ढाक्याशी संबंध पूर्ववत होतील मात्र पाकिस्तानशी ते होतीलच याची आपल्याला खात्री वाटत नसल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर शुक्रवारी लोकसभेत बांगलादेशबद्दल एक निवेदन देत होते ज्यात नेहमीच्याच बाबींचा समावेश होता.
“विकास प्रकल्पांबाबत विचार केला तर उभय देशांमधील संबंध अत्यंत चांगले आहेत आणि आम्हाला आशा आहे की बांगलादेशातील नवीन व्यवस्थेमध्ये देखील आम्ही परस्पर फायदेशीर आणि स्थिर संबंध प्रस्थापित करू शकू.”
“अल्पसंख्याकांशी त्यांची असणारी वागणूक लक्षात घेता तो एक चिंतेचा विषय आहे, अल्पसंख्याकांवर अनेक हल्ले झाले आहेत, यासंदर्भात आम्हाला वाटणाऱ्या चिंतेकडे आम्ही त्यांचे लक्ष वेधले आहे.”
अलीकडेच परराष्ट्र सचिव मिस्री यांनी ढाक्याचा दौरा केला. त्यावेळी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा विषय त्यांच्या बैठकीत मांडला गेला आणि आमची अपेक्षा आहे की बांगलादेश स्वतःच्या हितासाठी या समस्येवर योग्य त्या उपाययोजना करेल जेणेकरून त्यांच्या देशातील अल्पसंख्याक सुरक्षित राहतील.
“मिस्री यांच्या भेटीकडे बांगलादेशच्या नवीन प्रशासनाशी संवाद पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. तेथून उदयाला आलेली भारतविरोधी मानसिकता आणि हिंदू तसेच इतर अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले पाहता हे आवश्यक होते.
अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या 88 घटना घडल्या आणि जातीय हिंसाचाराच्या कृत्यांसाठी 70 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती ढाक्याने नंतर दिली.
पाकिस्तानबाबत, पुन्हा एका सदस्याच्या प्रश्नावरील उत्तरात, जयशंकर म्हणाले, “आम्हाला इतर कोणत्याही शेजारी देशाप्रमाणे पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण आम्हाला दहशतवादी मुक्त संबंध हवे आहेत.”
ते म्हणाले, “आम्ही हे स्पष्ट केले आहे की त्यांचे पूर्वीचे वर्तन बदलत आहेत हे दाखवून देणे पाकिस्तानी बाजूचे काम आहे. जर त्यांनी तसे केले नाही, तर त्याचे परिणाम संबंधांवर आणि त्यांच्यावर नक्कीच होतील. या संदर्भात आता बॉल पाकिस्तानच्या अंगणात आहे.
“त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या वर्तनात” डोळ्यांना स्पष्टपणे दिसून येतील असे बदल “घडवून आणण्याचे आवाहन केले. याशिवाय व्यापारावरील स्थगिती हा 2019 मधील पाकिस्तानचा निर्णय होता हे पण त्यांनी स्पष्ट केले. भारताने जम्मू-काश्मीरचा दर्जा बदलत त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार स्थगितीचा निर्णय घेतला गेला होता.
जम्मू काश्मीरबाबत घेतलेला निर्णय ही भारताची अंतर्गत बाब होती आणि त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे भारताशी व्यापार करायचा आहे की नाही हे पाकिस्तानला ठरवायचे होते.
सूर्या गंगाधरन