि परिचालन परिणामकारकता वाढवणे या हेतूने आयोजित केला जातो. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी, संपूर्ण भारतीय लष्कराच्या विविध क्षेत्रांमधून युनिट स्तरापासून फॉर्मेशन स्तरापर्यंत आणि शेवटी संबंधित कमांड मुख्यालयपर्यंतच्या निवडीनंतर एकूण 75 अभिनव कल्पना सादर करण्यात आल्या.
या 75 नवोन्मेषांपैकी 22 अव्वल नवोन्मेष कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आले. फील्ड फॉर्मेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्मी डिझाईन ब्युरोच्या अंतर्गत उत्पादनासाठी या कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या जातील. यातून’आत्मनिर्भर भारत’ चे स्वप्न साध्य करण्यासाठी भारतीय लष्कराची बांधिलकी प्रतिबिंबित होते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवोन्मेषकांच्या सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे कौतुक केले आणि सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांना चिकित्सेने विचार करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “अलीकडील संघर्षांनी दाखवून दिले आहे की नावीन्य हा केवळ एक शब्द नाही तर ती एक मानसिकता आहे. ही ती ठिणगी आहे जी प्रगतीला चालना देते आणि भविष्याला आकार देते.” जनरल द्विवेदी यांनी नवसंशोधकांची गंभीर विचारसरणी आणि चिकाटी अधोरेखित केली, ज्यांचे योगदान लष्कराची क्षमता बळकट करत आहे.
इनो-योद्धाची कामगिरी
गेल्या चार वर्षांत, इनो-योद्धाने 26 बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) दाखल करणे आणि 21 नवकल्पना यशस्वीरित्या पूर्ण करणे यासह उल्लेखनीय प्रगतीला चालना दिली आहे. या कार्यक्रमात खासगी क्षेत्राबरोबरच्या यशस्वी सहकार्यावरही प्रकाश टाकण्यात आला, जिथे तीन नवकल्पना उद्योगांना उत्पादनासाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये जून 2024 मध्ये सुरू करण्यात आलेले एफसीटेकचे एक्सप्लोडर, ऑक्टोबर 2024 मध्ये लष्करप्रमुखांच्या लष्करी कमांडर परिषदेदरम्यान अनावरण करण्यात आलेले रेड काइट डिजिटल टेकचे ‘अग्निशास्त्र’ आणि आयएस ट्रेडिंग कंपनीला हस्तांतरित करण्यात आलेले ‘विद्युत रक्षक’ यांचा समावेश आहे.
हे टप्पे भारतीय लष्कराच्या ताफ्यातील नाविन्यपूर्ण संस्कृतीला चालना देताना परिचालन क्षमतेतील तफावत भरून काढण्याच्या भारतीय लष्कराच्या संकल्पाचे दर्शन घडवतात.
प्रगतीसाठीची वचनबद्धता
भारतीय सैन्याला विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. भौगोलिक प्रदेश, हवामान आणि प्रतिकूल धोक्यांमुळे आव्हाने वाढली आहेत. भारतीय लष्कर आपल्या जवानांना आलेल्या अनुभवांवर आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन देते. हे जवान त्यांची आवड, व्यावसायिक क्षमता आणि तंत्रज्ञानाने प्रेरित होऊन, संबंधित क्षेत्रात आलेल्या आव्हानांवर आंतरिक अनुभवाने उपाय शोधतात.

टीम भारतशक्ती