Ola ही चार वर्षांपूर्वी सुरु झालेली एक अशी कंपनी आहे, जिने कायमच नाविन्यावर भर दिला आहे. अशातच अलीकडे Ola ने इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला असून, ‘EV Revolution’ अर्थात ‘इलेक्ट्रिक वहानांच्या क्रांतीमध्ये’ ओला प्रगती करत आहे.
Ola ने सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीत ‘Electric Vehicles’ निर्मितीचा मोठा कारखाना उभारला असून, विशेष म्हणजे इथे सर्व ‘महिला कर्मचारी’ काम सांभाळत आहेत. ‘ओला’च्या इलेक्ट्रिक वाहनांचे इन-हाऊस आणि नाविन्यपूर्ण डिझाइन आणि त्याचे ऑटोमेशन हे सध्या सर्वांसाठीच विशेष आकर्षण ठरते आहे. कंपनीचे सर्वोच्च पदाधिकारी याला ‘भारताच्या ईव्ही क्रांतीचा ग्राउंड झिरो (Ground Zero of India’s EV revolution)’ असे संबोधतात.
ओला इलेक्ट्रिक’च्या विश्वात आपले स्वागत आहे:
कामाचा स्तर महत्वाचा
‘ओला कंपनी त्यांच्या कारखान्यामध्ये, वर्षाला सुमारे 10 दशलक्ष इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती करु शकते. भारताच्या भविष्याकडे पाहता, आम्हाला आमच्या कामाचा स्तर आणि दर्जा याचा मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागेल, आम्हाला शिथील राहून चालणार नाही’, ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) संस्थापक- भाविश अग्रवाल यांनी मुलाखती दरम्यान सांगतिले.
‘भारताला 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून’, आम्ही प्रेरणा घेतो असे अग्रवाल यावेळी म्हणाले.
”भविष्याचा विचार करुन आखलेले हे ध्येय माझ्या पिढीला विचार करण्यासाठी, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि त्या स्वप्नांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करते. भारत हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश असून, इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये भारताने भविष्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्षम बनण्याची गरज आहे आणि पुढे जाऊन संपूर्ण जगालाही याचा फायदा होणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन ऊर्जेचा नमुना
ओला कंपनीने नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या कामकाजातील हा एक महत्त्वाचा पैलू आहे. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, कंपनीने बनवलेला 4680 सेल -46 मिमी व्यास आणि 80 मिमी उंची आहे. हे सेल म्हणजे Electric Vehicle चे ऱ्हदय आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे हे उदाहरण म्हणजे ओलाच्या नवीन उर्जेचा आणि नाविन्याचा नमुना आहे, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘4680 सेल’ हा नेहमीच्या सेलपेक्षा मोठा आहे. ज्यामध्ये ‘उच्च ऊर्जा घनता’ (Higher energy density) आणि उच्च कार्यक्षमता (Higher efficiency) आहे.’ ‘विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या जगभरातील दोन ते तीन कंपन्यांपैकी Ola ही एक कंपनी आहे’, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुलाखती दरम्यान अग्रवाल म्हणाले की, ‘हा नवीन उर्जा नमुना भूतकाळ आणि वर्तमानातील, गॅसोलीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ज्या तंत्रज्ञानामुळे जगातील काही देशांना भू-राजकीय बळ मिळाले आहे. भारत तेलाचा निव्वळ आयातदार बनला. आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्या, पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यास भारतासाठी ते धोक्याचे ठरु शकते. पण भारताचे उर्जा क्षेत्रातील भविष्य हे केवळ पेट्रोल सारख्या इंधनांवर आधारित नसून ते इलेक्ट्रिक प्रणालीच्या तंत्रज्ञानावर आधारित असेल.
Ola Electric कसे विकसीत झाले?
IIT बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर, अग्रवाल यांनी सर्वप्रथम मायक्रोसॉफ्टमध्ये दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी एका मोठ्या व्हिजनसह ‘ओला’ (OLA) ही राइड हेलिंग कंपनी स्थापन करण्याचे निश्चीत केले. ते स्वत:ची ओळख उद्योजकीय व्यवसायात व्यग्र असलेले एक तंत्रज्ञ अशी करुन देतात.
दरम्यान Ola कंपनीची निर्मिती करत असताना, अग्रवाल यांना जागातील गतिशीलतेचा जवळून परिचय झाला. ज्यामुळे उद्योजकतेच्या प्रवासातील जगातल्या व्यापक धोरणात्मक थीम्स त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजल्या.
“आपल्या एक विकसनशील देश म्हणून, जर ‘उर्जा’ (Energy) क्षेत्रात नूतनीकरणक्षम निर्मितीवर आणि उर्जेच्या साठवणुकीवर भर देऊ शकलो, त्या दृष्टीने प्रगती करु शकलो, तर भारत एक मजबूत आणि भविष्याभिमुख अर्थव्यवस्था बनू शकेल, असा विश्वास अग्रवाल यांनी बोलून दाखवला. याच दृष्टीकोनातून आम्ही म्हणजे Ola ने वाटचाल सुरु केली असल्याचंही ते म्हणाले.
Ola Electrics चे पुढील ध्येय काय?
‘पुढच्या 10 वर्षात जगातील सर्वात मोठे Electric Vehicle Hub बनवण्याचे आमचे ध्येय आहे’, असे अग्रवाल म्हणाले. यात तीन प्रमुख विभाग असतील – एक दुचाकी बनवण्याचा कारखाना, एक गिगाफॅक्टरी आणि एक चारचाकी बनवण्याचा कारखाना प्रकल्प असणार आहे. (जो भविष्यातील प्रकल्प आहे). लिथियम आयन पेशी तयार करणारी गिगाफॅक्टरीची क्षमता 5 गिगावॅट तासांची प्रारंभिक क्षमता असेल. त्यानंतर भविष्यात 100 गिगावॅट तासांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. आज जगाची गिगावॅट उत्पादन क्षमता सुमारे 2000 गिगावॅट प्रति तास असून आणि त्यात चीनचा मोठा वाटा आहे,’ अशी माहिती अग्रवाल यांनी यावेळी दिली.
नितीन गोखले | अनुवाद- वेद बर्वे