सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी, त्यांच्या समर्थकांना पुढील आठवड्यात रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. इस्लामाबादमध्ये त्यांच्या पक्षाने प्राणघातक अशा निषेध मोर्चाचे नेतृत्व केल्यानंतर, आता इमरान सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची धमकीही दिली आहे.
गुरुवारी ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये, खान यांनी त्यांच्या समर्थकांना १३ डिसेंबर रोजी, त्यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (PTI) या पक्षाची सत्ता असलेल्या खैबर येथून पख्तूनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरच्या वायव्य शहरात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
इम्रान यांनी त्यांच्या समर्थकांनी, २५ नोव्हेंबर रोजी काढलेल्या निषेध मोर्चाच्या क्रॅकडाऊनच्या न्यायालयीन चौकशीची देखील मागणी केली आहेत. ज्यामध्ये ते म्हणतात की, या मोर्चादरम्यान त्यांच्या किमान १२ समर्थकांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्या वर्षी 9 मे रोजी झालेल्या हिंसाचारातही त्यांच्या समर्थकांपैकी 8 जण ठार झाले होते. तरी याप्रकरणी अटक केलेल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.
“या दोन मागण्या पूर्ण न झाल्यास, १४ डिसेंबरपासून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू होईल आणि त्यानंतरच्या कुठल्याही परिणामासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार असेल,” असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे.
२५ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात, कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी गेल्या वर्षी ९ मे रोजी लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला केला होता. या हल्ल्याचे नेतृत्व केल्याचा आरोप इम्रान यांच्यावर लावण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांनी दोषी नसल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी इम्रान खान गेल्या वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. ७२ वर्षीय इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी स्टार क्रिकेटसुद्धा राहिले आहेत. मात्र राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजवर त्यांच्यावर अनेक प्रकरणी गंभीर आरोप होताना दिसत आहेत.
याच धर्तीवर २०२२ मध्ये इमरान यांची पाकिस्तानातून हकालपट्टी करण्यात येणार होती. मात्र तिथल्या लष्कराच्या सेनापतींनी जाणूनबुजून इमरान यांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी ही आरोपांची खेळी खेळली होती, असे त्यांच्या समर्थकांचे आणि त्यांच्या स्वत:चे देखील म्हणणे आहे.
मात्र पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावरील हा आरोप फेटाळून लावते. तथापि, इमरान हे पूर्णपणे दोषी असल्याचे पुरावेही सादर करते.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे