भारत आणि फिलीपिन्समध्ये अलीकडेच झालेल्या सागरी संवादाविषयी बोलताना तज्ज्ञांनी, हे एक “कौतुकास्पद पाऊल” असल्याचे म्हणत त्याचे स्वागत केले आहे. दोन्ही देशातील या संवादामुळे आणि संबंधांमुळे Indo-Pacific मध्ये, एक मजबूत सागरी राष्ट्र म्हणून भारताचे स्थान उंचवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
India आणि Philippines या दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी फिलीपिन्सची राजधानी असलेल्या ‘Manila’ येथे हा विशेष ‘सागरी संवाद’ (Maritime Dialogue) पार पडला.
याविषयी अधिक माहिती देताना ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने’ सांगितले की, ‘दोन्ही बाजूंनी असलेल्या सागरी आव्हानांवर भारत आणि फिलीपिन्सने आपापल्या दृष्टीकोनांची यावेळी देवाणघेवाण केली. तसेच परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर देखील यावेळी चर्चा झाली.’
यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी नियम-आधारित ऑर्डरचे पालन करण्यावर भर दिला. विशेषत: ‘यूएन कन्व्हेन्शन ऑन द सी लॉ’ कायम ठेवण्यासाठी. याशिवाय त्यांनी सागरी क्षेत्रातील विविध सहकार्य उपक्रमांवरही चर्चा केली.
नवी दिल्ली स्थित ‘Think Tank’, USI मधील प्रतिष्ठित फेलो सदस्य- कॅप्टन सरबजीत परमेर यांनी या सागरी संवादाचे स्वागत, ‘एक कौतुकास्पद पाऊल’ अशा शब्दांत केले.
“या संवादामुळे दक्षिण पूर्व आशियातील अन्य देशांसोबतच, भारताचे सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे आणि यामुळे इंडो पॅसिफिकमधील एक मजबूत सागरी राष्ट्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कॅप्टन परमार यांनी, ‘मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस’ (Manohar Parrikar Institute for Defense Studies and Analysis) मध्येही काम केले आहे.
परमार पुढे म्हणाले की, ‘दोन्ही देशातील हा संवाद भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणात आणि इंडो-पॅसिफिक महासागरातील पुढाकारावर आधारित आउटरीचमध्ये देखील भर घालतो.’
सागरी संवादातील महत्वाचे मुद्दे
‘MEA’ (Ministry of External Affairs Government) नुसार, या विशेष सागरी संवादादरम्यान, भारत आणि फिलीपिन्सच्या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी प्रचलित सागरी आव्हानांवर दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली. तसेच परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार करुन, सागरी सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही त्यांनी चर्चा केली.
तसेच या बैठकीदरम्यान द्विपक्षीय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करताना, दोन्ही शिष्टमंडळांनी सामायिक उद्दिष्टांसाठी विविध आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक व्यासपीठांवर सहयोग करण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली.
सागरी उद्योग, सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) यासारख्या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम पद्धती सामाविष्ट करण्यासाठी आणि सागरी क्षमता निर्माण उपक्रमांमध्ये भागीदारी करण्यासाठीही त्यांनी यावेळी सहमती दर्शवली.
शिष्टमंडळांनी नौदल आणि तटरक्षक दल सहकार्य (Navy and Coast Guard cooperation) आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी यामधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यावरही सहमती दर्शवली.
IPOI आणि पंतप्रधान मोदी
दरम्यान, दोन्ही देशांनी 2025 मध्ये नवी दिल्ली येथे संवादाची पुढील फेरी आयोजित करण्याचे मान्य केले आहे. कॅप्टन परमार म्हणतात की, हे सर्व पैलू ‘इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह’ (IPOI) च्या कक्षेत येतात. फिलीपिन्स IPOI च्या सात स्तंभांपैकी कोणत्याही एक किंवा अधिकवर बोर्डात येण्याचा विचार करू शकते. जागतिक स्तरावर सागरी कार्यक्रमासाठी भारत वचनबद्ध आहे.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉक, थायलंड येथे पूर्व आशिया शिखर परिषदेत IPOI लाँच केले. सागरी क्षेत्राची सुरक्षा, सुरक्षितता आणि स्थिरता सुनिश्चित करणे हे IPOI चे मुख्य उद्दिष्ट आहे. IPOI सात क्षेत्रांमध्ये किंवा ‘स्तंभांमध्ये’ सहकार्याचा प्रस्ताव देतो.
- सागरी सुरक्षा (Maritime security)
- सागरी पर्यावरणशास्त्र (Maritime ecology)
- सागरी संसाधने (Maritime resources)
- संसाधनांची क्षमता वाढवणे आणि वितरण
(Capacity building and resource sharing) - आपत्ती जोखीम कमी करणे आणि त्याचे व्यवस्थापन
(Disaster risk reduction and management) - विज्ञान, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य
(Science, Technology and Academic cooperation) - व्यापार, संपर्क आणि सागरी वाहतूक
(Trade, Connectivity and Maritime transport)
पंतप्रधान मोदी यांनी 9 ऑगस्ट, 2021 रोजी, ‘सामुद्रिक सुरक्षा वाढवणे: आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक प्रकरण’ या विषयावरील उच्चस्तरीय UNSC खुल्या चर्चेत भाग घेतला होता. परमार म्हणाले की, एप्रिल 2024 मध्ये भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली तुकडी फिलिपाइन्सला दिली, हे सागरी सहकार्याच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाऊ शकते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, यावेळी भारताकडून करण्यात आलेली ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीची’ (BrahMos) ही पहिली निर्यात होती.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
ब्राम्होस क्षेपणास्त्रे फिलिपाइन्सच्या सागरी दलाला देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील दमोह येथे एका निवडणूक सभेत, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीबद्दल “माझ्या सर्व देशवासियांचे” अभिनंदन करतो, असे म्हटले होते. यापूर्वी 2023 मध्ये, फिलीपिन्स नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील ब्रह्मोसच्या नागपूरात कठोर प्रशिक्षण घेतले होते.
कॅप्टन परमार यांनी सांगितले की, ‘ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली फिलीपिन्सला पुरवणे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील संस्थात्मक द्विपक्षीय वाढीचे प्रतिक होते.
परमार यांच्या म्हणण्यानुसार, ‘दोन्ही देशांना जमिनीवरील आणि सागरी अशआ दोन्ही प्रकारच्या गैर-पारंपारिक धोक्यांना सामोरे जाण्याचा पुरेसा अनुभव आहे. हे अनुभव एकत्र केल्यास दोन्ही देशांमधील वाढत्या संबंधांमध्ये मोलाची भर पडेल आणि भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने दोन्हीकडून एक पाऊल पुढे पडेल.”
जानेवारी 2022 मध्ये ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत US$374.96 दशलक्ष कराराला अंतिम रूप दिल्यानंतर फिलीपिन्सशी भारताचे संबंध वरच्या दिशेने चालले आहेत यावर इतर तज्ञ देखील सहमत आहेत. भारत-फिलीपिन्स सागरी ट्रॅक 2 संवाद देखील सप्टेंबर 2023 मध्ये झाला.
शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांचे संयुक्त सचिव मुआनपुई सैयावी यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
मार्शल लुईस अल्फेरेझ, सहाय्यक सचिव, सागरी आणि महासागर व्यवहार कार्यालय, परराष्ट्र व्यवहार विभाग, यांनी फिलिपाइन्सच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
भारत आणि फिलीपिन्स आंतरराष्ट्रीय कायदा आणि त्याच्याशी निगडीत सर्व नियमांचे पालन करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही, दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाने यावेळी दिली.
तृप्ती नाथ | अनुवाद- वेद बर्वे